होंडा 2व्हीलर्सचा पाइन लॅब्सबरोबर एमओयू; 20 क्रेडिट व डेबिट कार्डांसाठी ईएमआयवर खरेदी करण्याचा नवा पर्याय

Date:

ग्राहकांसाठी फायदे:

1.    शून्य डाउन-पेमेंट

2.    वाहन खरेदी व कर्ज पूर्ण होणे या वेळी शून्य हायपोथिकेशन शुल्क

3.    बँकेडून एनओसीची गरज नाही

4.    डॉक्युमेंटेशन नाही

5.    कर्ज मंजुरीसाठी थांबण्याची गरज नाही

6.    वाहनाची तातडीने डिलेव्हरी

Ø  आशियातील आघाडीचा मर्चंट कॉमर्स प्लॅटफॉर्म पाइन लॅब्स आता होंडा 2व्हीलर्स ग्राहकांसाठी देणार ईएमआय सुविधा

Ø  एमओयू हा पर्याय 14 क्रेडिट व 6 डेबिट कार्डांवर देणार असल्याने किफायतशीरता वाढणार

Ø  डाउन पेमेंट नसल्याने किंवा वेळखाऊ कर्ज मंजुरीसाठी वेळ लागणार नसल्याने इस्टंट ईएमआय योजनेमुळे ही प्रक्रिया सुरळित होणार  

Ø  केवळ होंडा 2व्हीलर ग्राहकांसाठी या उद्योगातील पहिली ऑफर: 4000 रुपयांपर्यंत 5% कॅशबॅक देणारी आणि 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत वैध असणारी एसबीआय क्रेडिट कार्डधारकांसाठी विशेष योजना

नवी दिल्ली: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने पाइन लॅब्स या आशियातील आघाडीच्या मर्चंट कॉमर्स प्लॅटफॉर्मशी आज परस्पर सामंजसय करार (एमओयू) करार केला आहे. होंडा डीलरशिपमध्ये उपलब्ध नव्या पाइन लॅब्स पीओएस मशीनमुळे डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना आता सोयीस्कर व किफायतशीर ईएमआय (इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट) या स्वरूपामध्ये खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया आणि पाइन लॅब्सचे चीफ बिझनेस ऑफिसर कुश मेहरा व पाइन लॅब्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर व्येंकट परुचुरी यांनी अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, 14 क्रेडिट व 6 डेबिट कार्डधारकांना सक्षम करणाऱ्या नव्या सहयोगाला औपचारिक स्वरूप दिले.

साधारणतः, 2व्हीलर खरेदी करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करताना दोन शुल्के लागू होतात – वाहन खरेदी करताना पेमेंट व हायपोथिकेशन फी, आणि त्यानंतर कर्ज पूर्ण करताना दुसरे शुल्क. याचबरोबर, खरेदी करत असताना ग्राहकाला बँकेकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ सादर करावे लागते, आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन अथॉरिटीला हायपोथिकेशन रिमूव्हलसाठी पैसे भरावे लागतात.

पाइन लॅब्सबरोबरच्या होंडाच्या नव्या एमओयूमुळे, ग्राहकांना आता खात्रीने अतिरिक्त फायदे मिळणार आहेत, जसे शून्य डाउन-पेमेंटडॉक्युमेंटेशन नाहीकर्ज मंजुरीसाठी थांबण्याची गरज नाहीशून्य हायपोथिकेशन शुल्क किंवा संबंधित बँकेडून एनओसीची गरज नाहीपाइन लॅब्सच्या पीओएसवरील ईएमआय सुविधेमुळे कार्डधारकांना होंडा 2व्हीलर्स खरेदी करण्यासाठी ईएमआयवर आधारित खरेदी करणे शक्य होते.

प्रत्येक दुसरा टू-व्हीलर ग्राहक आता रिटेल फायनान्सच्या मदतीने टू-व्हीलर खरेदी करतो. पाइन लॅब्स पीओएसवरील नवीन ईएमआयमुळे आता वेळ व डॉक्युमेंटेशन यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच, ग्राहकांना वाहन खरेदीचा उत्तम अनुभव मिळत आहे व तातडीने डिलेव्हरी मिळते आहे. या योजनेच्या अंतर्गत, एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना 40000 रुपयांच्या किमान खरेदीवर 5% पर्यंत किंवा 4000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते आणि ही योजना 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत वैध आहे.

