ज्योती लॅब्जतर्फे मार्गो हँड सॅनिटायझर लाँच

Date:

ब्रँडतर्फे शिखात सहज मावणारी 40 मिलीची एसकेयू बाटली केवळी 20 रुपयांना

मुंबई – भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या ज्योती लॅब्ज लिमिटेड (जेएलएल) कंपनीने आज मार्गो या ब्रँड नावाअंतर्गत हँड सॅनिटायझर लाँच केला आहे. कंपनीने नुकताच याच ब्रँडअंतर्गत हँड वॉश क्षेत्रात प्रवेश केला होता.

सध्या सुरू असलेल्या साथीच्या वातावरणात साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझर अतिशय महत्त्वाचे झाले आहेकारण त्यामुळे सर्वाधिक सुरक्षा मिळते. मार्गो हँड सॅनिटायझर अल्कोहोल बेस्ड असून त्यात कडुनिंबाचा अर्क मिसळण्यात आला आहेजो 99.99 टक्के जंतूंचा नाश करतो. हे सॅनिटायझर 40 मिलीच्या एसकेयू बाटलीत उपलब्ध करण्यात आले असून त्याची किंमत 20 रुपये आहे. खिशात सहज मावणाऱ्या या बाटलीला फ्लिप ओपन कॅप असल्यामुळे तो जवळ बाळगणे आणखी सोपे आहे.

या लाँचविषयी ज्योती लॅब्ज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ज्योती एमआर म्हणाल्या, सध्या देशासमोर असलेल्या संकटामुळे आमच्या क्षेत्राला नवी उत्पादने तयार करण्याची प्रेरणा मिळाली असून त्यामुळे आरोग्य व स्वच्छता क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होईल. हे उत्पादन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करणे ही आमच्यासाठी समाजाची सेवा करण्याची ही सर्वात अनोखी संधी आहे. आम्ही अतिशय कमी कालावधीत मार्गो हँड सॅनिटायझर तयार केले असून त्याद्वारे कोव्हिड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी अर्थपूर्ण योगदान देणे शक्य झाले आहे.

कोव्हिड- 19 विरोधात लढताना स्वच्छता राखण्यासाठी साबण व पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझरचा सातत्याने वापर करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मार्गो हँड सॅनिटायझर लाँच करून कंपनीने सध्याच्या कठीण परिस्थितीत समाजाला मदत करण्यासाठी योगदान देण्याचे ध्येय ठेवले आहे.

मार्गो हँड सॅनिटायझर हे मार्गोच्या इतर उत्पादन श्रेणीतील सर्वात अद्यावत उत्पादन असून या श्रेणीमध्ये मार्गो ओरिजनल नीमचा समावेश आहेज्यात असलेला 1000 कडुनिंबाच्या पानांचा अर्क आणि आर्द्रतेसाठीच्या ई जीवनसत्वावर गेल्या 100 वर्षांपासून विश्वास ठेवला जात आहे. त्याशिवाय मार्गो ग्लिसरीन या अनोख्या त्वचा क्लीन्झरमध्ये कडुनिंबाची 1000 पाने व शुद्ध ग्लिसरीनचा मेळ घालण्यात आला आहे. मार्गो फेस वॉश हा भारतातील पहिला कडुनिंबाच्या पेस्टपासून बनवलेला फेसवॉश असून त्यासाठी हाताने खुडलेली व बारीक केलेली कडुनिंबाची पाने वापरण्यात आली आहेत. हा फेसवॉश त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेचा समतोल राखतो. या श्रेणीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गो हँडवॉशचा समावेश झाला असून या नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल हँडवॉशमध्ये 99.99 जंतूंचा नाश करणाऱ्या 1000 कडुनिंबाच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.

ज्योथी लॅबोरेटरीजबद्दल

श्री. एमपी रामचंद्रन यांनी १९८३ मध्ये ज्योथी लॅबोरेटरीज लि. या ही वेगाने विकसित होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूच्या कंपनीची स्थापना केली होती. इतक्या वर्षांत कंपनीने एका ब्रँडच्या प्रोप्रायटरी कंपनीचे मल्टी ब्रँड, बीएसई आणि एनएसई नोंदणीकृत कंपनीमध्ये रुपांतर केले आहे. या कार्यकाळात कंपनी फॅब्रिक केयर, मस्किटो रिपेलंट, सरफेस क्लिनिंग, वैयक्तिक सेवा आणि सुगंधी अगरबत्ती क्षेत्रातील उत्पादन आणि विपणन क्षेत्रांत कार्यरत आहे.

कंपनीचे दहा ब्रँड कार्यरत असून त्यात उजाला, मॅक्सो, एक्सो, प्रिल, मार्गो, नीम, चेक आणि श्री. व्हाइट यांचा समावेश असून हे सर्व ब्रँड्स त्यांच्या विभागात सुप्रसिद्ध आणि प्रस्थापित आहेत.

कंपनी संघटित लाँड्री क्षेत्रातील सेवा विभागातही कार्यरत असून ती ज्योथी फॅब्रिकेयर सर्व्हिसेस लिमिटेड या आपल्या उपकंपनीद्वारे ‘जागतिक दर्जाची लाँड्री सेवा, परवडणाऱ्या दरांत आणि घरपोच’ उपलब्ध करून देते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...