बॅडमिंटन गुरुकुल भारतातील कोचिंगच्या गरजा पूर्ण करणार

Date:

संस्थापक संचालक पुलेला गोपीचंद म्हणतात, या उपक्रमामुळे कोचिंगचा दर्जा उंचावेल आणि देशात गुणी खेळाडूंची संख्या वाढेल.

  •    बॅडमिंटन गुरुकुलमार्फत आम्ही आपल्या कोचेसबद्दल आदर आणि सन्मान राखणारी संस्कृती व आपल्या माजी खेळाडूंसाठी कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर करिअर संधी निर्माण करत आहोत – संस्थापक व एमडी सुप्रिया देवगुण

मुंबई:  गेल्या काही वर्षात भारतात बॅडमिंटन खेळामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचा दबदबा वाढत असून बॅडमिंटन पॉवरहाऊस अशी भारताची नवी ओळख निर्मण होत आहे.  परिवर्तनाचा हा ओघ असाच पुढे कायम राहावा आणि वाढत जावा यासाठी तळागाळातील स्तरावर क्रीडा विकास कार्यक्रम राबविण्याबरोबरीनेच खेळ प्रशिक्षणामध्ये देखील लक्षणीय बदल घडवून आणण्याची गरज आहे.  बॅडमिंटन सुपरस्टार व गुरु पुलेला गोपीचंद आणि माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सुप्रिया देवगुण यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.बॅडमिंटन गुरुकुलने टाटा समूह व असोसिएट पार्टनर्स टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप यांच्या सहयोगाने देशभरात १४ शहरांमध्ये २८ प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.  याठिकाणी २० माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टार्सच्या मार्गदर्शनाखाली १००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.  सुरुवातीला साध्या व लहान स्तरावर सुरु केल्या गेलेल्या या उपक्रमामध्ये देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकांचा समावेश केला जाईल आणि युवा विद्यार्थ्यांना खेळ शिकण्याच्या बरोबरीनेच निरोगी जीवनशैलीचेही धडे मिळावेत यासाठी साचेबद्ध व सुनियोजित कार्यक्रम तयार करण्यात येईल.

आज मुंबईत पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारतीय राष्ट्रीय प्रशिक्षक आणि बॅडमिंटन गुरुकुलचे मार्गदर्शक, संस्थापक व संचालक श्री. पुलेला गोपीचंद यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाडूंनी मिळविलेले घवघवीत यशगेल्या काही वर्षात बॅडमिंटन खेळाच्या लोकप्रियतेमध्ये झालेली अनपेक्षित वाढ, बॅडमिंटन कोर्टांची वाढलेली संख्या यामुळे देशभरात दर्जेदार बॅडमिंटन प्रशिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.  हे लक्षात घेऊन बॅडमिंटन गुरुकुलने ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करणारा हा अनोखा मंच तयार केला आहे ज्यामध्ये आम्ही माजी खेळाडूंना पुढे घेऊन येत आहोत, जेणेकरून युवा, उदयोन्मुख शटलर्सना त्यांच्या अनुभवांचा लाभ मिळू शकेल.  हे फक्त प्रशिक्षण नसेल तर त्याही पलीकडे जाऊन खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.  या खेळाडूंनी सर्वोत्तम दर्जाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा अनुभव घेतला आहे, सर्वात वरच्या पातळीवर पोहोचून यश संपादन करण्यासाठी किती कठोर मेहनत व जिगर आवश्यक असते ते त्यांना ठाऊक आहे कारण त्या पातळीवर जाऊन ते स्वतः खेळले आहेत.  हा सर्वोत्कृष्ट मिलाप घडून आलेला असून, मला खात्री आहे की यामुळे देशभरात प्रशिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि देशातून खूप मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू निर्माण होतील.”   

