युरोकिड्स समूहाच्या एक लाख विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण सेवा उपलब्ध

Date:

प्री- स्कूल्स आणि शाळा बंद असताना विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे उपक्रम

 मुंबई – बालपणातील प्राथमिक शिक्षण देणारी भारतातील आघाडीची कंपनी युरोकिड्स इंटरनॅशनलने लॉकडाउनमुळे देश बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवे उपक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक आणि बिगर- शैक्षणिक प्रगतीचे टप्पे पार करत राहाता यावेत आणि मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत हे या नव्या डिजिटल शिक्षण उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. शिवाय, हे उपक्रम लॉकडाउनच्या काळात मुलांना सकारात्मकपणे गुंतून राहाता यावे या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष आणि 9 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण सुरू असतानाच या नव्या उपक्रमामुळे करोना साथीपासून संरक्षण करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असताना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चिंतित असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

 प्री- स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी युरोकिड्स आणि कांगारू किड्सचा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या टीमने पालकांसाठी मुलांना दररोज थोडा वेळ गुंतवून ठेवता येईल असे आखीव उपक्रम तयार केले आहेत. यातील प्रत्येक उपक्रम पालकांना मुलांना नवे कौशल्य शिकवण्यासाठी व ते लक्षात ठेवण्यासाठी मदत करतील या मॉड्युल्सच्या कित्येक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे, त्यामुळे पालकांना सामाजिक अंतर राखण्याच्या काळात सहजपणे वाढू शकणारा मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे शक्य होईल. अपवर आधारित असलेल्या या मॉड्युल्समुळे साप्ताहिक पातळीवरील शिकतानाची प्रगती व त्यातील टप्पे जाणून घेता येतील व निरीक्षणांची नोंद करता येईल. शिक्षकही विविध संकल्पनांवर आधारित व्हिडिओज तयार करून ते पालकांना पाठवत आहेत आणि पालकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांची चॅटद्वारे उत्तरे देत आहेत.

के-12 मुलांसाठी म्हणजेच मुख्य प्रवाहातील शाळा – युरोस्कूल आणि बिलाबाँग हायमध्ये नव्या शैक्षणिक वर्षासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि रेकॉर्डेड सत्रांद्वारे नव्या शैक्षणिक वर्षांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. याला लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएस) अरगस आणि बिलाबॉक्सच्या माध्यमातून डिजिटल पुस्तके, प्रश्नोत्तरांचे सत्र आणि गृहपाठाची जोड देण्यात आली आहे. स्वयंशिक्षण पद्धतीला मदत व्हावी यासाठी शाळा थर्ड पार्टी स्त्रोतांकडून संदर्भ व्हिडिओज एलएमएस द अपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून प्रकल्पांवर आधारित चर्चा आणि सहकार्य करता येत आहे. स्वयं- मूल्यांकन वैशिष्ट्यांचा समावेश असलेले हे अप विद्यार्थी आणि पालकांना वेगवेगळ्या निकषांच्या आधारे शिक्षण व विकासाची प्रगती मोजण्याची संधी देते.

युरोकिड्स समूहाचे सह- संस्थापक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजोध राजन म्हणाले, ‘युरोकिड्स समूहामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि स्वास्थ्याला पहिले प्राधान्य देतो. सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर आम्ही करोना साथीमुळे विस्कळीत झालेल्या दिनक्रमातही शिक्षण सुरू ठेवण्याकडे आमचे लक्ष वळवले आहे. शिक्षणासाठी पूरक ठरतील अशा डिजिटल मालमत्तेमध्ये आम्ही केलेली गुंतवणूक आता अतिशय उपयुक्त ठरत असून आता आम्ही ते शाळेच्या पूर्ण साखळीमध्ये समाविष्ट केले आहे. तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यात व त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्याची संधी देण्यात, तर पालकांना मुलांच्या विकासाचे टप्पे जाणून घेण्यास मदत करण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहिलो आहोत. सध्याच्या परिस्थितीत आमच्या देशभरातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहाणे शक्य करण्यासाठी व त्यांना आवश्यक तो पाठिंबा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही शिक्षक व भागिदारांचे कौतुक करतो. अनिश्चितता आणि काळजीचा हा काळ सुरक्षित, अर्थपूर्ण आणि आनंदी शिक्षणात परावर्तित करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.’

युरोकिड्स इंटरनॅशनलबद्दल

भारतातील आघाडीची अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन आणि के- 12 शिक्षण कंपनी या नात्याने युरोकिड्स इंटरनॅशनलने ‘जॉय ऑफ लर्निंग’ हे ब्रीदवाक्य ठेवले आहे. शिक्षणपद्धतीचा सातत्यपूर्ण विकास, मुलांसाठी समग्र, पोषक आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण यांच्या मदतीने युरोकिड्स देशबरातील शिक्षणाचे स्वरुप बदलण्याच्या आपल्या धोरणाच्या अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. गेल्या 18 वर्षां युरोकिड्स इंटरनॅशनलने शैक्षणिक क्षेत्राचे स्वरुप बदलण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये युरोकिड्स प्री- स्कूल, कांगारू किड्स प्री- स्कूल, युरोकिड्स डे केयर, युरोस्कुल आणि बिलाबाँग हाय इंटरनॅशनल या सहा ब्रँड्सचा समावेश आहे. या ब्रँड्ससह कंपनी भविष्यातील पिढ्यांसाठी दमदार पाया घालण्यासाठी बांधील आहे. ‘चाइल्ड फर्स्ट’ हे कंपनीचे तत्वज्ञान असून त्यामुळे मुलांच्या विकास व शिक्षणाच्या गरजा घरगुती वातावरणात पूर्ण केल्या जातात. वाढीसाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या लहान वयात मुलांचा पालकांशी सुसंवाद आणि त्यांच्या सुरक्षिततेवर भर दिल्याने युरोकिड्स हे मुलांचे दुसरे घर बनले आहे. युरोकिड्स सध्या 350 शहरांत 1100 प्री- स्कूल्स व 35 शाळांसह कार्यरत असून कंपनी दररोज शिक्षणक्षेत्रातील नवे टप्पे पार करता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...