श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सतर्फे आंतरराष्ट्रीय बाँड बाजारपेठेतून ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची उभारणी

Date:

मुंबईभारतातील सर्वात मोठी असेट फायनान्सिंग (मालमत्तेवर वित्त पुरवठा करणारी) कंपनी असलेल्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेडने (एसटीएफसी किंवा कंपनी) 5.100 टक्के दराने 3.5 वर्ष कालावधीसाठी 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स फिक्स्ड रेट सिनियर सिक्युअर्ड 144 ए/रेग एस बाँडची यशस्वी किंमत केली आहे. एसटीएफसीचा हा बाँड व्यवहार भारतातील पहिले पब्लिक सोशल बाँड वितरण ठरल आहे. यामुळे ईसीबी मागदर्शक तत्वे शिथिल झाल्यापासून कंपनीने चौथे यशस्वी युएसडी बाँड वितरण साध्य केले आहे. एसटीएफसीच्या उद्घाटनपर सोशल बाँड वितरणाला एसटीएफसीच्या सोशल फायनान्स फ्रेमवर्कचे मार्गदर्शन लाभले असून ते आयसीएमए सोशल बाँड तत्वांशी सुसंगत आहे. बाँडमधून उभारण्यात आलेली रक्कम रोजगार निर्मितीसह एमएसएमई वित्तपुरवठा आणि मायक्रोफायनान्ससाठी वापरली जाणार आहे. एसटीएफसीने सस्टेनअनालिटिक्सकडून सेकंड पार्टी ओपनियन मागवले असून त्यात सोशल बाँड फ्रेमवर्कचे विश्वासार्ह आणि परिणामकारक असे वर्णन केले आहे आणि केपीएमकडून इंडिपेंडंट लिमिटेड अश्युरअन्स रिपोर्ट मिळवला आहे.

कंपनीने कॉल्सच्या मालिकेच्या माध्यमातून हाँग काँग, सिंगापूर, लंडन आणि अमेरिकेतील गुंतवणुकदारांना सहभागी केले आहे. गुंतवणुकदारांच्या दमदार अभिप्रायाच्या जोरावर हा व्यवहार 5.375 टक्के एरियाच्या प्राथमिक किंमत मार्गदर्शनासह लाँच करण्यात आला होता. उच्च दर्जाच्या गुंतवणुकदारांनी पाठिंबा दिलेल्या दमदार बुक बिल्डच्या आधारावर कंपनीने किंमत 27.5 बीपीएसने आवळत 5.100 टक्क्यांवर आणणे शक्य झाले.

बाँडला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व अंतिम ऑर्डर बुकने 2.20 अब्ज डॉलर्स ओलांडून असून  >4x हजारांची अतिरिक्त नोंदणी (oversubscription of  >4x) झाली आहे. या व्यवहारात अमेरिकेतून 50 टक्के सहभाग, आशियातून 37 टक्के सहभाग, तर ईएमईएमधून 13 टक्के सहभाग मिळाला असून त्याला असेट व्यवस्थापकांची 85 टक्के गुंतवणूक, बँकांची 5 टक्के गुंतवणूक, विम्याकडून 5 टक्के गुंतवणूक, तर खासगी बँका आणि इतरांकडून 5 टक्के गुंतवणुकीची जोड मिळाली. ऑर्डर बुकमध्ये नामवंत सोशल बाँगुंतवणुकदारांनी रस दाखवला असून त्यांच्यांकडून मागणीही येत आहे.

बार्कलेज, बीएनपी पारीबस, सिटीग्रुप, क्रेडिट सुस, डॉइश बँक, एमिरट्स एनबीडी कॅपिटल, एचएसबीसी, आयएनजी, जे. पी. मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँ यांनी संयुक्त बुकरनर्स आणि संयुक्त लीड व्यवस्थापकाची जबाबदारी पार पाडली.

श्रीराम ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमेश रेवणकर यशस्वी वितरणाबद्दल म्हणाले, जागतिक गुंतवणूकदार समाजाच्या दमदार सहभागाने आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. यापुढेही कंपनीसाठी सामाजिक परिणाम हे महत्त्वाचे कार्यक्षेत्र राहाणार असून आमच्या उद्घाटनपर सोशल बाँडसाठी मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. सामाजिक परिणाम हे आमच्यासाठी सर्वात प्राधान्याचे क्षेत्र असून त्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार समाजाला लक्षणीय रस आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...