व्होडाफोन व्होल्ट सेवा मुंबई, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि कोलकात्यात प्रथम सुरू होऊन नंतर देशभरात उपलब्ध होणार
· एचडी दर्जाचे व्हॉइस कॉल आणि वेगवान कॉल सेट अप टाइम
· व्होडाफोन सुपरनेट 4जी ग्राहकांना व्होल्ट (व्हॉइस ओव्हर एलटीई) सेवा मोफत मिळणार
भारतातील एक आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोनने व्होल्ट सेवा जानेवारी 2018 पासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे. व्होडाफोन व्होल्ट सेवा सध्या मुंबई, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि कोलकाता येथे सुरू होणार असून, काही काळातच त्या संपूर्ण देशात उपलब्ध केल्या जातील.
व्होडाफोनच्या व्होल्ट सेवांमुळे व्होडाफोन सुपरनेट 4जी ग्राहकांना एचडी दर्जाचा स्पष्ट आवाज आणि कॉल करण्यासाठीचा कमीत कमी वेळ अशा सुविधा उपलब्ध होतील. व्होडाफोन 4जी ग्राहकांना व्होल्ट सेवांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. या सेवांसाठी केवळ व्होडाफोन व्होल्ट सेवा ज्यावर चालू शकतील, असा हँडसेट आणि 4जी सिम लागेल.
व्होल्ट सेवांची घोषणा करताना व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद म्हणाले, ‘नवे तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांबरोबर व्होडाफोन भविष्यसज्ज होत आहे. व्हॉइस ओव्हर एलटीई अर्थात व्होल्ट सेवांमुळे ग्राहकाला एचडी दर्जाचे कॉलिंग, तसेच आणखी नव्या शक्यता उपलब्ध होतील. व्होल्ट सेवा हे भविष्यवेधी तंत्रज्ञान आणण्याच्या उद्देशातील महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे आमचे डेटा बळकट जाळेही अधिक सक्षम होईल.’
अद्ययावत तंत्रज्ञान वापरून व्होडाफोनने एक मोठे 140000 साइट्सचे डेटा सक्षम जाळे उभारले असून, यामुळे कॉल आणि मोबाइल इंटरनेट सेवेची गुणवत्ता अधिक वाढली आहे. ग्राहकांना सुविहितपणे कनेक्टिव्हिटी देण्यामध्ये व्होडाफोनसाठी हा एक कळीचा पैलू ठरणार आहे.