डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइट सादर करत आहे, भारतातला सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’

Date:

  • फ्लॅश व्हेपर्सद्वारे कार्यक्षमतेचा पुरावा देणारे भारताचे एकमेव व्हेपरायझर
  • अनोखी चिप असलेले हे फ्लॅश मशिन ऑटोमॅटिकपणे बदलते स्वरूप
  • मशिन आणि रिफिल 89 रुपयांत उपलब्ध, तर रिफिलची किंमत 75 रुपये

 

मुंबई, 6 फेब्रुवारी 2020 – भारतातील प्रत्येक कुटुंब आणि लहान मुलांचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइटने गुडनाइट गोल्ड फ्लॅश हे नवे, अनोखए उत्पादन सादर केले आहे. हे उत्पादन भारतातील सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर असून त्याची कार्यक्षमता सहजपणे दिसून येते. घरगुती कीटकांपासून संरक्षण करणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेले गुडनाइट गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या सादरीकरणातून 2200 कोटी रुपयांच्या लिक्विड व्हेपोरायझर बाजारपेठेतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे.

 

गुडानाइटच्या संशोधनानुसार भारतातील 90 टक्के ग्राहकांना डासांची समस्या भेडसावते. कुटुंबाचे सर्व बाजूंनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइटने लोकांना गुडनाइट गोल्ड फ्लॅश हे सर्वात ताकदवान उपलब्ध तयार करून दिले आहे. साध्या लिक्विड व्हेपोरायझर्सच्या तुलनेत गुडनाइट मशिनचा सुरुवातीच्या काही काळात दृश्यमान फ्लॅश व्हेपर्स सोडून डासांना नष्ट करण्याचा वेग खूप जास्त आहे.

 

या क्रांतीकारी लाँचविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीपीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी – भारत आणि सार्क, सुनील कटारिया म्हणाले, ‘भारतातील गृहोपयोगी कीटकनाशक क्षेत्रात गुडनाइट आघाडीवर आहे. कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण करणाऱ्या उत्पादनांमध्ये भारतातील कुटुंबांची गुडनाइटला पसंती असते. ग्राहकांसाठी आम्ही कायमच क्रांतीकारी उत्पादने सादर करून या उत्पादन विभागाची समीकरणए नव्याने प्रस्थापित केली आहेत. गुडनाइट गोल्ड फ्लॅश, भारतातील सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर हे आमचे लिक्विड व्हेपोरायझेशन विभागातील सर्वात नवे उत्पादन आहे.’

 

ते पुढे म्हणाले, अद्यावत हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्यमान कार्यक्षमतेच्या मदतीने गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील 2200 कोटी रुपयांच्या लिक्विड व्हेरायझर बाजारपेठेतील समीकरणे नव्याने बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. या उत्पादनाच्या मदतीने आम्ही कॉइल्स आणि अगरबत्तीसारखी जळणारी उत्पादने वापरण्याऐवजी नवा, जास्त आधुनिक पर्याय देत असून त्याद्वारे अशा उत्पादनांच्या 250 कोटी रुपयांच्या बाजारपेठेला काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

 

गुडनाइट गोल्ड फ्लॅशमध्ये नॉर्मल आणि फ्लॅश मोड बसवण्यात आले असून चिपवर आधारित तंत्रज्ञानाची जोड त्याला देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे मोड्स आपोआप बदलले जातात. अधिक वेगवान परिणाम मिळवण्यासाठी मशिन सुरू करायचे झाल्यास युजरला फ्लॅश मोड सुरू करावा लागेल आणि मशिन 30 मिनिटे दृश्यमान फ्लॅश व्हेपर्स सोडत राहील. त्यानंतर हे मशिन आपोआप नॉर्मल मोडला येईल. हे चक्र मशिन बंद होईपर्यंत दर चार तासांनी परत सुरू होत राहील. फ्लॅश व्हेपर्स आणि मशिनच्या अद्यावतपणामुळे कोपऱ्यांतील डासही दूर होतात. गुडनाइड गोल्ड फ्लॅश मशिनचे सच्छिद्र विक हीटिंग तंत्रज्ञानसह अधिक कार्यक्षमतेने घटक सोडत राहाते.

