शाओमी इंडियातर्फे स्मार्टफोन, रेडमी 8A ड्युएल दाखल

Date:

रेडमी 8A ड्युएल हा ड्युएल रिअर कॅमेरा सेट-अपमध्ये उपलब्ध

रेडमीने रेडमी पॉवर बँकेद्वारे आपलया पोर्टफोलिओमध्ये स्मार्टफोनच्या पलीकडे केली वाढ

बेंगळुरू – शाओमी या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन व स्मार्ट टीव्ही ब्रँडने बेस्टसेलिंग रेडमी ए सीरिज स्मार्टफोनची नवी आवृत्ती दाखल केली आहे – नवीन ऑरा एक्सग्रिप डिझाइन व ड्युएल रिअर कॅमेरा असणारा रेडमी 8A ड्युएल. रेडमीने रेडमी पॉवर बँक 10000mAh व रेडमी पॉवर बँक 20000mAh याद्वारे आपल्या उत्पादनांमध्येही विस्तार केला आहे.

रेडमी 8A ड्युएलदेशातला दमदार स्मार्टफोन

रेडमी 8A ड्युएलने एक पाऊल पुढे टाकले आहे आणि पहिल्यांदाच रेडमी ए सीरिजमध्ये दुहेरी कॅमेरा समाविष्ट केला आहे. त्यामध्ये 2MP डेप्थ सेन्सरचे पाठबळ असणारा 13MP प्रायमरी सेन्सर आहे व त्यामुळे अचूक पोर्ट्रेट टिपता येते. हार्डवेअरमध्ये शाओमीच्या सक्षम एआय सिन डिटेक्शन व एआय पोर्ट्रेट मोडचा समावेश आहे. पुढील भागात, सेल्फी, व्हीडिओ कॉल व एआय फेस अनलॉक या सुविधांसाठी 8MP कॅमेरा आहे.

रेडमी 8A मध्ये दाखल केलेल्या व लोकप्रिय झालेल्या ऑरा वेव्ह ग्रिप डिझाइनमध्ये सुधारणा करून रेडमी 8A ड्युएलमध्ये पूर्णतः नवे ऑरा एक्सग्रिप डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहे. मागील बाजूला मेश पॅटर्न असल्याने चांगली ग्रिप मिळणार असल्याने, ऑरा एक्सग्रिप डिझाइनमुळे उत्तम अनुभव मिळेल.

रेडमी 8A ड्युएलवरील 15.8cm (6.2) डॉट नॉच HD+ IPS डिस्प्लेचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 असून, अप्रतिम अनुभव देतो. त्यामध्ये 18W जलद चार्जिंगच्या (बॉक्समध्ये 10W जलद चार्जर) मदतीने, 5000mAh उच्च क्षमतेची दोन-दिवसांसाठी बॅटरी समाविष्ट केली आहे. टाइप-सी पोर्टद्वारे रिव्हर्स चार्जिंगलाही पाठिंबा दिला जातो. संपूर्ण रेडमी स्मार्टफोन पोर्टफोलिओमध्ये आता टाइप-सी पोर्ट आणि 18W जलद चार्जिंगची सुविधा आहे. क्वालकॉम® स्नॅपड्रॅगन™ 439 ऑक्टा-कोअर चिपसेटमुळे कामगिरीची दक्षता घेतली जाते. हा स्मार्टफोन 2GB+32GB व 3GB+32GB अशा दोन प्रकारांमध्ये 2+1 ड्युएल सिम स्लॉटसह उपलब्ध आहे. खास मायक्रोएसडी कार्डमुळे स्टोअरेज 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

सर्वोच्च गुणवत्तेचे आश्वासन देत, रेडमी 8A ड्युएल अतिशय टिकाऊ आहे. याचे श्रेय फोन खाली पडल्यास व त्यावर पाणी सांडल्यास अनुक्रमे कॉर्निंग® गोरिला® गलास 5 व P2iचे नॅनो-कोटिंग यांना जाते.