2व्हीलर श्रेणीमध्ये किफायतशीर पर्यायाची वाढती गरज लक्षात घेऊन, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “हा उद्योग BS-VI च्या दिशेने जात असताना, टू-व्हीलरच्या किमती आता 10% ते 15% वाढत आहेत. परिणामी, प्रत्येक दुसरा ग्राहक आता रिटेल फायनान्सवर खरेदी करत आहे. पाइन लॅब्सबरोबरच्या या भागीदारीमुळे ग्राहकांची खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. त्यांना आता खरेदीच्या वेळी तातडीने ईएमआय पर्याय मिळवता येऊ शकतो. त्यांना शून्य डाउन-पेमेंट, कर्ज मंजुरीसाठी शून्य प्रतीक्षा आणि त्यांच्या पसंतीच्या टू-व्हीलरची तातडीने डिलेव्हरी, तसेच डॉक्युमेंटेशनची गरज नाही, हे फायदे मिळतील.

एचएमएसआयबद्दलच्या भागीदारीविषयी बोलताना, पाइन लॅब्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर व्येंकट परुचुरी यांनी सांगितलेपाइन लॅब्स पीओएस मशीनवर विविध बँक पार्टनरच्या मदतीने, डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना तातडीने 2 व्हीलर ईएमआय देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पीओएसवरील ईएमआय ही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान-प्रणित वित्तीय सेवा असून ती ग्राहकांना कर्ज देण्याची क्लिष्ट प्रक्रिया झटपट डिजिटल सेवेद्वारे सुरळित करण्यासाठी मदत करते. यामुळे एचएमएसआयच्या डीलरना ऑर्डर व डिलेव्हरी यातील कालावधी कमी करणेही शक्य होणार आहे. किफायतशीरता या पैलूवर आमचा अधिक भर असून, या भागीदारीमुळे आम्हाला एचएमएसआयच्या भारतभरातील ग्राहकांना जलद व सोयीचे आर्थिक पर्याय देणे शक्य होणार आहे.

 

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.विषयी

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एमएमएसआय) या जपानमधील होंडा मोटर कंपनीच्या (जगातील पहिल्या क्रमांकाची टू-व्हीलर कंपनी) 100% उपकंपनीने मे 2001 मध्ये भारतीय 2व्हीलर कार्याला सुरुवात केली. सध्या 19व्या वर्षात कार्यरत असणाऱ्या होंडा 2व्हीलर्स इंडियाने 46 दशलक्षहून अधिक आनंदी ग्राहक मिळवून भारतातील सर्वात विश्वासार्ह टू-व्हीलर ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. BS-VI युगामध्ये #एक्वाएटरिव्होल्युशनचे नेतृत्व करणारी पहिली कंपनी म्हणून, होंडा उत्पादने ग्राहकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान (जसे eSP, PGM-FI, सायलेंट स्टार्ट, इ.), या श्रेणीतील पहिलीवहिली अशी अनेक वैशिष्ट्ये, उत्तम मायलेज व या उद्योगातील पहिले पर्यायी 6-वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी विस्तारित वॉरंटी) उपलब्ध करते.

 

पाइन लॅब्सविषयी

पाइन लॅब्स हा आशियातील एक आघाडीचा मर्चंट कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. विशेष क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म असल्यामुळे पाइन लॅब्सला विविध प्रकारचे पेमेंट स्वीकारणे व मर्चंट कॉमर्स सोल्यूशन देणे शक्य होते. पाइन लॅब्सच्या स्टोअर्ड व्हॅल्यू प्लॅटफॉर्ममध्ये कॉर्पोरेट ग्राहकांसाठी डिजिटल गिफ्ट कार्ड जारी करणे, प्रक्रिया करणे व वितरित करणे, यांचा समावेश आहे. पाइन लॅब्सच्या ग्राहकवर्गामध्ये भारत, आग्नेय आशिया व मध्य पूर्व येथील प्रामुख्याने मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या मर्चंटचा समावेश आहे. पाइन लॅब्सची स्थापना सिंगापूरमध्ये करण्यात आली आहे. पाइन लॅब्सच्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये पुढील गुंतवणूकदार समाविष्ट आहेत – सिक्वोइया इंडिया, अॅक्टिस कॅपिटल, टेमासेक, पेपल, मास्टरकार्ड व सोफिना.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...