 

कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात कुटुंबांचे संरक्षण करण्याची ब्रँडची बांधइलकी गुडनाइड गोल्ड फ्लॅशमुळे आणखी मजबूत झाली आहे. फ्लॅश मशिनमुळे व्यापक परिसरातील डास दूर होतात. या मशइनमध्ये अनोखी लॉकिंग यंत्रणा देण्यात आल्यामुळे केवळ गुडनाइट फ्लॅश रिफिल्स मशिनमध्ये फिट होतात.

 

गुडनाइट हा भारतातील गृहोपयोगी कीटक क्षेत्रातील सर्वात मोठा, विश्वासार्ह ब्रँड असून 7.4 कोटी घरांत लोकप्रिय आहे. कंपनीची डास प्रतिरोधक उत्पादने कुटुंबांचे घरातील व घराबाहेरच्या डासांपासून संरक्षण करतात. गुडनाइट गोल्ड फ्लॅशचे मशिन आणि रिफिलची किंमत 89 रुपे असून रिफिलची किंमत 75 रुपये आहे.

 

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. बद्दल

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ही आघाडीची उदयोन्मुख बाजारपेठ कंपनी आहे. 120 वर्षांच्या गोदरेज समूहाचा भाग असलेल्या आम्हाला विश्वास, सचोटी आणि इतरांप्रती असलेल्या विश्वासाच्या या वारशाचा अभिमान वाटतो. आज आम्ही वेगाने विकसित होत असून आमच्या महत्त्वाकांक्षा उच्च आहेत.

आज आमच्या समूहाच्या विविध व्यवसायांची जागतिक पातळीवरील ग्राहकांची संख्या 1.15 अब्ज आहे. गोदरेज कन्झ्यमुर प्रॉडक्ट्सचा आंतरराष्ट्रीय विस्तार करताना तीन बाय तीन असा दृष्टीकोन आम्ही ठेवला असून आम्ही तीन उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये (आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका) तीन वेगवेगळ्या विभागांत (होम केयर, पर्सनल वॉश, हेयर केयर) कंपनीचे अस्तित्व उभारत आहोत. उदयोन्मुख बाजारपेठांतील घरगुती कीटकनाशके आणि हेयर केयर उत्पादन क्षेत्रांत आम्ही सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहोत. घरगुती कीटकनाशके क्षेत्रात भारतात आम्ही आघाडीवर आहोत, तर इंडोनेशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून आफ्रिकेमध्ये विस्तार करत आहोत. आफ्रिकी वंशाच्या स्त्रियांच्या केसांविषयक गरजांसाठी आवश्यक उत्पादने पुरवण्यात आम्ही आघाडीवर आहोत, तर भारत आणि सब- सहारन आफ्रिकेमध्ये हेयर कलर क्षेत्रात पहिल्या स्थानवर आहोत. लॅटिन अमेरिकेतल्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही आमचा समावेश होतो. भारतात साबण क्षेत्रात आमचे स्थान दुसरे, तर एयर फ्रेशनर्समध्ये पहिले स्थान आहे. इंडोनेशियामध्ये वेट टिश्यूज क्षेत्रातही आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत.

मात्र, आमच्यासाठी दमदर आर्थिक कामगिरी आणि नाविन्यपूर्ण, लोकप्रिय उत्पादने यांच्याखेरीज चांगली कंपनी राहाणे गरजेचे आहे. गोदरेज समूहातील अंदाजे २३ टक्के मालकी प्रमोटर्सकडे असून त्यात विश्वास, पर्यावरण, आरोग्य व शिक्षणामधल्या गुंतवणुकीचा प्रमुख वाटा आहे. आम्ही गुड अँड ग्रीन या उपक्रमाद्वारे बदल घडवून आणण्यासाठी आणि अधिक सर्वसमावेशक व हरित भारत तयार करण्यासाठी आमची सर्व ताकद एकटवत आहोत.

या सगळ्याच्या केंद्रस्थानी आमची टीम कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी प्रेरणादायी तसेच दर्जेदार कामगिरीच्या संस्कृतीला पोषक वातावरण तयार करण्यात आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या वैविध्याची दखल घेण्यासाठी व त्याचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...