Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दुकानदारांसाठी ‘करोना व्हायरस विमा’ विमा उद्योगातील पहिलाच उपक्रम

Date:

मुंबई: ‘भारतपे’ या भारतातील सर्वात मोठ्या मर्चंट पेमेंट व कर्जपुरवठादार कंपनीने ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’बरोबर भागिदारी करून खास दुकानदारांसाठी ‘कोविड-19 संरक्षण विमा योजना’ सादर केली आहे. करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यास दुकानदारांना रुग्णालयीन खर्चाव्यतिरिक्त या नव्या योजनेनुसार विमा उतरविलेल्या रकमेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे. दुकानदारांसाठी अनेक उपक्रम सादर करणाऱ्या ‘भारतपे’च्या कार्यक्रमांत हा नवीन उपक्रम अनोखी भर घालणार आहे. तसेच ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चीदेखील ही व्यापाऱ्यांसाठीची अशा प्रकारची पहिलीच विमा योजना आहे.

या विम्याचे छत्र 25 हजार रुपये असून ते केवळ 199 रुपये इतक्या नाममात्र प्रीमियममध्ये मिळू शकेल. यामध्ये आरोग्य सहाय्य व चॅट/व्हर्च्युअल सहाय्य, दूरध्वनीवरून सल्ला आणि रुग्णवाहिका सहाय्य असे मूल्यवर्धित फायदेही पुरविण्यात येणार आहेत. या अनोख्या ‘कोविड-19 विमा संरक्षण’ कवचाचा लाभ 18 ते 65 या वयोगटातील व्यक्तींना घेता येईल.

या नवीन योजनेची माहिती देताना ‘भारतपे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर म्हणाले, ‘’व्यापाऱ्यांचे कल्याण हे आमचे उद्दीष्ट आहे. करोना व्हायरसची साथ पसरत चालल्यामुळे व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही हे खास विमा संरक्षण तयार केले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. करोनाची लागण झाल्यास त्याच्या पहिल्या निदानाच्या वेळीच दुकानदारांना एकरकमी साह्य म्हणून विमा उतरविलेली 100 टक्के रक्कम मिळेल. शा साथीच्या आजारांचा छोट्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम होत असतो आणि दुकानदारांना त्यांची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असतो. हा विमा ‘भारतपे अ‍ॅप’वर उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत आमच्या लाखो व्यापार्‍यांना डिजिटल पद्धतीने या विम्याचा लाभ घेता येईल, अशी आमची अपेक्षा आहे.’’

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, “आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आम्ही ग्राहकांना काळानुरूप सुसूत्र अशी उत्पादने नेहमीच पुरवित असतो, तसेच त्यांचे अतिरिक्त लाभ देऊ करीत असतो. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र होत असताना आम्ही त्या संदर्भात ‘कोविड-19 संरक्षण विमा कवच’ सादर केले आहे. ‘भारतपे’शी भागिदारी करून आम्ही त्यांच्या व्यापारी सदस्यांपर्यंत पोहोचू शकतो. या व्यापाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांना हे विम्याचे संरक्षण आवश्यक आहे. ‘निभाये वादे’ (आम्ही वचन पाळतो) या ब्रॅंड मूल्यासह आम्ही ग्राहक व व्यावसायिक यांच्या विमासंबंधित गरजा पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

भारतपेविषयी –

भारतीय व्यापाऱ्यांसाठी आर्थिक समावेशन प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने 2018  मध्ये ‘भारतपे’ची स्थापना अशनीर ग्रोव्हर आणि शाश्वत नाकरानी यांनी केली. ‘भारतपे’ने भारतातील पहिला ‘यूपीआय इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ सादर केलेला आहे. तसेच देशातील पहिली ‘झीरो एमडीआर पेमेंट स्वीकृती सेवा’, पहिले ‘यूपीआय पेमेंट आधारीत मर्चंट कॅश अ‍ॅडव्हान्स प्रॉडक्ट’ आणि व्यापाऱ्यांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज देऊ करणारी ‘पी2पी एनबीएफसी गुंतवणूक योजना’ ‘भारतपे’ने सुरू केली आहे. सध्या बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, नागपूर, चंदीगड, जोधपूर, लुधियाना, सूरत, पाटणा, करीमनगर, म्हैसूर, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि वरंगळ या शहरांतील एकूण 40 लाख व्यापाऱ्यांना भारतपे सेवा देत आहे. 2019 पर्यंत या कंपनीचा व्यवसाय 30 पटींनी वाढलेला आहे. एका महिन्यात 5 कोटींहून अधिक व्यवहार करणारी (वार्षिक टीपीव्ही 2.7 अब्ज डॉलर) भारतपे ही देशातील ‘यूपीआय ऑफलाइन’ क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने आतापर्यंत 140 कोटींहून अधिक रकमांची 25 हजार कर्जे वितरीत केलेली आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन...

एपस्टाइन फाईल १९ डिसेंबरला जाहीर होणार काय ? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात समजून घ्या …

पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein Files बाबत भारतात उडविली खळबळ अमेरिकेच्या...