क्लोव्हर इन्फोटेकतर्फे महाराष्ट्रात नोकरभरतीसाठी व्यापक मोहीम

Date:

मुंबई  – क्लोव्हर इन्फोटेक या भारतातील आघाडीच्या सेवा पुरवठादार कंपनीने महाराष्ट्रातील दुसऱ्याव तिसऱ्या श्रेणीतील शहरांत आयोजित केलेल्या नोकरभरती मोहिमेच्या पहिल्या फेरीमध्ये २५० फ्रेशर्सी भरती केली आहे. क्लोव्हर इन्फोटेकने फिनोलेक्स अकॅडमी (एफएएमटी) सारख्या संस्थेतून भरती केली असून ही संस्था रत्नागिरीमध्ये स्थित आहे. भरती केलेल्यांना कंपनीतर्फे नव्या युगातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन या क्षेत्रासाठी सज्ज केले जाणार आहे. या उपक्रमासह क्लोव्हर इन्फोटेक देशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग, तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण, कंपनीतील तसेच बाहेरच्या तंत्रज्ञान तज्ज्ञांकडून मार्गदर्शन कपुरवले जाणार आहे. या सर्वसमावेशक प्रशिक्षण उपक्रमामध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्यांचा समावेश असून हे प्रशिक्षण क्लोव्हर इन्फोटेकच्या ज्ञान आणि प्रशिक्षणशाखेतर्फे – क्लोव्हर अकॅडमीतर्फे मुंबईतील नव्या, पूर्णपणे सुसज्ज प्रशिक्षण केंद्रात घेतले जाणार आहे.

 

या उपक्रमाद्वारे दुसऱ्या व तिसऱ्या शहरातील विद्यार्थ्यांना कालांतराने क्लोव्हर इन्फोटेकच्या ग्राहकांबरोबर काम करण्याची संधी मिळणार असून त्यात भारतातील प्रतिष्ठित बँका, आर्थिक सेवा कंपन्या आणि विमा कंपन्या यांचा समावेश आहे. कंपनी गेल्या काही वर्षांपासून अशाप्रकारे यशस्वी व्यावसायिक तयार करत आहे.  या क्षेत्रातील गेस्ट लेक्चरर आणि माजी विद्यार्थीही विद्यार्थ्यांबरोबर नियमितपणे आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित ज्ञान आणि कौशल्यांविषयी संवाद साधण्यासाठी क्लोव्हर इन्फोटेकतर्फे उपलब्ध करून दिले जातात.

 

या उपक्रमाविषयी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी(एफएएमटी) रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद म्हणाले, ‘क्लोव्हर इन्फोटेकसारख्या प्रतिष्ठित माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळताना पाहाणं अतिशय आंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आमचे विद्यार्थी कौतुकास्पद मेहनत करतात. त्यांना मिळणारे यश प्रचंड समाधान अभिमान देणारे आहे. क्लोव्हर इन्फोटेक हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे आणि आम्ही आमच्या काही माजी विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल घडून आलेला पाहिला आहे. मला खात्री आहे, की क्लोव्हर इन्फोटेक त्यांना आपल्या प्रशिक्षण आणि विकास उपक्रमांद्वारे आपली खरी क्षमता जाणून घेणय्साठी मदत करेल. एफएएमटीच्या वतीने मी क्लोव्हर इन्फोटेकचे आमच्या कॅम्पसवर घेतलेल्या नोकरभरती मोहिमेसाठी आभार मानतो.’

 

सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) आणि क्लोव्हर अकॅडमी, क्लोव्हर इन्फोटेकचे उपाध्यक्ष लक्ष्मी मित्रा म्हणाले, ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्यांच्या अभावाविषयी तसेच फ्रेशर्स या क्षेत्रासाठी सज्ज नसल्याची बरीचचर्चा केली जाते, मात्र नव्या गुणवत्तेला आकर्षित करणारी आणि तंत्रज्ञान व प्रकल्प व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान असलेल्या व्यावसायिकांमध्ये रुपांतर करणारी यंत्रणा उभारण्याकडे फार कमी लक्ष दिले जात आहे. क्लोव्हर इन्फोटेकमध्ये आम्ही या संधीचा लाभ घेत तज्ज्ञ आयटी व्यावसायिक तयार करतोच, शिवाय सर्व गुणवत्तेला आकार देण्याचे काम करतो. महत्त्वाचे म्हणजे, आम्ही दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतील विद्यार्थ्यांची भरती करून त्यांना विकास व प्रगतीच्या लक्षणीय संधी उपलब्ध करून देतो. तरुण गुणवत्तेचे कुशल आयटी व्यावसायिकांमध्ये रुपांतर करण्यासाठी आणि आमच्या अंतर्गत तंत्रज्ञान तज्ज्ञांचा लाभ त्यांना करून देण्यासाठी २००५ मध्ये क्लोव्हर अकॅडमीची स्थापना करण्यात आली होती.’

 

क्लोव्हर इन्फोटेकबद्दल

१९९४ मध्ये स्थापन करण्यात आलेली क्लोव्हर इन्फोटेक (www.cloverinfotech.com) ही एक सर्वसमावेशक आयटी सेवा पुरवठादार असून कंपनी भारत, दुबई, अमेरिका येथे कार्यरत आहे. गेल्या इतक्या वर्षांत क्लोव्हर इन्फोटेकने विविध प्रकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रात आपले कौशल्य प्रस्थापित केले असून त्यात ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपन सोर्स यांचा समावेश आहे.

आयएसओ २७००१ डिलीव्हरी केंद्रांनी सुसज्ज क्लोव्हर इन्फोटेक अप्लिकेशन सर्व्हिसेसपासून पायाभूत सुविधा व्यवस्थापनापर्यंतच्या सर्व सेवा वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील आणि क्षेत्रांतील १५० ग्राहकांना पुरवत आहे. क्लोव्हर इन्फोटेक ही ओरॅकलचा प्लॅटफॉर्म अँड इन्फ्रास्ट्रक्चर क्लाउड सर्व्हिसेस तसेच ईआरपी क्लाउड क्षेत्रातील महत्त्वाची भागीदार आहे. कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक गरजा पुरवण्यासाठी एआय- पॉवर्ड इंटेलिजंट बॉट्सवरही काम करत आहे.

क्लोव्हर इन्फोटेकने ओरॅकल पार्टनर नेटवर्क्स अवॉर्ड्स इंडिया २०१९ मध्ये ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर विभागात पार्टनर ऑफ द इयर हा पुरस्कारही जिंकला होता. कंपनीला प्रतिषअठइत मारकॉम पुरस्कार २०१७ मध्ये आपल्या संवादी आणि युजरफ्रेंडली संकेतस्थळासाठी गोल्ड पुरस्कार (डिजिटल मीडिया) पुरस्कारही जिंकला होता. क्लोव्हर इन्फोटेकने डेटाबेस सोल्यूशन्स सपोर्ट विभागात सीआयओ चॉइस पुरस्कार (सलग तीन वर्ष – २०१३, २०१४ आणि २०१५) जिंकला होता. कंपनीला अप्लिकेशन डिलीव्हरी प्लॅटफॉर्म विभागात सीआयओ चॉइस २०१४ सन्मानही मिळाला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...