 माजी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व बॅडमिंटन गुरुकुलच्या संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती सुप्रिया यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली, त्या म्हणाल्या,बॅडमिंटन गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशातील प्रशिक्षकाविषयी आदर आणि सम्मान राखणारी संस्कृती निर्माण करत आहोत, आपापल्या काळातील या दिग्गज खेळाडूंसाठी कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर एक करिअर संधी उपलब्ध करवून देत आहोत.  उच्च दर्जाचे, व्यावसायिक पद्धतीने चालविलेले कार्यक्रम, साचेबद्ध, मानकीकृत संचालन आणि विशिष्ट अभ्यासक्रम या सर्वातून आम्ही या खेळाला एका विशाल संस्थेचे स्वरूप देऊ पाहत आहोत.  खेळ ही जीवनशैली बनावी, मुलांनी पदके आणि बक्षिसांच्या पलीकडे जाऊन खेळाचा विचार करावा असे प्रयत्न आम्ही बॅडमिंटन गुरुकुलच्या माध्यमातून करत आहोत.  एखादी व्यक्ती पैसे किती कमावते हे त्याचे यश मोजण्याचे माप होऊ शकत नाही, तर त्या खेळामार्फत आम्ही किती लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, ते महत्त्वाचे आहे असे आम्ही मानतो.   हा बदल खेळ शिकविल्यामुळे घडून आलेला असेल किंवा प्रशासक, प्रशिक्षक या भूमिकांमधून तुम्हाला पुन्हा एकदा खेळाकडे आणल्यामुळे घडून आलेला असेल, आमच्यासाठी तेच आमचे व तुमचे यश आहे.  बॅडमिंटन गुरुकुलमध्ये हेच यश आमचे लक्ष्य आहे.”  

 अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम कॉर्पोरेट सहयोगाखेरीज संभव होऊ शकत नाही.  बॅडमिंटन गुरुकुलसोबत टाटा समूहाच्या सहयोगाविषयी टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन श्री. हरीश भट यांनी सांगितले, बॅडमिंटन गुरुकुलसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  या उपक्रमामुळे देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण कौशल्ये एकत्र आणली जातील आणि युवा खेळाडूंना एका साचेबद्ध, सुनियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळामध्ये उत्तम कामगिरी करून दाखविण्यास मदत मिळेल.  गेले एक दशकभर टाटा समूह भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून विविध खेळांमधील खेळाडूंना टाटा समूहाने पाठिंबा दिला आहे.  आम्ही असे मानतो की, सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालना देण्याची क्षमता खेळांमध्ये असते.  निरोगी व सर्वसामावेशी समाज निर्मितीमध्ये खेळ महत्त्वाची भूमिका निभावत असतात.”

 बॅडमिंटन गुरुकुलचे असोसिएट पार्टनर्स असलेल्या टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. रवीकुमार स्वामिनाथन यांनी सांगितले, खेळ आणि खेळाडू यांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून पाठिंबा व मदत मिळणे किती महत्त्वाचे आहे हे जाणूनच टीव्हीएसने बॅडमिंटन गुरुकुल उपक्रमाला सहयोग देण्याचा निर्णय घेतला.  या उपक्रमातून देशात खेळाच्या विकासाला चालना मिळण्याच्या बरोबरीनेच खेळाडूंचा देखील विकास होणार आहे.  आपल्या देशात बॅडमिंटन खेळ अतिशय लोकप्रिय आहे आणि आपल्या बॅडमिंटनपटूंना जगभरात नावाजले जाते, त्यामुळे या उपक्रमाला साथ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

 बॅडमिंटन गुरुकुल 

पद्म भूषण विजेते श्री. पुलेला गोपीचंद यांनी सुरु केलेल्या बॅडमिंटन गुरुकुल या उपक्रमाला अनेक आजी व माजी ऑलीम्पियन्स, आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय चॅम्पियन्स व खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.  मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमांपासून उत्साही वयस्कांपर्यंत सर्वांचा समावेश यामध्ये करून घेतला जात असल्यामुळे या उपक्रमामुळे देशात बॅडमिंटन खेळाडूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ घडून येईल.

भारतात सर्वत्र एक प्रभावी व शाश्वत शारीरिक साक्षरता कार्यक्रम उपलब्ध करवून देण्यामध्ये लक्षणीय योगदान देण्यावर त्यांचा भर आहे.  श्री. पुलेला गोपीचंद यांनी स्वतः निवडलेल्या उच्च कौशल्ये व गुणवत्ता अंगी असलेल्या, प्रशिक्षित प्रशिक्षकांमार्फत सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देशभरात उपलब्ध करवून दिले जाते, मानकीकृत अभ्यासक्रम, मजबूत पायाभूत सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान ही बॅडमिंटन गुरुकुलाची वैशिष्ट्ये आहेत.

