महिंद्राने नाशिकमधील उत्पादन प्रकल्पामध्ये तयार केले 25 लाखावे वाहन

Date:

 

नाशिक: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने नाशिकमधील उत्पादन प्रकल्पामध्ये 25 लाखाव्या वाहनाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पामध्ये उत्पादन करण्यात आलेले 25 लाखावे वाहन महिंद्राचा लोकप्रिय ब्रँड स्कॉर्पिओ हे होते.

या ऐतिहासिक प्रसंगी, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे उत्पादन प्रमुख विजय कालरा यांनी नमूद केले, “हा मैलाचा टप्पा साध्य करणे हा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आमच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे आणि त्याचे श्रेय अथक परिश्रम करणाऱ्या नाशिक प्रकल्पामधील आमच्या प्रत्येक सदस्याचे आहे. या प्रकल्पाने सातत्याने उत्पादनातील उत्कृष्टता साध्य केली आहे. आमची राईज ही विचारसरणी कायम राखण्यासाठी कोणतीही मर्यादा न ठेवण्याची प्रकल्पाची प्रेरणा आणि बांधिलकी दिसून येते. या मैलाच्या टप्प्यानंतर आगामी काळामध्ये आमचा नाशिक प्रकल्प आणखी अनेक गौरव प्राप्त करणार आहे, याची खात्री आहे”.

 महिंद्राच्या नाशिक उत्पादन प्रकल्पाची वाटचाल  1981 या वर्षामध्ये सुरू झाली. हा प्रकल्प एकूण 147 एकरांमध्ये विस्तारलेल्या क्षेत्रामध्ये सुरू झाला. त्या वेळी प्रकल्पाची उत्पादन क्षमता 210,000 होती. एफजे मिनी बस हे पहिले वाहन तयार केल्यानंतर या प्रकल्पाने दररोज 8 वाहनांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. आज, अॅसेम्ब्ली लाइनमध्ये दररोज 700 वाहनांचे उत्पादन केले जाते आणि ही वाहने जगभरातील 34 हून अधिक देशांमध्ये पोहोचली आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या स्कॉर्पिओ, मराझ्झो, XUV300, बोलेरो, ई-व्हेरिटो, अॅम्ब्युलन्स, स्कॉर्पिओ SC/DC व विविध महिंद्रा उत्पादने यांची निर्मिती केली जाते.

नाशिक प्रकल्पाला पुढील पुरस्कार मिळाले आहेत – आयएमईए: ‘फ्युचर रेडी फॅक्टरी’ पुरस्कार, टीपीएम: ‘कन्सिस्टन्सी’ पुरस्कार, एमपीसीबी: ‘वसुंधरा’ पुरस्कार (सीएमकडून पुरस्कार), हेल्दी वर्क प्लेस: मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्ससाठी प्लॅटिनम लेव्हल अवॉर्ड आणि टीपीएम: जेआयपीएमकडून ‘एक्सलन्स अवॉर्ड’. महिंद्राने केंद्र सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रचंड बांधिलकी दर्शवली आहे.

महिंद्रा नाशिक आपल्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमांद्वारेही समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने एड्स जनजागृती व पुनर्वसन, ग्रामीण खेळाडूंचा विकास, रक्तदानासह थॅलेसेमिया रुग्णांची जबाबदारी, भव्य वृक्षारोपण, तसेच चेक डॅम व व्हिलेज सपोर्ट प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...