ThinkRight.me ने ओलांडला १ दशलक्ष डाऊनलोड्सचा टप्पा

Date:

  • अनेकांच्या आयुष्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या, सकारात्मकतेचा प्रसार करण्याच्या कामाची यशस्वी वर्षपूर्ती
  • मार्गदर्शनासह ध्यानधारणा आणि जाणिवजागृतीचा सराव यांच्या नव्याको-या संग्रहासाठी आठ विख्यात मार्गदर्शकांची नियुक्ती

 

पुणे: जेटसिन्थेसिसद्वारे निर्मित भारतातील अग्रगण्य मेडिटेशन अॅप ThinkRight.me ने आपल्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी १ दशलक्ष डाऊनलोड्सचा टप्पा गाठल्याची घोषणा केली. हा मैलाचा टप्पा गाठल्याने ThinkRight.me हा भारतातील सर्वात वेगाने विस्तारणारा डिजिटल माइंडफुलनेस मंच ठरला आहे. जाणीवजागृती, ध्यानधारणा आणि सकारात्मकतेचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी/यूजर्ससाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी पुरविणा-या ThinkRight.me ची धुरा जगप्रसिद्ध भावनिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शक ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी सांभाळत आहेत.

 

ही पहिली वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी जेटसिंथेसिस/ ThinkRight.me यांनी पुण्यातील मोहिनी महाल येथे ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांच्या व्याख्यानसत्राची एक संध्या आयोजित केली होती, जिला विविध संस्थांचे  सुमारे १५० सीईओ/ ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या सत्रादरम्यान भगिनी शिवानी यांनी बौद्धिक स्वास्थ्याच्या अनेक पैलूंवर भाष्य केले. व्यक्तिगत जबाबदारी स्वीकारून आणि दिवसागणिक स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रवासाला सुरुवात करत सकारात्मक राहण्यासाठी त्यांनी यावेळी यूजर्सना प्रोत्साहित केले.

 

या मंचाने बेहझाद रंदेरिया, ल्युसिया गार्सिया गिउर्गी, मोना डॉक्टर, वत्सल डॉक्टर ग्रेगरी, त्यागी शुर्जो, रिशाद, बेनैशा, विदिशा कौशला अशा अध्यात्मिक साधनेच्या क्षेत्रातील आठ मार्गदर्शकांचा आपल्या मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश केला आहे. हे तज्ज्ञ यूजर्सनी आपल्या बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुरू केलेल्या प्रवासामध्ये त्यांना मार्गदर्शन करतील व हे करण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण, मास्टर स्पिरिट, सर्वंकष मानसोपचार, भाविनक आणि मानसिक तसेच सर्वांगीण स्वास्थ्य, कला आणि ध्वनी, ऊर्जादायी औषधे, सहजप्राप्य योग, मूलगामी परिवर्तन अशा जाणीवजागृतीच्या (माइंडफुलनेस) विविध पैलूंना ते कवेत घेतील. या मार्गदर्शकांच्या जोडीला येथे मार्गदर्शनाखाली करावयाची ध्यानधारणा व जाणिवजागृतीसाठीचे सराव यांच्या निवडक प्रकारांचा नवा खास संग्रहही यूजर्सना उपलब्ध असणार आहे.

 

या नव्या व्यापार संकल्पनेच्या यशाबद्दल बोलताना जेटसिन्थेसिसचे व्हाइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रंजन नवानी म्हणाले, ”डिजिटल जगाची ताकद वापरून लक्षावधी भारतीयांची आयुष्य समृद्ध करणारे मंच, परिसंस्था, गट तयार करण्यासाठी आम्ही झटत असतो. ThinkRight.me ला गेल्या वर्षभरात मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्ही आनंदून गेलो आहोत. या प्रतिसादामुळेच हे संकेतस्थळ सर्वात वेगाने विस्तारणारे माइंडफुलनेस अॅप ठरले आहे. आजच्या वेगवान युगामध्ये तंत्रत्रानाने आपल्या आयुष्याचे प्रत्येक अंग व्यापून टाकले आहे. तंत्रज्ञान आणि अध्यात्मिकता यांच्यामधील दरी सांधत यूजर्सना जगण्याच्या सकारात्मक पद्धतीचा पर्याय देऊ करत दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव आणि चिंतांना सामोरे जाण्यासाठी त्यांना अधिक चांगल्या प्राकरे सज्ज बनविणे हे ThinkRight.me चे लक्ष्य आहे.”

