Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयसीआयसीआय बँकेने ट्रेड फायनान्ससाठी ब्लॉकचेन सुविधेमध्ये केला अंदाजे 250 कंपन्यांचा समावेश

Date:

मुंबई: आयसीआयसीआय बँक या एकूण मालमत्तेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्ससाठीच्या आपल्या ब्लॉकचेन सुविधेमध्ये अंदाजे 250 कंपन्यांचा समावेश केला असून, भारतातील कोणत्याही बँकेने नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे. या सेवेमुळे, ‘एसअँडपी बीएसई 100 इंडेक्स’मधील कंपन्यांसह आघाडीच्या भारतीय कंपन्या आता या जाळ्याद्वारे देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्सचा स्वीकार करत आहेत.

या उपक्रमामुळे, देशातील बँकिंग उद्योगामध्ये ब्लॉकचेनला चालना देण्यासाठी बँक करत असलेल्या प्रवर्तक प्रयत्नांमध्ये आणखी एक मैलाचा टप्पा समाविष्ट झाला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये, एमिरेट्स एनबीडीच्या भागीदारीने आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्स व रेमिटन्स यातील प्रायोगिक तत्त्वावरील व्यवहार करणारी आयसीआयसीआय बँक ही भारतातील पहिली बँक व पहिल्या मोजक्या जागतिक बँकांपैकी एक बँक ठरली.

तेव्हापासून, बँकेच्या ब्लॉकचेन सुविधेमध्ये सहभागी होऊन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रेड व्यवहार करताना वेळेमध्ये व खर्चामध्ये बचत करण्याचा व अधिक सुरक्षित पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी देशातील 250 हून अधिक आघाडीच्या बँकांनी नोंदणी केली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर आणून, तसेच त्यांना तातडीने निर्णय घेण्याची सुविधा देऊन, मोठ्या प्रमाणात कागदपत्र आवश्यक असलेली ट्रेड फायनान्सची प्रक्रिया सुलभ होते. या सुविधेमुळे व्यवहार अचूक व झटपट केल्या जातात, विविध शहरे वा देशांदरम्यान कागदपत्रे पाठवण्यासाठी वाट बघावी लागत नाही व ट्रेड इंटरमीडिअरींद्वारे खातरजमा करावी लागत नाही. सध्याच्या प्रक्रियेत मात्र देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्स व्यवहार करण्यासाठी दोन्ही पक्षांना कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते.

‘एसअँडपी बीएसई 100 इंडेक्स’मधील आघाडीच्या भारतीय कंपन्या आता ट्रेड फायनान्ससाठीच्या आयसीआयसीआय बँकेच्या ब्लॉकचेन सुविधेद्वारे विविध प्रकारच्या ट्रेड फायनान्सचा स्वीकार करत आहेत. यामध्ये संस्थेच्या समूह कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी परदेशी रेमिटन्स, अन्य शहरातील व्हेंडरचे देशांतर्गत पेमेंट व देशांतर्गत चॅनल पार्टनरला कच्च्या मालाचे पेमेंट यांचा समावेश आहे.

या विषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी संचालक चंदा कोचर म्हणाल्या, “बँकिंगला नवे आयाम देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या बाबतीत आयसीआयसीआय बँकेची समृद्ध परंपरा आहे. ब्लॉकचेनवर क्रॉस-बॉर्डर ओपन अकाउंट ट्रेड फायनान्स व रेमिटन्स व्यवहार सर्वप्रथम सुरू करण्यामध्ये आम्ही देशातील पहिली बँक ठरलो आहोत, तर जगातील मोजक्या बँकांपैकी एक आहोत. ट्रेड व्यवहारांसाठी आमच्या ब्लॉकचेनमध्ये 250 कंपन्यांचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. देशातील कोणत्याही ब्लॉकचेन सुविधेसाठी ही सर्वाधिक संख्या आहे. सर्व संबंधितांना एकाच व्यासपीठावर आणून, मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची आवश्यकता असलेली ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ब्लॉकचेन या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये मोठी क्षमता आहे, असे मला वाटते.

अन्य एका उपक्रमात, ब्लॉकचेनचा वापर करून देशात सर्वंकष अनुकूल सुविधा निर्माण करण्यासाठी, तसेच या सुविधेचा जास्तीत जास्त वापर केल्या जाण्यासाठी सर्वसामान्य मापदंड तयार करण्यासाठी आम्ही अन्य बँकांशी व भागीदारांशी सहयोग करत आहोत.”

आयसीआयसीआय बँकेने तयार केलेल्या ब्लॉकचेन सुविधेमुळे आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्स प्रक्रियेचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक, वितरित व न बदलण्याजोग्या लेजरमध्ये केले आहे व त्यामुळे या प्रक्रियेतील सहभागींना एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल. या सुविधेमुळे सर्व पक्षांना – देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणचे ग्राहक व विक्रेते, आयसीआयसीआय बँकेच्या देशातील व परदेशातील सर्व शाखा व  ठिकाणांना रिअल टाइममध्ये सर्व माहिती पाहणे शक्य होईल. यामुळे त्यांना कागदपत्रांचा मागोवा घेता येईल व मालमत्तेच्या मालकीची डिजिटल पद्धतीने खातरजमा करकता येईल व एन्क्रिप्टेड व सुरक्षित डिजिट कंत्राटांच्या मालिकेद्वारे ट्रेड फायनान्स व्यवहार करता येतील. तसेच, यामुळे प्रत्येक सहभागीला या सुविधेची सद्यस्थिती ऑनलाइन तपासता येईल व सुरक्षित नेटवर्कद्वारे मूळ ट्रेड कागदपत्रे पाठवता येतील.

ब्लॉकचेन क्षेत्रातील अतिरिक्त उपक्रम म्हणून, बँकेने अन्य बँकांच्या भागीदारीने ट्रेड फायनान्ससाठी ब्लॉकचेन-आधारित अन्य व्यवस्था निर्माण करून ब्लॉकचेन सुविधेचा विस्तार करायचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानातील पूर्ण क्षमतेचा वापर करण्याच्या हेतूने या समूहाने संपूर्णतः डिजिटाइज्ड ट्रेड सेवा देण्यासाठी ग्राहक, विक्रेते, लॉजिस्टिक्स भागीदार, विमा कंपन्या व अन्य अथॉरिटी अशा व्यापारातील निरनिराळ्या घटकांना समाविष्ट करायचे नियोजन केले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...