भारतभरातील सहा शहरांमधील ३६ संघांदरम्‍यान बुद्धीचा रोमहर्षक संघर्ष

Date:

टाटा पॉवरतर्फे वार्षिक क्‍लब एनर्जी क्विझ स्‍पर्धेचे आयोजन

अहमदाबादमधील श्री नारायण गुरू विद्यालय विजेते, तर मुंबईतील बॉम्‍बे प्रेसिडन्‍सी इंटरनॅशनल स्‍कूल उपविजेते

पुणे-: क्‍लब एनर्जी या टाटा पॉवरच्‍या देशव्‍यापी संसाधन व ऊर्जा संवर्धन उपक्रमाने आज त्‍यांची वार्षिक स्‍पर्धा क्‍लब एनर्जी क्विझ कॉम्पिटीशन २०२०चे आयोजन केले. मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या या स्‍पर्धेमध्‍ये भारतभरातील सहा शहरांमधील ३६ संघांचा सहभाग दिसून आला. त्‍यांनी विजेतेपदाची ट्रॉफी जिंकण्‍यासाठी तगडी झुंज दिली.

पात्रता फेरीमध्‍ये दिल्‍ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता व बेंगळुरू येथील १०८ विद्यार्थ्‍यांचा समावेश होता. त्‍यांनी फायनल्‍समध्‍ये पोहोचण्‍यासाठी दोन फे-यांमध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा केली. विजेता संघ अहमदाबादमधील श्री नारायण गुरू विद्यालय आणि उपविजेता संघ मुंबईतील बॉम्‍बे प्रेसिडन्‍सी इंटरनॅशनल स्‍कूल यांना क्रोमा गिफ्ट वाऊचर्स आणि इतर गुडीज देण्‍यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भारताच्‍या विविध भागांमधील क्‍लब एनर्जी विद्यार्थी ऊर्जा संवर्धन या ज्‍वलंत विषयावर जागरुकतेचा प्रसार करण्‍यासाठी एकत्र आले.

टाटा पॉवरच्‍या बिझनेस कोलॅबोरेशनचे प्रमुख सिडनी लोबो यांच्‍यासह भारतभरातील आघाडीच्‍या शाळांमधील मुख्‍याध्‍यापक व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टाटा पॉवरच्‍या कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍स व सस्‍टेनेबिलिटीच्‍या प्रमुख श्रीमती शालिनी सिंग म्‍हणाल्‍या, गेल्‍या काही वर्षांमध्‍ये आमची वार्षिक क्विझ स्‍पर्धा प्रमुख उपक्रम बनली आहे. ही स्‍पर्धा देशभरातील काही हुशार तरूणांना एकाच छताखाली आणते. तसेच तरूणांना वातावरणीय बदलाच्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यामध्‍ये प्रमुख प्रभावक बनवण्‍याचा क्‍लब एनर्जीचा मुख्‍य उद्देश आहे. दरवर्षी वाढता सहभाग पाहता आमचा विश्‍वास आहे की, आम्‍ही योग्‍य दिशेने वाटचाल करत आहोत.

टाटा पॉवरने नुकतेच एका इन्‍ट्रोडक्‍टरी व्हिडिओसह (introductory video) देशव्‍यापी मोहिम ‘आय हॅव दि पॉवर‘ची घोषणा केली. व्हिडिओंच्‍या सिरीजमधील पहिल्‍या इन्‍ट्रोडक्‍टरी व्हिडिओमध्‍ये सु्ंदर भविष्‍याप्रती योगदान देण्‍याच्‍या माध्‍यमातून युवांमध्‍ये देखील असलेल्‍या स्थिर भारत निर्माण करण्‍याच्‍या आणि परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या असलेल्‍या क्षमतांना दाखवण्‍यात आले आहे. तरूण व होतकरू क्रिकेटर भारतीय क्रिकेट संघ सदस्‍य श्री. शार्दुल ठाकूर हा या उपक्रमासाठी ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसिडर आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...