मर्सिडीज- बेंझतर्फे कोविड- 19 रुग्णांसाठी पुण्यात 1500 बेड्सच्या आयसोलेशन वॉर्डसह तात्पुरत्या हॉस्पिटलची उभारणी

Date:

जिल्हा परिषदेच्या मदतीने म्हाळुंगे- इंगले गावात तयार होणार असलेल्या या वैद्यकीय सुविधेच्या मदतीने 1500 लोकांची मदत होणार

 मर्सिडीज- बेंझ इंडियाचे कर्मचारी देणार एक दिवसाचा पगार, कंपनीतर्फे या रकमेइतक्याच रकमेचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी योगदान

  • या प्रदेशातील कोविड- 19 रुग्णांसाठी मर्सिडीज बेंझ इंडियातर्फे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आयसोलेशन विभाग आणि इतर वैद्यकीय सुविधांसह तात्पुरत्या हॉस्पिटलची उभारणी
  • महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (म्हाडा) नव्याने बांधण्यात आलेल्या 374 खोल्यांच्या गृहप्रकल्प परिसरात उभारणार हॉस्पिटल
  • पुणे आणि पीसीएमसी परिसराजवळील म्हाळुंगे- इंगले गाव, चाकण, खेड येथे उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये 1500 कोविड- 19 रुग्णांना ठेवण्याची सुविधा
  • कोविड- 19 परिस्थिती निवळल्यानंतर या हॉस्पिटलमधील वैद्यकीय उपकरणे खेड येथील सिविल हॉस्पिटलला दान केली जाणार, तर आयसोलेशन विभागातील मालमत्ता आदिवासी तरुण हॉस्टेलसाठी दिली जाणार
  • मर्सिडीझ- बेंझ इंडियातर्फे आयसोलेशन विभागाच्या स्थापनेसाठी लॉजिस्टिक मदतही केली जाणार
  • कंपनीने ग्रँट मेडिकल फाउंडेशनला (रूबी हॉल क्लिनिक) दान केले व्हेंटिलेटर्स
  • मर्सिडीझ- बेंझ इंडियातर्फे खेड आणि विमान नगर परिसरातील 1600 रोजंदारी कामगार तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना धान्य आणि स्वच्छता किट्सटची मदत

 पुणे – कोविड- 19 साथीच्या उद्रेकामुळे जगभरात तयार झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मर्सिडीझ- बेंझ इंडिया कंपनीने कोविड- 19 रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आयसोलेशन विभागाचा समावेश असलेले तात्पुरते हॉस्पिटल उभारण्याचे ठरवले आहे. नव्याने विकसित होत असलेले हे हॉस्पिटल म्हाळुंगे- इंगले गाव, चाकण खेड येथे वसवले जात असून त्यात आयसोलेशन विभाग आणि 1500 रुग्णांना समाविष्ट करून घेण्याची क्षमता असेल. मर्सिडीझ- बेंझ इंडियातर्फे जिल्हा परिषदेला तात्पुरत्या ओपीडीसाठी स्टे, स्ट्रेचर्स, व्हील चेयर्स, पीपीई किट्स, सॅनिटायझर्सयांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे व हॉस्पिटल आणि आयसोलेशन विभाग चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर मूलभूत सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने ग्रँट मेडिकल फाउंडेशनला (रूबी हॉल क्लिनिक) व्हेंटिलेटर्स दान केले आहेत.

मर्सिडीझ- बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले, या आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही स्थानिक समाज व स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या काळात परिस्थिती आणखी चिघळल्यास नवे वैद्यकीय सुविधा केंद्र स्थानिक प्रशासन व परिसरातील लोकांना उपयुक्त ठरेल. आम्ही स्थानिक समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून प्रशासनला शक्य त्या प्रत्येक मार्गाने मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संकटातून आपण लवकर सावरू आणि जीवन परत एकदा पूर्ववत होईल अशी आम्ही आशा करतो.

कंपनीने उचलेल्या या पावलामुळे सध्याच्या कठीण परिस्थिती वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास मदत होईल, शिवाय तात्पुरते केंद्र बंद झाल्यानंतरही समाजाला त्याचा नक्की फायदा होईल. कोविड- 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती मूळ पदावर आल्यानंतर हे वैद्यकीय केंद्र बंद होईल आणि तेथील वैद्यकीय उपकरणे खेडच्या सिविल हॉस्पिटलला दान केली जातील. त्याशिवाय आयसोलेशन विभागातील मालमत्ता सरकारी संघटनांच्या आदिवासी तरुण हॉस्टेलला दान केली जातील.

मर्सिडीझ- बेंझ इंडिया खेड आणि विमान नगरमधील 1600 कुटुंबांनाही मदत करणार आहे. कंपनीतर्फे त्यांना धान्य आणि स्वच्छता किट्सटची मदत

केली जाईल. मर्सिडीझ- बेंझ इंडियाची सध्याची भागीदार स्वयंसेवी संस्था शाश्वत ट्रस्ट आणि आश्रय ट्रस्ट फॉर चिल्ड्रेनतर्फे याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या कुटुंबांची जेवण आणि अन्नाची मे अखेरपर्यंतची गरज भागवली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...