नव्या शाइन BSVI मध्ये 5-स्पीड ट्रान्समिशन आणि 14% अधिक मायलेज

Date:

  • कामगिरी व कार्यक्षमता: eSP (एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर) चे बळ असणारे 125cc HET BSVI PGM-FI इंजिन
  • #एक्वाएटरिव्होल्यूशन: पेटण्टेड NEWACG स्टार्टर मोटरमुळे प्रत्येक वेळी झटपट, विना-आवाज, विना-झटका स्टार्ट
  • मायलेजमध्ये वाढ: शाइन BSVI पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या मदतीने 14% अधिक मायलेज
  • NEW 5-स्पीड ट्रान्समिशनमुळे हळूवार व कार्यक्षम राइड शक्य
  • NEW डीसी हेडलॅम्प सोयीस्कर कमी वेग व रात्रीचे रायडिंग यासाठी सातत्याने इल्युमिनेशन देतो
  • NEW इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच: एकाच स्विचने इंजिन स्टार्ट/स्टॉप करण्याची सोय
  • NEW इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम पासिंग स्विच: दोन्ही कामे नियंत्रित करण्यासाठी एकच स्विच
  • नवीन प्रीमिअम रूप: क्रोम गार्निशसह फ्रंट व्हिजर, साइड कव्हर्सवर क्रोम स्ट्रोक, भव्य ग्राफिक्स व आकर्षक क्रोम मफलर यामुळे रूप अधिक खुलते
  • अतिशय आकर्षक: नवीन मीटर डिझाइन, स्मार्ट टेललॅम्प व ब्लॅक अलॉइज यामुळे वेधक रुप
  • विशष 6-वर्षे वॉरंटी पॅकेज
  • शाइन BSVI 2 प्रकारांमध्ये उपलब्ध ड्रम व डिस्क

नवी दिल्ली, – भारतातील ग्राहकांच्या पसंतीची 125cc मोटरसायकल आता #क्वाएटरिव्होल्यूशनमुळे अधिक प्रगत झाली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने आज शाइन दाखल केली. अत्याधुनिक शाइनची किंमत 67,857 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

अत्याधुनिक शाइन BSVI याविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिनोरु कातो यांनी सांगितले, परिवर्तनाच्या आगामी काळाचे नेतृत्व करत, होंडाने आधीच 2.5 लाखांहून अधिक ग्राहकांसाठी आधुनिक BSVI मॉडेल दाखल केली आहेत. ग्राहकांनी व मीडियाने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज, आम्ही अत्याधुनिक शाइन BSVI दाखल करत असताना आम्ही 125cc मोटरसायकलमधील आणखी एकक्वाएट रिव्होल्यूशनसादर करणार आहोत आणि भारतातील व्यवसाय विस्तार अधिक बळकट करणार आहोत, याची खात्री आहे.”

पूर्णतः नवी शाइन BSVI, दाखल करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, शाइनला मिळालेले यश हे 8 दशलक्ष आनंदी ग्राहकांनी या उत्पादनावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. होंडाचे सरस तंत्रज्ञान, 5-स्पीड ट्रान्समिशन व नवीन वैशिष्ट्ये यामुळे शाइन BSVI 14% अधिक इंधनक्षमता देते. शाइन BSVI फेब्रुवारी 2020 च्या अखेरीपासून आमच्या नेटवर्कमध्ये येण्यास सुरुवात होईल.उत्कृष्ट

शाइनला BSVI भारत स्टेज VI कम्प्लायंट होंडाचे विश्वासार्ह 125cc PGM-FI HET (होंडा इको टेक्नालॉजी) इंजिन असून त्यास एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) NEW चे बळ आहे.

पूर्णतः नव्या शाइन BSVI ने भविष्यातील तंत्रज्ञान आताच उपलब्ध केले आहे – सोफिस्टिकेटेड, प्रिसाइज व सेन्सिटिव्ह एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) NEW.

एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) मध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे:

विशेष होंडा ACG स्टार्टर NEW: यामुळे, करंट निर्माण करण्यासाठी व राइड करत असताना बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरद्वारे इंजिन विना-धक्का सुरू होते. यामुळे पारंपरिक स्टार्टर मोटरची गरज भासत नाही, त्यामुळे गिअरचा आवाजही होत नाही.

दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे इंजिन कमी प्रयत्नांमध्ये सुरू होते – पहिले म्हणजे, थोड्याश्या उघडलेल्या एक्झॉस्ट व्हॉल्व्हमुळे डिकम्पोझिशनचा कार्यक्षम वापर (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला), त्यानंतर स्विंग बॅक NEW वैशिष्ट्यामुळे इंजिन थोडेसे विरुद्ध दिशेला फिरवले जाते व त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ घेणे शक्य होते आणि इंजिन कमी ताकदीनेही सुरू होते.

प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-FI)NEW: विशिष्ट इंजिन डाटा आणि 6 इंटलिजंट सेन्सर्स यांच्याकडून सातत्याने मिळालेली प्रतिक्रिया यानुसार सिलिंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरले जाते. त्यामुळे सुरळीत व लिनिअर पॉवर आउटपुट थ्रुपुटची निर्मिती केली जाते.

स्टार्ट सोलनॉइडNEW ऑटोमॅटिक चोक सिस्टीमसारखे मदत करते व योग्य एअर फ्युएल मेळ साधते व केव्हाही वन टाइम स्टार्ट ही सोय देते.

 फ्रिक्शनमध्ये घट: ऑफसेट सिलिंडर आणि नीडल बेअरिंगसह रोलर रॉरचा वापर केल्याने फ्रिक्शन लॉस कमी होतो. यामुळे सुरळित व उत्तम पॉवर आउटपुट  मिळतो, शिवाय इंधनक्षमताही वाढते. पिस्टन कूलिंग जेटमुळे कूलिंग कार्यक्षमता वाढते आणि इंजिन तापमान योग्य राखले जाते.

 मायलेजमध्ये वाढ: पूर्णतः नवी शाइन BSVI ही 14% अधिक इंधनबचत करते. याचे कारण म्हणजे, जगभर नावाजलेल्या eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असणारे पूर्णतः नवे 125cc HET इंजिन यामध्ये समाविष्ट आहे.

HET ट्युबलेस टायर (लो रोलिंग रेझिस्टन्स टायर): शाइन BSVI मध्ये रिअर HET टायर (लो रोलिंग रेझिस्टन्स टायर) आहे. नवीन टायर कम्पाउंड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे टायर ऊर्जेचा अपव्यय टाळतात आणि योग्य ग्रिप कायम राखतात.

सुरळित राइड करण्यासाठी रस्त्याच्या स्थितीनुसार 5-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन ठरवता येऊ शकते. त्यामध्ये सील चेनचाही समावेश असल्याने वारंवार अॅडजस्टमेंट करावी लागत नाही व मेंटेनन्सही कमी आहे. इक्विलायझरसह कॉम्बी-ब्रेक सिस्टीम (सीबीएस)5-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन नव्या शाइन BSVI वरील प्रत्येक राइड आरामदायी व सोयीची बनवणार आहेत.

ग्राउंड क्लीअरन्समध्ये वाढ (+5mm) केल्याने रायडरचा आत्मविश्वास व आरामदायीपणा वाढणार आहे. लाँगर व्हीलबेस (+19mm) असल्यामुळे स्थिरता व समतोल यामध्ये वाढ होईल. लांब सीट (+27mm) आणि इंधन टाकीशी सुरळित एकात्मिकरण यामुळे लांबच्या प्रवासामध्ये आरामदायीपणा मिळण्यासाठी पुरेशी जागा मिळते.

 या उद्योगातील आणखी एक पहिलेवहिले वैशिष्ट्य म्हणजे, शाइन BSVI वर होंडा विशेष 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेजNEW (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी विस्तारित वॉरंटी) दिले जाणार आहे.

शाइन BSVI दोन प्रकारांमध्ये (ड्रम व डिस्क) उपलब्ध होईल आणि 4 रंगांमध्ये मिळेल – ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलक, रिबेल रेड मेटॅलिक व अथलिट ब्लु मेटॅलिक.पूर्णतः नव्या शाइन BSVI ची किंमत 67,857 रुपयांपासून (किंमत एक्स-शोरूम, दिल्ली).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...