‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’तर्फे वंचित नागरिकांसाठी ‘कोविड-19’ची विनामूल्य चाचणी

Date:

अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांच्या भागिदारीत उपक्रम

मुंबई, एप्रिल 1, 2020 : भारतातील सर्वसाधारण विमा कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने ‘कोविड-19’च्या साथीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एक अनोखा ‘सीएसआर’ कार्यक्रम सुरू केला आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव असलेल्या अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल लि., अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइज लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. या कंपन्यांशी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने भागीदारी केली असून  देशातील वंचितांमध्ये ‘कोविड-19’चा प्रसार होऊ नये, यासाठी चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ‘कोविड-19’चे संक्रमण झालेल्या संशयितांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या चाचणी किटसाठी, तसेच संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’कडून वित्त पुरवठा करण्यात येणार आहे. या कंपनीने या उपक्रमासाठी  5 कोटी रुपयांची तरतूद केली असून याचा फायदा समाजातील वंचितांना होणार आहे.

‘कोविड-19’च्या चाचणीसाठी सध्या 4500 रुपयांचा खर्च येतो. यामध्ये चाचणी किटची किंमत, रुग्णांच्या घरी जाऊन नमुना गोळा करणे, त्याचे निदान करणे, चाचणीचे निष्कर्ष तय़ार करणे असे खर्च आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळलेल्या आणि चाचणी करण्याची अतिआवश्यकता असणाऱ्या 11 हजारहून अधिक वंचितांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. चाचणी किटची किंमत काही काळाने कमी झाल्यास आणखी काही रुग्णांना या उपक्रमाचा फायदा होईल. अंत्योदय रेशन कार्ड आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठीचे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी हा उपक्रम खासकरून आखण्यात आला आहे.

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भार्गव दासगुप्ता म्हणाले, “सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील वंचित नागरीक ‘कोविड-19’ची बाधा होण्याबाबत सर्वाधिक संवेदनशील आहेत. त्यांची वेळेवर तपासणी होणे ही या विषाणूच्या प्रसारास आवर घालण्याची पहिली पायरी आहे. आरोग्य विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी या नात्याने आम्ही आरोग्य सेवा देणाऱ्यांशी असलेले संबंध सुधारण्याचा विचार केला. अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल, मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांच्याशी आम्ही यासाठीच भागीदारी केली. ‘कोविड-19’च्या तपासणी मोहिमेत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये या उपक्रमातून आम्ही भर घालीत आहोत.’’

अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी म्हणाल्या,  “आरोग्य क्षेत्रातील या आणीबाणीच्या काळात ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने इतर कंपन्यांशी भागीदारी करून हा उपक्रम चालविला, याचे आम्ही कौतुक करतो. ‘कोविड-19’च्या संभाव्य रुग्णांची तपासणी अगदी वेळेत व जलद केल्याने या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होतील. ‘अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल’मध्ये आम्ही या उपक्रमाची तयारी केली असून यामुळे देशातील वंचितांचा खरोखरीच फायदा होईल.”

‘मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालिका अमिरा शहा म्हणाल्या, “या अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’बरोबर भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद आहे. ‘कोविड-19’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील वंचित घटकांची तपासणी अगदी त्वरीत केली जाण्याची गरज आहे. आम्ही महाराष्ट्रात हा चाचणी उपक्रम लवकरच सुरू करणार आहोत. पुढील काळात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन इतर राज्यांतही या उपक्रमाचा विस्तार करू.”

आयसीआयसीआय लोम्बार्ड, अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाईल आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर या कंपन्या आपापल्या जनसंपर्क माध्यमांतून या मोफत चाचणी उपक्रमाबाबत जागरुकता निर्माण करणार आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...