2019 मध्ये सिंगापूरसाठी ठरली भारत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रवासी बाजारपेठ

Date:

पाचव्यांदा एक दशलक्ष प्रवाशांचा टप्पा पार तसेच क्रुझ पर्यटनात आघाडीच्या स्त्रोत बाजारपेठेचे स्थान कायम

पुणे-मध्ये सलग पाचव्या वर्षी सिंगापूरने एक दशलक्षांपेक्षा जास्त भारतीय पर्यटकांचे स्वागत केले असून हा देश भारतीय पर्यटकांच्या यादीतील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असल्याचे परत अधोरेखित झाले आहे. सिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) जाहीर केले आहे, की 1.42 प्रवासी आणि 2.0 टक्के घट यांसह भारताने तिसरे स्थान राखले असून चीन आणि इंडोनेशिया सिंगापूरच्या व्हिजिटर अरायव्हल (व्हीए) सोर्स मार्केटमध्ये भारताच्या पुढे आहेत.

सिंगापूरला भेट देणाऱ्या भारतीयांमध्ये देशातील चार महत्त्वाच्या शहरातील (मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि दिल्ली) नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. इतर महत्त्वांच्या तसेच दुय्यम श्रेणीतील शहरांच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी एसटीबीने आखलेल्या धोरणामुळे कोलकाता, हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद आणि तिरुचिरापल्ली यांसारख्या शहरांतील नागरिकांचाही सिंगापूरला भेट देणाऱ्यांमध्ये समावेश झाला आहे. सिंगापूरसाठी क्रुझ पर्यटनाद्वारे सर्वाधिक पर्यटक देणाऱ्यांमध्येही भारताने आघाडीचे स्थान राखले आहे. जागतिक पातळीवर सिंगापूरने सलग चौथ्या वर्षी व्हिजिटर अराव्हयल आणि पर्यटन रिसिट्समध्ये विक्रमी वाढ नोंदवली आहे. 2019 मध्ये व्हिजिटर अरायव्हलसमध्ये (व्हीए) 3.3 टक्क्यांची वाढ होऊन ही संख्या 19.1 दशलक्ष व्हिजिटर्सवर गेली आहे.

एसटीबीसाठी भारतीय बाजारपेठेत 2019 हे वर्ष घडामोडींनी भरलेलं होतं. एसटीबीने ‘पॅशन मेड पॉसिबल’ या डेस्टिनेशन ब्रँडचा जोरदार प्रचार केला आणि कुटुंब, नोकरदार तरुणाई, क्रुझ पर्यटक आणि मीटिंग आणि सवलत पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले. याच वर्षात एसटी+आर्ट इंडिया फाउंडेशन आणि इम्प्रेसारियो समूहाच्या सहकार्याने ‘सिंगापूर वीकेंडर 2.0’ हा तीन दिवसीय प्रयोगशील स्ट्रीट आर्ट ग्राहक उपक्रम, नाविन्यपूर्ण वेब सीरीजसाठी त्रिपोटोबरोबर भागिदारी, तारक मेहता का उल्टा चष्मा आणि राजा रानी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून सिंगापूरच्या वेगवेगळ्या पैंलुंचे दर्शन असे नवीन उपक्रम आखण्यात आले. त्याशिवाय एसपी बालासुब्र्हमण्यम आणि केजे येसुदास यांसारख्या दिग्गजांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या सांगितिक प्रसार कार्यक्रमाला दाक्षिणात्य बाजारपेठांत चांगला प्रतिसाद मिळाला.

 

खवैय्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एसटीबीने व्हूटसारखा आघाडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सेलिब्रेटी शेफ सारांश गोलिया यांच्यासोबत ‘चीट वीक इन सिंगापूर’ ही तीन भागांची व्हिडिओ मालिका बनवली, ज्यात सिंगापूरमधली खाद्यजत्रा अनोखी रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड आणि नाइटलाइफच्या माध्यमातून दाखवण्यात आली. सिंगापूरची खरी चव भारतात आणण्यासाठी एसटीबीने झोमॅटोबरोबर झोमालँड सीझन 2 हा विविध शहरांतील खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा महोत्सव भारतातील दहा शहरांत आयोजित करण्यात आला होता.

‘ग्रोइंग कनेक्शन्स, अचिव्हिंग टुगेदर’ या संकल्पनेअंतर्गत काम करणाऱ्या एसटीबीने 30 शहरांत पोहोचत पर्यटन मध्यस्थांबरोबर संवाद साधला. 2019 मध्ये भारताने सिंगापूरच्या पर्यटनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्री. जीबी श्रीथर, प्रादेशिक संचालक (भारत, मध्य पूर्व, दक्षिण आशिया) म्हणाले, ‘आम्हाला कायम पाठिंबा देणाऱ्या आणि भारत आमच्यासाठी आघाडीची स्त्रोत बाजारपेठ राहील याची खात्री करणाऱ्या पर्यटन- व्यापार समुदायाचे आम्ही आभारी आहोत. विमानसेवेत झालेली घट तसेच वर्षभरात विविध अडथळे आल्यानंतरही आम्ही वेग घएतला आणि 2019 मध्ये भारतातील 1.42 दशलक्ष पर्यटकांचे स्वागत केले. कोव्हिद- 19 परिस्थितीमुळे खराब सुरुवात झालेल्या 2020 मध्येही भागधारकांचा असाच पाठिंबा मिळेल अशी आशा वाटते.’

सिंगापूरमधील कोव्हिद- 19 परिस्थितीशी संबंधित ताज्या घडामोडींबाबत ते म्हणाले, ‘विषाणूंमुळे संपूर्ण जगभरातील प्रवास क्षेत्राला फटका बसला असून सिंगापूरलाही तीच समस्या जाणवत आहे. मात्र, सिंगापूर ही समस्या पारदर्शक पद्धतीने हाताळत आहे. कोव्हिद- 19 चे निदान आणि प्रसार रोखण्यासाठी सिंगापूर घेत असलेल्या प्रयत्नांचे आरोग्यतज्ज्ञांनीही कौतुक केले आहे. आम्ही सातत्याने भारतातील पर्यटन भागधारकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना वेळोवेळी अद्यावत माहिती देत आहोत. सिंगापूर पर्यटन क्षेत्र उदा. हॉटेल्स, लक्षवेधी केंद्रे आणि मॉल्स व्यवसायासाठी खुले आहेत.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...