रेडमी 8A ड्युएलथोडक्यात वैशिष्ट्ये

 

रेडमी 8A ड्युएल
15.8cm (6.22) 19:9 HD+ डॉट नॉच डिस्प्ले

कॉर्निंग® गोरिला® ग्लास 5 प्रोटेक्शन

13MP प्रायमरी कॅमेरा

2MP डेप्थ कॅमेरा

8MP फ्रंट कॅमेरा

AI पोर्ट्रेट मोड

AI फेस अनलॉक

क्वालकॉम® स्नॅपड्रॅगन™ 439

ऑक्टा-कोअर, 2.0GHz

2GB+32GB व 3GB+32GB प्रकार
ड्युएल सिम + मायक्रोएसडी स्लॉट (512GB पर्यंत एक्स्पांडेबल)
5000mAh बॅटरी

यूएसबी टाइप-सी

18W जलद चार्जिंगची सुविधा (10W बॉक्समध्ये जलद चार्जर)

वायरलेस एफएम रेडिओ
P2i स्प्लॅश-प्रूफ नॅनो-कोटिंग
156.48 × 75.41 × 9.4mm

190g

 शाओमी इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुज शर्मा यांनी सांगितले, आम्ही रेडमी ए सीरिज स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येकाला सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्यावर सातत्याने भर दिला आहे. रेडमीची ए सीरिज ही आघाडीच्या स्मार्टफोन सीरिजपैकी एक असूनआयडीसीच्या क्वार्टर्ली मोबाइल फोन ट्रॅकर, Q4 2019 च्या अनुसाररेडमी 6A हा 2019 मधील सर्वात शिपिंग केलेल्या स्मार्टफोनपैकी एक ठरला आहे. रेडमी 8 सीरिजनेही शाओमीच्या वार्षिक 15.9% वाढीमध्ये योगदान दिल्याचे आयडीसीच्या क्वार्टर्ली मोबाइल फोन ट्रॅकर, Q4 2019 मध्ये म्हटले आहे. ग्राहकांना व चाहत्यांना रेडमी 8A ड्युएलही नक्की आवडेल. रेडमी पॉवर बँकमुळे रेडमी आता स्मार्टफोनपलीकडे जाऊन सेवा देत आहे आणि यापुढेही उत्पादनांमध्ये विस्तार करणार आहे.’’

 रेडमी पॉवर बँकरेडमीला अधिक बळ

स्मार्टफोनपलीकडे जाऊन विविध श्रेणींमध्ये विस्तार करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून, रेडमीने 10000mAh व 20000mAh या प्रकारांतील रेडमी पॉवर बँक ही पहिली अॅक्सेसरी दाखल केली आहे. रेडमी पॉवर बँकमध्ये कमीत कमी डिझाइन वापरले आहे आणि पॉवर बँक हातातून पडू नये, यासाठी अँटि-स्लिप एज ग्रिप डिझाइन वापरले आहे.

रेडमी पॉवर बँकमध्ये दोन इनपुट व आउटपुट पोर्ट आहेत. पॉवर बँक चार्ज करण्यासाठी टाइप-सी व मायक्रो-यूएसबी पोर्ट यांचा वापर करता येऊ शकतो आणि दोन यूएसबी टाइप-ए पोर्टमुळे एकाच वेळी दोन डिव्हाइस चार्ज करता येऊ शकतात. रेडमी पॉवर बँकमध्ये लिथिअम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला असून, त्या सुरक्षित आहेतच, शिवाय लिथिअम-आयन बॅटरीच्या तुलनेत त्या अधिक टिकतात. प्रत्येक रेडमी पॉवर बँकमध्ये वीजदाब, तापमान, करंट व इलेक्ट्रोस्टॅटिक असंगती यातील सर्किट चिप संरक्षणाच्या या श्रेणीतील सर्वोत्तम 12 स्तरांचा समावेश आहे. रेडमी पॉवर बँक 20000mAh हा प्रकार 18W जलद चार्जिंगला पाठबळ देतो आणि 10000mAh हा प्रकार 10W जलद चार्जिंगला पाठबळ देतो.

उपलब्धता

  • रेडमी 8A ड्युएल सी ब्लु, स्काय व्हाइट व मिडनाइट ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. Mi.com, अॅमेझॉन, मी होम्स यावर व निवडक अधिकृत रिटेल पार्टनर्सकडे 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 2GB+32GB प्रकाराची किंमत 6499 रुपये आणि 3GB+32GB प्रकाराची किंमत 6999 रुपये असणार आहे आणि लवकरच सर्व ऑफलाइन चॅनलवर उपलब्ध होणार आहे.
  • रेडमी पॉवर बँक पांढऱ्या व काळ्या रंगामध्ये मिळेल. Mi.com व मी होम्स यावर 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 10000mAh प्रकाराची किंमत 799 रुपये असणार आहे आणि 20000mAh प्रकाराची किंमत 1499 रुपये असणार आहे आणि. अॅमेझॉन इंडियावर लवकरच उपलब्ध होणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...