– पहिल्या महिन्यात इंधन व्यवहारांवर 250 रुपयांचा ‘कॅशबॅक’
– वर्षाकाठी 53 लिटर इंधनाचा फायदा – इंडियन ऑईलच्या (आयओसीएल) पेट्रोल पंपांवर इंधन भरल्यावर 20 पट ‘अॅक्सलरेटेड रिवॉर्ड पॉईंट्स’ आणि इंधन अधिभार माफ.
– फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिग बास्केट अशा ऑनलाईन शॉपिंगवर 5 पट ‘अॅक्सलरेटेड रिवॉर्ड पॉईंट्स’
– ‘बुक माय शो’द्वारे बुक केलेल्या चित्रपट तिकिटांवर 10 टक्के त्वरित सूट
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची खासगी बॅंक असलेल्या अॅक्सिस बॅंकेने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या कंपनीच्या सहकार्याने एक विशेष क्रेडिट कार्ड सादर केले आहे. कॅशलेस व कमी त्रासदायक असे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे आणि फायदे देण्याच्या उद्देशाने हे कार्ड बॅंकेने बाजारात आणले आहे. वेगाने विकसित होणार्या ‘क्रेडिट कार्ड इकोसिस्टीम’मध्ये आपली उपस्थिती वाढविण्याचा बॅंकेने याद्वारे प्रयत्न केला आहे.
नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड घेतल्यानंतरच्या पहिल्या 30 दिवसांतील इंधन खरेदीवर 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, तसेच इंडियन ऑईलच्या पंपांवर घेतलेल्या इंधनावर 20 पट ‘अॅक्सलरेटेड रिवॉर्ड पॉईंट्स’, इंधन अधिभार माफ यासारखे आकर्षक लाभ ग्राहकाला मिळतील. त्याचप्रमाणे ‘ऑनलाइन शॉपिंग’वर 5 पट ‘अॅक्सलरेटेड रिवॉर्ड पॉइंट्स’,’ बुक माय शो’द्वारे चित्रपट तिकीट खरेदीवर 10 टक्क्यांची त्वरित सवलत आणि केलेल्या प्रत्येक खर्चासाठी ‘एज पॉईंट’ मिळविण्यासारखे लाभ ग्राहक घेऊ शकतात.
कार्ड सादरीकरणाच्या समारंभात बोलताना ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’चे रिटेल विक्री विभागाचेकार्यकारी संचालक विज्ञान कुमार म्हणाले, “आमच्या 27 हजारांहून अधिक पंपांपैकी 98 टक्के ठिकाणी आम्ही डेबिट व क्रेडिट कार्डांद्वारे होणाऱ्या कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत असतो. को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अॅक्सिस बँकेबरोबर करार केल्याने आमच्या या दोन्ही कंपन्यांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण होतील आणि मध्यम व लहान शहरांमध्ये ग्राहकांची सोय वाढेल. हा उपक्रम डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देईल आणि सरकारच्या डिजिटल इंडियाच्या मोहिमेला गती देईल.”
या भागीदारीचे कौतुक करीत अॅक्सिस बँकेच्या कार्ड्स आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष संजीव मोघे म्हणाले, ‘’ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी विशेष सोयीसुविधा देण्याचे व अधिकाधिक लाभ देण्याचे प्रयत्न अॅक्सिस बँक सतत करीत असते. को-ब्रँडेड कार्डाद्वारे आम्ही भारतभरातील ग्राहकांना आकर्षक लाभ देत आहोत. ‘इंडियन ऑइल’बरोबरची आमची दीर्घकालीन भागीदारी आता या कार्डच्या माध्यमातून अधिकच दृढ होईल, व आम्ही एकत्र येऊन आमच्या दोन्हीकडील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाची सेवा देऊ शकू.’’
‘ इंडियन ऑईल’च्या सर्व 27 हजार पेट्रोल पंपांवर हे क्रेडिट कार्ड ग्राहक वापरू शकणार आहेत.