बॅडमिंटन खेळाचा एखाद्या विशाल संस्थेप्रमाणे साचेबद्ध विकास व्हावा, माजी खेळाडूंना कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर करिअर संधी उपलब्ध व्हावी हा त्यांचा उद्देश आहे.  याठिकाणी प्रत्येक नवख्या विद्यार्थ्याला अनुभवी, कुशल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते, आंतर बॅडमिंटन गुरुकुल स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते आणि त्यांच्यामध्ये चमक आहे असे दिसून आल्यास खेळात अजून जास्त कामगिरी करून दाखविण्यासाठी त्यांना पुढील मार्ग देखील खुला करून दिला जातो.

 टाटा ग्रुप

१८६८ साली जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह गेली कित्येक वर्षे जागतिक  स्तरावरील ख्यातनाम उद्योगसमूह म्हणून नावाजला जात आहे.  टाटा ग्रुपचे मुख्यालय भारतात असून १० उद्योग विभागांमध्ये कार्यरत ३० कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.  जगभरातील सहा खंडांमध्ये १०० पेक्षाही जास्त देशांमध्ये हा उद्योगसमूह विस्तारलेला आहे.  ‘जे ग्राहक आमच्या सेवा व उत्पादने वापरतात त्याच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी विश्वासावर आधारित नेतृत्वाच्या माध्यमातून हितधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे’ हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन टाटा ग्रुप सातत्याने पुढे जात आहे.  टाटा सन्स ही या उद्योगसमूहातील प्रमुख गुंतवणूकदार असून टाटा कंपन्यांची प्रमुख प्रमोटर आहे.  टाटा सन्सचे ६६% इक्विटी शेअर कॅपिटल लोकोपकारी विश्वस्त संस्थांच्या अखत्यारीत असून त्याच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, कला, संस्कृती यांना प्रोत्साहन दिले जाते.  २०१७-१८ मध्ये टाटा कंपन्यांनी एकूण ११०.७ बिलियन डॉलर्स महसूल नोंदवला.  या सर्व कंपन्यांमध्ये मिळून ७००००० कर्मचारी काम करतात.

प्रत्येक टाटा कंपनीचे स्वतःचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे.  सार्वजनिक दृष्टया नोंदणीकृत २८ टाटा उद्योग असून त्यांचे एकत्रित बाजार भांडवल जवळपास १४५.३ बिलियन डॉलर्स आहे (३१ मार्च, २०१८ नुसार).  या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टायटन, टाटा कॅपिटल, टाटा पॉवर, टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स, इंडियन हॉटेल्स व टाटा कम्युनिकेशन्स यांचा समावेश आहे.

गेली ७५ वर्षे खेळ हा टाटा समूहाचा अविभाज्य भाग आहे.  क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ऍथलेटिक्स, पर्वतारोहण व मोटार शर्यत यासारख्या अनेक खेळांना पाठिंबा देऊन अनेक पुरस्कार विजेते खेळाडू निर्माण केले आहेत, अनेक खेळाडूंच्या संघांना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना, प्रशिक्षण केंद्रांना मदत केली आहे.  देशभरातील टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी १९३७ साली टाटा स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली गेली.

टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप:

टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप हा जागतिक पातळीवरील समूह असून फ्राईट फॉरवर्डिंगपासून अगदी शेवटच्या टप्प्यातील पुरवठा व वेअरहाऊसिंगपर्यंत सर्व पुरवठा शृंखला सेवा हा समूह पुरवतो.

आंतरराष्ट्रीय कंपन्या, सरकारी विभाग, मोठे व मध्यम आकाराचे व्यवसाय, व्यापार यांच्यामध्ये निर्माण होणारी पुरवठा शृंखला आव्हाने ही कंपनी दूर करते.  आपल्या क्षमतांच्या बळावर ही कंपनी आपल्या ग्राहकांचे संचालन खर्च कमी करते आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणते.

सध्या भारतात सर्वत्र औद्योगिक इमारती व गोदामे मिळून जवळपास १२.५ मिलियन चौरस फूट जागेवरील बांधकामांचे प्रकल्प या कंपनीकडे आहेत.  वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये लॉजिस्टिक्स पार्क्स व वेअरहाऊसिंग सेंटर्स निर्माण करण्याची त्यांची योजना आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...