 

ThinkRight.me च्या माध्यमातून सकारात्मकतेच्या संदेश सर्वत्र पोहोचविणा-या ब्रह्म कुमारी सिस्टर शिवानी म्हणाल्या, ”डिजिटल माध्यमातून जगाला सकारात्मक विचारांची भेट देण्याच्या साध्यासुध्या विचारातून ThinkRight.me ची सुरुवात झाली. आज लोकांना आपल्या आयुष्यात अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा व्यक्तींसाठी ThinkRight.me हे फक्त एक  अॅप नाही तर भावनिक स्वास्थ्य मिळविण्याच्या प्रवासातील साधीदार आहे/ हे वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आणि आपल्या भावना व आयुष्यावर स्वामीत्व मिळविण्यास मदत करणारे हे माइंडफुलनेस अॅप आहे. या डिजिटल मंचाच्या ताकदीने आम्ही हा संदेश लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवू शकू अशी आम्हाला आशा आहे. प्रत्येक प्रवास हा ‘मी’ पासून सुरू होतो आणि योग्य विचारांचे योग्य प्रकारचे तरंग मनावर उमटतात, आपण बदललो की जगही बदलते यावर आमचा विश्वास आहे.”

 

सिस्टर शिवानी यांच्याद्वारे संचालित Thinkright.me चे नवे अॅप अधिक चांगले आयुष्य कसे जगता येईल याचे सृजनात्मक संकल्पचित्र यूजर्ससमोर मांडते. आपल्या असाधारण सेवांद्वारे हे एकच अॅप आपल्या यूजर्सना आवश्यक त्या सर्व अध्यात्मिक गरजा पूर्ण करणारा मंच देऊ करते. तसेच सकारात्मक विचारांना चालना देणारे विचार, कल्पनाचित्रांवर आधारित संदेश आणि ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांच्या विचारांवर आधारित अॅम्बियन्स थीम्स यांचा समावेश या अॅपमध्ये आहे.  यूजरच्या भावनिक वाटचालीची नोंद ठेवण्यासाठी भावनिक स्वास्थ्याचा ट्रॅकर, संकटसमयी झटपट ध्यानधारणेच्या पद्धतींचे मार्गदर्शन (SOS section), प्रवासासाठी उपयुक्त विस्तृत ध्यानधारणा संच, संगीत आणि मंत्रपठण यांचा संग्रहसुद्धा येथे उपलब्ध आहे. जाणीवजागृतीच्या प्रवासात साथ देणा-या या संकेतस्थळामध्ये ध्यानधारणेच्या सरावासाठी मेडिटेशन टायमर तसेच जप काउंटरसारखी वैशिष्ट्येही अंतर्भूत करण्यात आली आहेत.

 

ThinkRight.me अॅप आणि वेबसाइटच्या साथीने होणा-या यूजर्सच्या अध्यात्मिक वाटचालीची ही झलक

 

  • ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांच्या पाच मिनिटांच्या श्राव्य स्वरूपातील प्रभावशाली सकारात्मक विचारांनी दिवसाची उत्साहाने सुरुवात करा.
  • सर्जनशील नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून आपल्या भावनिक स्वास्थ्यविषयक लक्ष्य नजरेसमोर ठेवा.
  • संध्याकाळी ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी यांचे ५ मिनिटांचे व्हिडिओ सत्र पाहून आपल्या दिवसाविषयी चिंतन करा व पुढील दिवसाचे नियोजन करा.
  • SOS विभागामध्ये १ मिनिटाच्या ध्यानधारणेच्या माध्यमातून आपली मन:शांती झटपट पुन्हा प्रस्थापित करा.
  • यूजर्सना ताणतणाव कमी करण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी, नकारात्मक भावना मुक्त करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी मार्गदर्शनाद्वारे ध्यानधारणेची शिकवण. यासाठी ध्यानधारणेचे नवनव्या प्रकारांचे रोज प्रसारण
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...