-63,912 रुपयांपासून किंमत …
भारताच्या नं. 1 कंपनीचे नवे तंत्रज्ञान
-आघाडीच्या कंपनीचे संशोधन, जवळजवळ 26 पेटंटसाठी अर्ज
-BS-VI इंजिन: 110cc HET BS-VI PGM-FI इंजिनाला eSP (एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर) चे बळ
-सायलेंट स्टार्ट सिस्टीम: पेटंटेड ACG स्टार्टर मोटरमुळे प्रत्येक वेळा मोटर पटकन, विना-आवाज, विना-धक्के सुरू होते
-पर्यावरणपूरक: BS-VI अॅक्टिव्हा 6G पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामुळे 10% अधिक मायलेज देते
-अधिक आरामदायी व सोयीस्कर
टेलिस्कोपिक सस्पेन्शन: या श्रेणीतील आघाडीच्या ग्राउंड क्लीअरन्समुळे आत्मविश्वासपूर्ण व सुरळीत राइड
इंटिग्रेटेड ड्युएल फंक्शन स्विच: एकाच स्विचने सीट व एक्स्टर्नल फ्युएल लिड उघडणे
ग्राहकांसाठी नवी मूल्ये
l BS-VI अॅक्टिव्हा 6G ही 2 प्रकारांत उपलब्ध आहे – स्टँडर्ड व डिलक्स
l 63,912 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) आकर्षक किंमत.
नवी दिल्ली,‘-पॉवर ऑफ 6’ने 2020 हे नवे वर्ष साजरे करत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने भारतातील सर्वात पसंतीच्या टू-व्हीलरची नवी आवृत्ती आज जाहीर केली आहे. पूर्णतः नव्या BS-VI अॅक्टिव्हा 6G ची किंमत 63,912 रुपयांपासून (एक्स-शोरूम नवी दिल्ली) आहे.
पूर्णतः नवी BS-VI अॅक्टिव्हा 6G दाखल करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिनोरु कातो यांनी सांगितले, “नियमनाच्या बराच काळ आधीच, मास सेग्मेंट BS-VI 2 व्हीलर – अॅक्टिव्हा 125 ची, त्यानंतर SP 125 ची विक्री करण्यास सुरुवात करणारी होंडा ही भारतातील पहिली उत्पादक होती. आम्ही भारतात या दोन BS-VI मॉडेलची 75,000 हून अधिक युनिट आधीच डिस्पॅच केली आहेत. आज, आम्ही पूर्णतः नवी BS-VI अॅक्टिव्हा 6G सादर केली असून, यामुळे आणखी एक “क्वाएट रिव्होल्यूशन” सुरू होईल आणि भारतातील आमच्या व्यवसाय विस्तारास चालना मिळेल, असा विश्वास आहे.”
BS-VI अॅक्टिव्हा 6G दाखल करण्याबद्दल बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, “भारतात सर्वत्र अॅक्टिव्हा अत्यंत लोकप्रिय आहे. एक ब्रँड म्हणून अॅक्टिव्हा गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे आणि जवळजवळ दोन दशके ती ऑटोमॅटिक स्कूटर श्रेणीमध्ये आघाडीच्या स्थानी आहे. आज, BS-VI अॅक्टिव्हा 6G दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे वाहन जानेवारीच्या अखेरीस व फेब्रुवारीच्या सुरुवातीला आमच्या सर्व डीलरशिपमध्ये उपलब्ध केले जाणार आहे.”
नवे तंत्रज्ञान
नव्या होंडा BS-VI अॅक्टिव्हा 6G मध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून त्यामुळे आधुनिक भारतीय ग्राहकांना अतिरिक्त मूल्ये देण्यात आली आहेत. लाखो ग्राहकांनी होंडा ब्रँडवर व होंडाच्या नावीन्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करत, पूर्णतः नवी BS-VI अॅक्टिव्हा 6G विकसित करताना जवळजवळ 26 पेटंट अर्ज करण्यात आले आहेत.BS-VI अॅक्टिव्हा 6G च्या केंद्रस्थानी भारत स्टेज VI कम्प्लायंट असलेले होंडाचे विश्वासार्ह 110cc PGM-FI HET (होंडा इको टेक्नालॉजी) इंजिन असून त्यास एन्हान्स्ड स्मार्ट पॉवरचे (eSP) बळ देण्यात आले आहे.
नव्या BS-VI अॅक्टिव्हा 6G ने भविष्यातील तंत्रज्ञान आताच उपलब्ध केले आहे आणि भारताला जागतिक मापदंडांच्या रांगेत स्थान मिळवून दिले आहे – सोफिस्टिकेटेड, प्रिसाइज व सेन्सिटिव्ह एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) NEW. HET इंजिनाच्या कामगिरीला चालना देणारे होंडा एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान कार्यक्षम कम्बशन जास्तीत जास्त करून आणि सायलंट स्टार्ट व सुरळीत पर्यावरणपूरक इंजिनाने फ्रिक्शन कमी करून एनर्जी आउटपुट जास्तीत जास्त देते.
एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) मध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे:
- विशेष होंडा ACG स्टार्टर NEW: यामुळे, करंट निर्माण करण्यासाठी व राइड करत असताना बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरद्वारे इंजिन विना-धक्का सुरू होते. यामुळे पारंपरिक स्टार्टर मोटरची गरज भासत नाही, त्यामुळे गिअरचा आवाजही होत नाही.
दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे इंजिन कमी प्रयत्नांमध्ये सुरू होते – पहिले म्हणजे, थोड्याश्या उघडलेल्या एक्झॉस्ट व्हॉल्व्हमुळे डिकम्पोझिशनचा कार्यक्षम वापर (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला), त्यानंतर स्विंग बॅक NEW वैशिष्ट्यामुळे इंजिन थोडेसे विरुद्ध दिशेला फिरवले जाते व त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ घेणे शक्य होते आणि इंजिन कमी ताकदीनेही सुरू होते.
स्टार्ट सोलनॉइड NEW हे ऑटोमॅटिक चोक सिस्टीम म्हणून काम करते व समृद्ध एअर फ्युएल मिक्शरची खात्री करते व केव्हाही वन टाइम स्टार्टची सोय देते.
प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-FI): विशिष्ट इंजिन डाटा आणि 5 इंटलिजंट सेन्सर्स यांच्याकडून सातत्याने मिळालेली प्रतिक्रिया यानुसार सिलिंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरले जाते. त्यामुळे सुरळीत व लिनिअर पॉवर आउटपुट थ्रुपुटची निर्मिती केली जाते.
टम्बल फ्लो NEW: होंडाने एकात्मिक डाय-कास्टिंग प्रक्रियेद्वारे जगातील पहिले टम्बल फ्लो तंत्रज्ञान विकसित केले आहे. (eSTT) योग्य इन्लेट पोर्ट शेपद्वारे आणि रिव्हर्स फ्लो घटनेच्या मदतीने टम्बल निर्माण करते. त्यासाठी कम्बशन सुधारणेसाठी अतिरिक्त घटकांची गरज नसते.
फ्रिक्शनमध्ये घट: ऑफसेट सिलिंडर, आटोपशीर वेट क्रँकशाफ्ट व ऑप्टिमाइज्ड पिस्टन यामुळे एकंदर इंजिन फ्रिक्शन कमी केले जाते. ऑप्टिमाइज्ड वेटमुळे इंधनक्षमतेत सुधारणा होते.
मायलेजमध्ये वाढ: जगभरात नावाजलेल्या नव्या eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असणाऱ्या HET इंजिनामुळे नव्या BS-VI अॅक्टिव्हा 6G च्या मायलेजमध्ये 10% वाढ झाली आह
अधिक आरामदायी व सोयीस्कर
टेलिस्कोपिक सस्पेन्शन NEW: नवीन टेलिस्कोपिक सस्पेन्शन व सीटची उंची कायम ठेवून वाढीव ग्राउंड क्लीअरन्स (+18mm) यामुळे रायडरचा आत्मविश्वास वाढतो आणि खराब रस्त्यांवर सुरळीत राइड करता येते.
इंधनबचत कण्यासाठी नव्या मीटर डिझाइनमध्ये इको स्पीड रेंज आहे आणि मॅलन्युट्रिशन लाइटNEW या ऑन-बोर्ड डायग्नॉस्टिक वैशिष्ट्यामुळे इंजिनामध्ये कोणताही बिघाड असल्यास तो सेन्सर्सच्या मदतीने आपोआप शोधला जातो.
इंजिन स्टार्ट / स्टॉप स्विच NEW: टू-वे काम करणाऱ्या स्विचचा उपयोग तो खाली दाबल्यास इंजिन सुरू करण्यासाठी होतो आणि तो वर दाबल्यास इंजिन किल स्विच म्हणून काम करतो.
त्यामध्ये, सीटखालील 18L स्टोअरेज वापरण्यासाठी आणि रायडरच्या सोयीसाठी एक्स्टर्नल फ्युएल लिड NEW वापरण्यासाठी विशेष इंटिग्रेटेड ड्युएल फंक्शन स्विच NEW आहे. पासिंग स्विच NEW मुळे हाय बीम / लो बीम नियंत्रित करण्याची आणि एका सिंगल स्विचवरून सिग्नल देण्याची सोय मिळते.
वाढीव फ्लोअर स्पेसमुळे (+23mm) आरामदायपीणे राइड करता येते. तसेच, सामान वाहण्याची क्षमताही वाढवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सातत्याने डीसी एलईडी हेडलॅम्प NEW (डीलक्स प्रकारामध्ये) सातत्याने उजळत असल्याने खडबडीत रस्त्यावरील व कमी वेगाचे रायडिंग सोयीस्कर ठरते.
दीर्घकालीन विश्वासार्हता
अष्टपैलू पूर्ण मेटल बॉडी विश्वासार्ह राइडचे आश्वासन पूर्ण करते. 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शनNEW व इक्विलायझरसह कोम्बी-ब्रेक सिस्टीममुळे (सीबीएस) नव्या BS-VI अॅक्टिव्हा 6G वरील प्रत्येक राइड आरामदायी व सोयीस्कर ठरते. मोठे 12-इंच फ्रंट व्हील NEW आणि सुधारित व्हील बेस (+22mm) यामुळे रायडरचा आत्मविश्वास वाढतो व राइडची गुणवत्ताही वाढते.
या उद्योगातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, होंडा BS-VI अॅक्टिव्हा 6G वर विशेष 6-वर्ष वॉरंटी पॅकेजNEW (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी विस्तारित वॉरंटी) देणार आहे.
किंमत, प्रकार व रंग
BS-VI अॅक्टिव्हा 6G दोन प्रकारांत उपलब्ध आहे (स्टँडर्ड व डीलक्स) व 6 रंग (ग्लिटर ब्लु मेटॅलिकNEW, पर्ल स्पार्टन रेड, डॅझल यलो मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल प्रेशिअस व्हाइट व मॅटे अॅक्सिस ग्रे मेटॅलिक).
पूर्णतः नव्या BS-VI अॅक्टिव्हा 6G ची किंमत 63,912 रुपयांपासून (स्टँडर्ड) आहे. डीलक्स प्रकाराची किंमत 65,412 रुपये (किंमत एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.