पुण्यात क्विकराईड अ‍ॅप्लिकेशन वापरणार्‍यांच्या संख्येत 153 टक्क्यांची वाढ

Date:

पुण्यात 2019 मध्ये अडीच लाख वापरकर्त्यांची नोंदणी
– वर्षभरात 20 लाख कारपूलिंग प्रवासातून 2100 टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यश
– कारपूलिंगच्या बाबतीत पुणे हे देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ    असलेले  हैदराबादच्या खालोखालचे शहर
– क्विकराईडच्या ग्राहकांमध्ये महिलांचा 57 टक्के समावेश
पुणे : क्विक राइडच्या उलाढालीत पुण्यामध्ये उल्लेखनीय वाढ झाली असून 2019 मध्ये तिच्या अ‍ॅपवर 2 लाखांहून अधिक ग्राहकांनी नोंदणी केली आहे. 2015 मध्ये बंगळूरमध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअप कंपनीच्या कामकाजात आतापर्यंत तिप्पट वाढ झाली आहे, तसेच या कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 32 लाखांपर्यंत वाढली आहे.

याच कालावधीत क्विकराईड कंपनीतर्फे पुण्यात असलेल्या कारपूलच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा 75 टक्के वाढ झाली आहे. पुण्यात क्विकराइडच्या ग्राहकांनी आपल्या सहकारी प्रवाशांबरोबर *** इतक्या राइड्स घेतल्या आहेत आणि त्यायोगे 2019 या एका वर्षात 2100 टन इतके कार्बन उत्सर्जन हवेत जाण्यापासून रोखले आहे. गर्दी आणि वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पुण्यातील ग्राहकांनी आतापर्यंत सहकारी प्रवाशांबरोबर 20 लाख राईड्सचा उपयोग केला आहे.

वाहतुकीची कोंडी आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या महानगरांमध्ये कार-पूलिंगला वेग आला आहे. तथापि, कारपूलिंग आज प्रामुख्याने उभे आहे कारण ते परवडणारे आणि पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ आहे. आपल्या कारवूलिंगमुळे किती कार्बन हवेत जाण्यापासून वाचले आहे, याचा तपशील क्विकराईडचे अ‍ॅप वापरणारे नागरिक वापरणारे सहजपणे पाहू शकतात आणि त्याचे मूल्यांकन व विश्लेषणही करू शकतात.

कंपनीच्या गेल्या एका वर्षातील प्रगतीचा उलेल्ख करीत क्विक राइडचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केएनएम राव म्हणाले, “विविध शहरांमधील प्रवासी आता दररोज कामासाठी जाताना कारपूलिंगचा वापर करतात, हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. देशातील वाढती वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करण्याची गरज लोकांना समजली आहे. गेल्या वर्षभरात आपल्या देशातील कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्या प्रवास करण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केल्याचे पाहून त्यांच्याबद्दल विश्वास आणि आशा निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने हा त्यांचा प्रवास सुरळीत व त्रासमुक्त होण्यात मदत केली आहे. त्यामुळे या कारपूलिंग पद्धतीची लोकप्रियता वाढली आहे.   सन 2020 पर्यंत किमान 10 लाख कार्स रस्त्यावरुन कमी व्हाव्यात आणि दररोजचे 3000 टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यावे, असे आमचे ध्येय आहे. आमच्या ग्राहकांच्या पाठिंब्याने, आम्ही भारतातील सर्व विकसनशील शहरांमध्ये त्याचा विस्तार करत राहू आणि वाहतुकीचा मुख्य प्रवाह म्हणून कार-पूलिंगचा प्रचार करत राहू.

आपल्या कारमधील रिक्त जागेवर इतर सहकार्‍यांना बसवून कार्यालयात घेऊन जाणार्‍या नागरिकांना क्विकराइड आपल्या यशाचे श्रेय देते. किक-राइडने कार-पूलिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध कॉर्पोरेट कंपन्यांशी भागीदारी केली आहे. टेक महिंद्रा, बॉश, कॅपजेमिनी, व्हेरीझॉन, क्वालकॉम, अ‍ॅमेझॉन, डेलॉइट, एचडीएफसी, बायोकॉन, सोसायटी जनरल, एल अ‍ॅन्ड टी, एरिक्सन, ईवाय-इंडिया, टाटा एलेक्सी, मारुती सुझुकी, हरमन आणि रिलायन्स-जिओ यांनी आपल्या कर्मचार्‍यांना कार पूलिंगचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आहे. याव्यतिरिक्त, कॅन्डर टेक स्पेस, एम्बेसी ग्रुप आणि अ‍ॅक्सेेन्डास या कंपन्या व्यवस्थापन करीत असलेल्या उद्योग भवनांंनी कारपूलिंगचे महत्त्व ओळखले आहे आणि त्यांनीदेखील आपल्या कॅम्पसमधील कर्मचार्‍यांना कारपूलिंग क्विकराईडचे नाव सुचविले आहे.

नैसर्गिक स्त्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनावर काम करणार्‍या एका अग्रगण्य जागतिक वैज्ञानिक पॅनेलच्या अहवालानुसार, जी-7 समूह, चीन किंवा भारत या देशांमधील नागरिकांनी आपल्या चार प्रवासांपैकी एक प्रवास कारपूलिंगच्या माध्यामातून केल्यास कार्बन उत्सर्जनामध्ये 20 टक्के घट होऊ शकतो. कारपूलिंग हा उपक्रम सामायिक मोबिलिटी इको सिस्टमचा अविभाज्य भाग आहे. कारपूलिंगमुळे केवळ रस्त्यावरील वाहने कमी होणार नाहीत, तर कार्बन फूटप्रिंट कमी होईल आणि वाहतुकीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात घट होईल. क्विकराइड ही कंपनी एक विश्वासार्ह कारपूलिंग सेवा देत आहे, जी परवडणारी आणि सुरक्षित पर्याय म्हणून उपलब्ध आहे. शाश्वत परिवहनाचा कारपूलिंग हा खर्‍या अर्थाने चांगला मार्ग आहे आणि तो येथे चिरंतर राहील.

‘क्विक राइड’बद्दल :

क्विक राइड हा भारतातील लोकप्रिय असा ‘राइड-शेअरींग’चा प्लॅटफॉर्म असून सर्व मेट्रो शहरांमध्ये ‘कारपूलिंग’सारखी मोहीम सुरू करण्यात तो आघाडीवर आहे. देशातील प्रमुख अशा दहा आयटी कंपन्यांपैकी आठ कंपन्या ‘क्विक राइड’चा वापर करतात. या कंपन्यांमधील व्यावसायिकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी एका वेळी आणून सोडणारा हा एक अतिशय विश्वासार्ह प्लॅटफॉर्म ठरला आहे. 2014 मध्ये या कंपनीची स्थापना झाली, तेव्हापासून ‘क्विक राइड’ हा भारताचा सर्वात वेगवान वाढणारा ‘कारपूलिंग’ समुदाय बनला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...