भारतातील बालके पुरेशी झोप घेत नाहीत: गोदरेज इंटेरिओचे स्लीप@10 सर्वेक्षण

Date:

36%  दिवसातून 6 तासांपेक्षा कमी झोपतात

  • 43% रात्री 12 नंतर झोपतात
  • केवळ 20% 10 वाजता झोपतात
  • 58% अगदी क्वचितच किंवा कधीही 10 वाजता झोपत नाहीत
  • 41% जण झोपण्यापूर्वी टीव्ही बघतात किंवा स्मार्टफोन वापरतात
  • 67% जणांना झोपून उठल्यावर झोपाळल्यासारखे व थकल्यासारखे वाटते

मुंबई: गोदरेज इंटेरिओ मॅट्रेसेस या भारतातील आघाडीच्या मॅट्रेसेसच्या हेल्थकेअर रेंजने जागतिक निद्रा दिनानिमित्त स्लीप@10 या आरोग्याविषयी जागृती करणाऱ्या उपक्रमांतर्गत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. मॅट्रेस ब्रँडने जाहीर केलेल्या नव्या माहितीनुसार, भारतातील 67% बालकांना झोपून उठल्यावर झोपाळल्यासारखे व थकल्यासारखे वाटते.

www.sleepat10.com या गोदरेज इंटेरिओ मॅट्रेसेसने 2017 मध्ये सुरू केलेल्या ग्राहकांसाठी जागृतीपर उपक्रमावरील स्लीप-ओ-मीटरकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये, देशातील बालकांमध्ये व प्रौढांमध्ये अपुरी झोप घेण्याचा आरोग्यासाठी हानीकारक ट्रेंड वाढत असल्याचे या सर्वेक्षणाने अधोरेखित केले आहे.

उशिरा झोपणे, लवकर उठणे, झोपेच्या अनियमित वेळा व अस्वस्थ झोप – हे अपुऱ्या झोपेशी निगडित असणारे व सहसा प्रौढांमध्ये दिसून येणारे प्रकारे आता भारतातील बालकांमध्ये व किशोरवयीनांमध्येही दिसून येऊ लागले आहेत. सर्वेक्षणाच्या मते, सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले अंदाजे 58% हून अधिक जण अगदी क्वचितच 10 वाजता झोपतात किंवा कधीही 10 वाजता झोपत नाहीत आणि अंदाजे 36% जण दिवसातून 6 तासांपेक्षा कमी झोपतात. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी केवळ 20% खरेच रात्री 10 वाजता झोपले. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बालकांपैकी 41% बालकांनी टेलिव्हिजन व फोन यांचा समावेश असणाऱ्या स्क्रीन टाइम“मुळे झोपण्याचा कालावधी पुढे ढकलला जात असल्याचे कबूल केले, तसेच सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बालकांपैकी 43% बालकांनी मध्यरात्रीनंतर झोपल्याचे सांगितले, तर आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते झोपण्यासाठी आदर्श वेळ रात्री साधारण 10 ही आहे.

संशोधनातील निष्कर्षांबद्दल बोलताना, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेसचे डॉ. अभिजीत देशपांडे यांनी सांगितले, “बालके आणि त्यांच्या झोपण्याच्या पद्धती व सवयी हा पालकांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. निरोगी राहण्यासाठी, दररोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी व योग्य झोप न घेतल्यास, शरीरात सायटोकाइन्स हे प्रोटिन निर्माण होत नाहीत. हे प्रोटिन संसर्ग व सूज यांच्यावर मात करते व प्रभावीपणे प्रतिकारक्षमता निर्माण करते. प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि विषाणू व आजार यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी झोप हा सर्वोत्तम पर्याय आहे. वेळेवर झोपणे आणि शरीराला जितकी गरजेची आहे तितकी विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. गोदरेज इंटेरिओ मॅट्रेसेसने केलेल्या स्लीप@10 सर्वेक्षणानुसार, 58% हून अधिक बालके अगदी क्वचितच 10 वाजता झोपतात किंवा कधीही 10 वाजता झोपत नाहीत आणि 36% जण दिवसातून 6 तासांपेक्षा कमी झोपतात. देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या कारणामुळे, देशातील पुढील पिढीला स्थूलतेचा धोका आहे, रिझनिंगमध्ये अडथळे येण्याची, भावनिक असमतोल होण्याची व अन्य मेडिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता निर्माण होते.”

स्लीप@10 च्या निष्कर्षांविषयी बोलताना, गोदरेज इंटेरिओचे सीओओ अनिल माथुर यांनी नमूद केले, “स्लीप@10 ही संकल्पना आमच्या हेल्थकेअर रेंजच्या उत्पादनांच्या विकासाच्या टप्प्यामध्ये निर्माण झाली. आम्ही त्यावर अधिक भर दिला असता, योग्य मॅट्रेस निवडण्यापेक्षा वेगळीच चिंता आहे, असे आमच्या निदर्शनात आले. देशामध्ये सध्या एका विषाणूमुळे चिंतेचे सावट निर्माण झाले असताना, प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी झोप हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. उपचारापेक्षा प्रतिबंध केलेला बरा आणि निरनिराळ्या प्रकारे सावधगिरी बाळगत असताना, बालके व किशोरवयीन यांच्या झोपेबद्दल योग्य काळजी घ्यायला हवी. 67% हून अधिक बालकांना झोपून उठल्यावर झोपाळल्यासारखे व थकल्यासारखे वाटते. आमच्या स्लीप-ओ-मीटरकडून घेतलेल्या आणखी माहितीनुसार, प्रौढांनाही झोपेची कमतरता जाणवत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. यामुळे देशाच्या भविष्याला धोका निर्माण होण्याची भीती असल्याने याविषयी चर्चा केली जाणे अत्यंत गरजेचे आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...