कॅनेडिअन वूडने कॉन्स्ट्रो 2020 मध्ये एकबोटे फर्निचर अँड प्रोजेक्ट्सशी केला सहयोग

Date:

पुणे: कॅनेडिअन वूड म्हणून प्रसिद्ध असलेली एफआयआय-इंडिया रचनात्मक वापरामध्ये लाकडाच्या वापराला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने, लाकडी संरचना निर्माण करण्यासाठी व ट्रेड शोमध्ये दर्शवण्यासाठी उत्पादक व बिल्डर यांच्याशी सहयोग करण्याच्या संधींचा शोध घेत असते – पुण्यातील कॉन्स्ट्रो 2020 यामध्ये दर्शवण्यात आलेले कॅनेडिअन वूडमधील 230 चौरस फूट टीअँडजी कॉटेज हे एक असेच उदाहरण आहे.

 

एफआयआयने बी. सी. कॅनडातील शाश्वत पद्धतीने व्यवस्थापित जंगलातून संपादित केलेल्या सर्टिफाइड एसपीएफमध्ये (स्प्रस-पाइन-फिर) हे कॉटेज बनवण्यासाठी साहित्य व तांत्रिक कौशल्य यांची मदत एकबोटे फर्निचर अँड प्रोजेक्ट्सला केली.

 

घरे व अन्य लाकडी संरचना बांधण्यासाठी उत्तर अमेरिकेमध्ये सर्वत्र एसपीएफ हा प्रकार लोकप्रिय आहे. बिल्डिंग व प्रीफॅब्रिकेशन उद्योग हे एसपीएफचे मुख्य ग्राहक आहेत. याचे कारण म्हणजे, एसपीएफ स्ट्रेस रेटेड आहे आणि डायमेन्शनल स्थिरता, क्षमता व उत्तम ग्लुइंग गुणधर्म यासाठी प्रसिद्ध आहे.

 

कॅनेडिअन वूडचे वैविध्य आणि त्याचा विविध वापरासाठीचा उपयोग अधोरेखित करण्याच्या हेतूने, टीअँडजी वूडन कॉटेजव्यतिरिक्त, वेस्टर्न हेमलॉक, वेस्टर्न रेड केडर, डगलस फर व यलो केडर अशा कॅनेडिअन वूड प्रकारांमध्ये तयार केलेले सॉलिड वूड फर्निचरही प्रदर्शनामध्ये दर्शवण्यात आले.

 

प्रदर्शनाविषयी बोलताना, एफआयआय-इंडियाचे कंट्री डायरेक्टर प्रणेश छिब्बर यांनी सांगितले, साहित्य व तंत्रज्ञान यासाठी पाठिंबा देण्याच्या निमित्ताने मे. एकबोटेशी आमचा सहयोग झाला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. कॉन्स्ट्रो 2020 ट्रेड शोमधये त्याचे प्रदर्शन समाधानकारकरित्या करण्यात आले आहे.

 

भारतातील लाकडी घरांचा उदयोन्मुख ट्रेंड विचारात घेता, लाकडाच्या अतिशय सुंदर, नावीन्यपूर्ण डिझाइन असलेल्या व तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेल्या संरचना व बांधकाम करण्याच्या क्षेत्रातील वाटचाल सुलभ करण्यासाठी एक प्रवर्तक म्हणून आघाडीचे आर्किटेक्ट, विकसक व उत्पादक यांच्याबरोबर काम करत असल्याचा एफआयआयला अभिमान वाटते. मालक/विकसक यांच्या गरजेनुसार, टीअँडजी असो, डब्लूएफसी, पोस्ट व बीम ऑफ हायब्रिड असो, लाकडी संरचना बनवण्याच्या जगभरातील विविध पद्धती सादर करण्यामध्ये एफआयआय नेहमीच आघाडीवर आहे. लाकडी इमारतींचे बांधकाम लवकर पूर्ण होते, शिवाय त्या आरोग्यदायी व पर्यावरणपूरक असतात.

 

तर दुसरीकडे, भरतात हलक्या छटांमध्ये बनवलेले कमी वजनाचे फर्निचर जास्तीत जास्त स्वीकारले जावे व त्याचा बाजारातील हिस्सा वाढावा, यासाठी योगदान देत असल्याचा एफआयआयला आनंद वाटतो. या फर्निचरमुळे किफायतशीर दरात फर्निचर घेता येते आणि ते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत किंवा एका घरातून दुसऱ्या घरात सहजपणे हलवता येत असल्याने मजूर व वाहतूक हे खर्च वाचतात.

 

एफआयआय-इंडिया / कॅनेडिअन वूड

 

एफआयआय-इंडिया हे औपचारिक नाव असणारी कॅनेडिअन वूड ही कॅनडातील सर्वात पश्चिमेकडील ब्रिटीश कोलम्बिया (बी.सी.) या प्रांताच्या सरकारची क्राउन एजन्सी असून ती बी. सी. फॉरेस्ट उत्पादनांचा प्रसार परदेशातील बाजारांत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

भारतातील कॅनेडिअन वूड टीम लाकडांचे हे प्रकार व त्यांचे गुणधर्म याविषयी माहिती देण्यासाठी, जागृती करण्यासाठी, तांत्रिक मदत करण्यासाठी आर्किटेक्ट, विकसक, उत्पादक व टिम्बर ट्रेडर यांच्याबरोबर काम करते. तसेच, या उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण करते.

 

एफआयआय संबंधित लोकांच्या शंकांना तातडीने प्रतिसाद देते. ही टीम मुंबई, दिल्ली व बेंगळुरू येथील तीन कार्यालयांद्वारे कार्यरत आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन पश्चिम येथील कार्यालयाजवळ असलेले कॅनेडिअन वूडचे डिस्प्ले सेंटर भारतातील उत्पादकांनी निरनिराळ्या कॅनेडिअन वूड प्रकारांमध्ये बनवलेली उत्पादने दर्शवते.

 

गेल्या पाच वर्षांमध्ये, स्वतःहून पाहण्यासाठी, चर्चा करण्यासाठी व लाकडातील विविध पर्यायांवर व संकल्पनांवर सल्ला घेण्यासाठी आर्किटेक्ट, बिल्डर, उत्पादक व अगदी ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...