Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

८५% पालकांना आता वाटत आहे त्यांच्या मुलांच्या भविष्याची जास्त चिंता – ‘लीड स्कूल’ सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Date:

मुलांचे आरोग्य ,त्यांची सुरक्षा आणि मुले अभ्यासात मागे पडतील व त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल या दोन सर्वात मोठ्या चिंता महाराष्ट्रातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

पुणे, १२ जून, २०२०:  सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे.  या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत ८५% पेक्षा जास्त पालकांना आता अजून जास्त काळजी वाटू लागली आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे, या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील ५०% पेक्षा जास्त पालक असे मानतात की ऑनलाईन शाळा हा शिक्षणाचा प्रभावी मार्ग आहे आणि शाळेच्या वर्गांमध्ये बसवून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरीनेच ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवले गेले पाहिजे.  जवळपास ५३% पालक असे मानतात की, ते आपल्या मुलांना घरून चालणाऱ्या ऑनलाईन शिक्षणात मदत करू शकतात, आई आणि वडील दोघांनीही हे मत व्यक्त केले आहे.

महानगरे आणि इतर शहरांमधील जवळपास ५००० पालकांसोबत केल्या गेलेल्या या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून काही वास्तविक परंतु कठोर निष्कर्ष आढळून आले आहेत:  ७०% पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कोविडमुळे होत असलेल्या प्रभावामुळे खूप काळजीत आहेत.  नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक थोडे जास्त चिंतीत झाले आहेत; सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी ७८% पेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे; आणि जवळपास ४०% पालकांनी त्यांची मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीती व्यक्त केली आहे.

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दलची भीती तसेच मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे शिक्षणाचे एक वर्ष वाया जाईल या दोन सर्वात मोठ्या चिंता महाराष्ट्रातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

लीड स्कूलकडे असलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील पालक असे मानतात की ते आपल्या मुलांना शिक्षणात मदत करण्यात चांगल्या प्रकारे सक्षम नाहीत.  तर दुसरीकडे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगाणा येथील पालक मानतात की, ते आपल्या मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी सक्षम आहेत.

सर्वेक्षणातून आढळून आलेली ही बाब आश्चर्यजनक नाही की, महाराष्ट्रातील ८४% पालक म्हणतात, ते आपल्या मुलांसोबत जास्त चांगल्या प्रकारे वेळ घालवण्यात सक्षम आहेत – मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये ही बाब आढळून आली आहे.  

भारतातील पालकांना भेडसावत असलेल्या मुख्य चिंता समजून घेणे हे या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाचे उद्धिष्ट होते.  यामध्ये सहभागी झालेल्या पालकांनी कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याच्या समस्येला सामोरे जात असतानाचे आपले अनुभव यामध्ये मांडले आहेत, त्यासोबत मुलांच्या बाबतीत त्यांच्या निर्णयांवर सद्यस्थितीचा कसा प्रभाव होत आहे, हे देखील त्यांनी सांगितले आहे.

लीड स्कूलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुमीत मेहता यांनी सांगितलेआपल्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनात जी भीती आहे ती मी समजू शकतो.   आपल्या शाळांनी उच्च गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण अनुभव प्रदान करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जर आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेत असू तर त्यांचे काही नुकसान होणार नाही.  पण त्याचवेळी आपल्याला अशा पालकांच्या निर्णयाचा देखील आदर राखावा लागेल जे आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित आहेत.  शाळांमध्ये नियमांचे पालन होत आहे याची खात्री करून घेण्यासाठी सरकारने नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे कारण पालक आणि विद्यार्थी या दोघांच्याही मनात विश्वास निर्माण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.  पालकांनी या पर्यायाचा वापर करायला हवा आणि शाळांसोबत सहकार्य आणि समन्वयाने पुढे गेले पाहिजे कारण पालक आणि शाळांदरम्यानचे  विश्वासार्ह संबंधच कोविड-१९ ला भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी सर्वात मोठी भेट बनवू शकतील.”  

लीड स्कूलने भारतातील शाळांसाठी ‘पोस्ट लॉकडाउन हँडबुक’ नुकतेच प्रकाशित केले आहे.  लॉकडाउननंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही दोन्ही उद्दिष्ट्ये एकाच वेळी पूर्ण करत शाळा चालवण्यासंदर्भात शिफारशी आणि मार्गदर्शक सूचना या हँडबुकमध्ये दिल्या गेल्या आहेत.

लीड स्कूल :

‘लीडरशिप बोलेवार्ड’ ही भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करत असलेल्या शिक्षण कंपन्यांपैकी एक कंपनी लीड स्कूलची प्रायोजक आहे.  लीड स्कूलची स्थापन २०१२ मध्ये करण्यात आली.  ही शाळांसाठी तयार करण्यात आलेली एकात्मिक शिक्षण प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना उच्चतम स्तरावर शिक्षण घेण्यात मदत करते.  लीड स्कूलमध्ये तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचा मिलाप घडवून आणून शिकवण्याची आणि शिकण्याची एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, जेणेकरून देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील आणि शिक्षकांची शिकवण्यातील कामगिरी सुधारता येईल.  लीड स्कूलच्या मालकीच्या सहा शाळा असून देशभरातील १५ राज्यांमधील द्वितीय ते चतुर्थ श्रेणीच्या शहरांसह ३०० पेक्षा जास्त शहरांमधील ८०० पेक्षा जास्त शाळा लीड स्कूलच्या सहयोगी आहेत.  या शाळांमध्ये मिळून जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.   

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...