पीएनबी हाउसिंग फायनान्सतर्फे रिटेल कर्जदरात 15 बीपीएसची घट

Date:

नवी दिल्ली– भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी गृह वित्त कंपनी असलेल्या पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने गृह कर्ज आणि मालमत्तेवर दिल्या जाणाऱ्या कर्जासह एकंदर रिटेल कर्ज दरात 15 बेसिस पॉइंट्सची घट केली आहे. 9 मे 2020 पासून नवे दर अमलात येणार आहे. फेब्रुवारी 2020 च्या आधी फ्लोटिंग दराने कर्ज घेतलेल्या सर्व रिटेल ग्राहकांना याचा फायदा होणार असून कोव्हिड- 19 लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा व मदत मिळणार आहे.

पीएनबी हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीरज व्यास म्हणाले, ’75 बीपीएसने दरात कपात करण्याच्या आरबीआयच्या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला खात्री आहे, की दरातील ही घट आणि तीन महिन्यांच्या मुदतवाढीसह सर्व रिटेल ग्राहकांवरील कर्जाचा बोजा कमी होईल व या साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी विकासाची सकारात्मक भावना तयार होईल. या साथीवर मात करण्यासाठी ग्राहकांना मदत व्हावी आणि गृह क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे कंपनीच्या 2.5 लाख ग्राहकांना त्यांच्या कर्जाची मूळ रक्कम कितीही असली, तरी त्याचा लाभ घेता येईल.’

पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड

 पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एनएसई- पीएनबीहाउसिंगबीएसई – 540173) ही पंजाब नॅशनल बँकेतर्फे प्रमोट करण्यात आली असून नॅशल हाउसिंग बँकेकडे (एनएचबी) ती नोंदणीकृत गृह वित्त कंपनी आहे. कंपनीची 7 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली होती. कंपनीद्वारे रिटेल ग्राहकांना गृह आणि इतर कर्ज पुरवठा केला जातो. कंपनी बांधकाम वित्त कर्ज ते रियल इस्टेट डेव्हलपर्स क्षेत्रातही कार्यरत आहे. पीएनबी हाउसिंग फायनान्स ही ठेवी स्वीकारणारी गृह वित्त कंपनी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...