60 हजार वंचितांना ‘महिंद्र प्राइड प्रोग्राम’द्वारे कौशल्य व रोजगाराच्या संधी

Date:

– हा उपक्रम सुरू झाल्यापासून पुण्यातील सुमारे एक तृतीयांश तरुण झाले कुशल

पुणे – जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतातील 1.25 अब्ज लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या 25 वर्षाखालील वयाची आहे. हे लक्षात घेऊन महिंद्र समुहाने आपल्या सीएसआर उपक्रमामध्ये या तरुणांना कौशल्ये प्रदान करण्याचे 2007 मध्ये ठरविले. 2015 मध्ये सरकारने युवकांना कौशल्ये देणे व रोजगाराभिमुख बनविण्याचे धोरण आखले व त्यास प्राधान्य देऊन 2022 पर्यंत 50 कोटी युवकांना कुशल बनविण्याचे व देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

महिंद्रा प्राइड स्कूल (एमपीएस) हा महिंद्र समुहाचा के. सी. महिंद्र एज्युकेशनल ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असणारा प्रमुख युवा कौशल्य उपक्रम आहे. ‘एमपीएस’ला यामध्ये नांदी फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. अलीकडेच या समुहाने ‘महिंद्रा प्राइड क्लासरूम’ची (एमपीसी) सुरुवात केली. या संयुक्त उपक्रमांमधून ‘महिंद्रा प्राइड प्रोग्राम’ने महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत जवळपास 60 हजार वंचितांना सामर्थ्य दिले आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना मुख्य व्यावसायिक कौशल्य प्रदान करतो. आजच्या वाढत्या गतिशील वातावरणात या तरुणांच्या रोजगाराला यातून चालना मिळते.

महिंद्रा समुहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि के. सी. महिंद्रा एज्युकेशल ट्रस्टच्या कार्यकारी संचालिका शीतल मेहता यांनी सांगितले,, “महिंद्रा प्राइड स्कूल आणि क्लासरूममध्ये रोजगार मिळविण्यासाठीची कौशल्ये शिकवून युवकांना सक्षम बनविण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या देशाच्या या तरूण प्रतिभेला आकार दिल्यास आणि या युवकांना पुरेसे कौशल्य मिळाल्यास दीर्घकाळपर्यंत सकारात्मक सामाजिक-आर्थिक परिणाम होईल, याची आम्हाला कल्पना आहे. म्हणूनच आम्ही हा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि आपल्या समुदायांसाठी रोजगाराची आव्हाने, आघाडी आणि केंद्र यावर लक्ष केंद्रित करण्यास कटिबद्ध आहोत.”

देशातील अत्यावश्यक आर्थिक गरजा ओळखून ‘महिंद्रा प्राइड स्कूल’तर्फे युवकांना  व्यावसायिक कौशल्ये शिकवून रोजगारास पात्र बनविण्याचे कार्य केले जाते. एमपीएस कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यास अधिकाधिक समावेशक व प्रभावी करण्यासाठी महिंद्रा समूहाने देशभरातील तंत्रनिकेतने,  आयटीआय आणि कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये महिंद्रा प्राइड क्लासरूम सुरू करण्यासाठी राज्य सरकारांशी करार केला आहे.

महिंद्रा प्राइड स्कूल्स आणि महिंद्रा प्राइड क्लासेस यांचे राष्ट्रीय संचालक व नांदी फाउंडेशनचे राज अय्यर म्हणाले, “अनेक सुविधांपासून वंचित राहिलेल्या तरुणांना कौशल्य देऊन सक्षम बनविल्यास बंधनातून मुक्त होण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळतो. त्यायोगे त्यांच्या महत्त्वाकांक्षाही वाढवतात. आमच्याकडे वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेला अभ्यासक्रम आहे जो आजच्या तरूणांच्या व्यावसायिक गरजा भागवतो आणि त्यांना सध्याच्या व नजीकच्या भविष्यात उपयुक्त अशी कौशल्ये प्रदान करतो.”

पुण्यातील महिंद्रा प्राइड स्कूल सर्वात जुनी असून, देशभरातील अशा नऊ शाळांपैकी एक आहे. 2007 मध्ये स्थापना झाल्यापासून या संस्थेने 8 हजारहून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिले आहे. पुण्यातील ‘एमपीसी’समवेत एकत्रितपणे या संस्थेने अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षात सुमारे 20 हजार युवकांना सक्षम बनविले आहे.

महिंद्रा प्राइड स्कूलबद्दलः

2007 मध्ये स्थापित, महिंद्रा प्राइड स्कूलमार्फत (एमपीएस) सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील तरुणांवर (18-25 वर्षे) लक्ष केंद्रित करण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी), अधिसूचित जमाती (एनटी) आणि विनाअधिसूचित जमाती (डीएनटी) यांचा समावेश आहे. ग्रामीण युवकांवर लक्ष केंद्रित करून तेथील तरूण आणि स्त्रियांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते. आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा (आयटीईएस), संघटित रिटेल, आतिथ्य आणि क्यूएसआर, वाहन उद्योग क्षेत्र, तसेच स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्व विकास व अन्य सॉफ्ट स्किल्स अशा चार विभागांमध्ये प्रशिक्षण देण्याचे 90 दिवसांचे कार्यक्रम एमपीएसतर्फे आखण्यात येतात. यातून या युवकांना व्यावसायिक जगातील सध्याची आव्हाने सहजतेने पेलण्यात मदत होते. या कार्यक्रमांत युवकांची उपस्थिती शंभर टक्के असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला बस भाडे, वाहतूक भाडे (ट्रेन पास) आणि दररोजचा पौष्टिक आहार या सुविधादेखील प्रदान करण्यात येतात. महिंद्रा प्राइड स्कूलच्या या उपक्रमात प्रवेशासाठी प्रत्येकाची लेखी चाचणी व वैयक्तिक मुलाखत घेण्यात येते. नोकरीच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. त्यात प्रात्यक्षिक असाइनमेंट्स, विविध संस्थांना भेटी, रोल प्ले आणि इंटर्नशिपचा समावेश आहे. इंग्रजीतून संवाद साधणे, मूलभूत / प्रगत संगणक ज्ञान घेणे आणि जीवन कौशल्यांनी सुसज्ज बनणे अशा रितीने या युवकांना परिपूर्ण बनविण्याचा प्रय़त्न करण्यात येतो.  आतापर्यंत, सर्व नऊ ‘महिंद्र प्राइड स्कूल’मध्ये 39,000 पेक्षा जास्त तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महिंद्रा प्राइड क्लासरूम्सबद्दल:

इंग्रजी बोलणे, जीवन कौशल्ये शिकणे, योग्यता, मुलाखत, गट चर्चा आणि डिजिटल साक्षरता या विषयांयासाठीचे 40-120 तासांचे प्रशिक्षण अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘महिंद्र प्राईड क्लासरूम्स’मध्ये देण्यात येते. आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ईशान्येकडील राज्ये, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू अशा 17 राज्यांमध्ये महिंद्र प्राइड क्लासरूम मॉड्यूलद्वारे आतापर्यंत 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...