महिंद्राने एक्सकॉन 2019 मध्ये दर्शवली ब्लेझो एक्स टिपर्स उत्पादने

Date:

ब्लेझो एक्स 28 टिपरवर उच्च इंधनक्षमतेच्या खात्रीबरोबरच 96% अपटाइमचे आश्वासन

 

बेंगळुरू महिंद्रा ट्रक अँड बस या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या एक्सकॉन एक्झिबिशन या आंतरराष्ट्रीय बांधकाम उपकरण व तंत्रज्ञान ट्रेड फेअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टिपर्सची विविध उत्पादने दर्शवली. बांधकामाशी संबंधित वापरासाठी ही टिपर्स आदर्श आहेत.

 

यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक व बस आणि बांधकाम उपकरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले “महिंद्रा ट्रक अँड बसमध्ये (एमटीबी) ग्राहक केंद्रितता व उत्पादनामध्ये सातत्याने नावीन्य हा व्यवसायाचा गाभा आहे. बांधकाम ही तीव्र, वेळखाऊ प्रक्रिया आहे. आमची वाहने दररोज जवळजवळ 28 ते 20 तास चालवता येऊ शकतात, हा ग्राहकांच्या नफ्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.”

 

सहाय यांनी नमूद केले, “हा तपशील विचारात घेता, जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने महिंद्रा ब्लेझो एक्स टिपर्सची निर्मिती करण्यात आली आहे. इतकेच नाही, ब्लेझो एक्स 28T टिपरमध्ये खात्रीशीर उच्च मायलेज, उच्च पुलिंग पॉवर, दणकट अॅग्रिगेट्स, कमीत कमी मेंटेनन्स व श्रेणीतील सर्वोत्तम केबिन यांचा समावेश आहे. दर्जेदार उत्पादन, मायलेजची खात्री व 96% अपटाइमची खात्री देणारे ब्लेझो एक्स 28 टिपर निश्चित परिवर्तन आणेल.”

 

एचसीव्ही टिपर्सच्या ब्लेझो एक्स उत्पादनांव्यतिरिक्त, एमटीबीने एलसीव्ही टिपर, लोडकिंग OPTIMO ही दर्शवले. आटोपशीर डिझाइन असणारे हे मॉडेल वाळू खाणी व बांधकाम अशा वापरासाठी अतिशय उपयुक्त आहे.

 

टिपर्सची ब्लेझो एक्स उत्पादने

 

टिपर्सच्या ब्लेझो एक्स उत्पादनांमध्ये महिंद्राचे पेटंटेड फ्युएल स्मार्ट तंत्रज्ञान समाविष्ट असून त्यामध्ये असणाऱ्या स्विचेसमुळे भूप्रदेश व लोड यानुसार पॉवर निवडण्यासाठी मदत होते. या तंत्रज्ञानामुळे, विविध कारणांसाठी निरनिराळे वाहने ठेवण्याची आवश्यकता एमटीबीने नाहीशी केली आहे. ब्लेझो एक्स टिपर्सबरोबर 6 वर्षे किंवा 6,000 तास अशी या श्रेणीतील सर्वोत्तम वॉरंटी मिळेल आणि ती इंजिन, गिअरबॉक्स, रिअर एक्सल, केबिन व चासिस फ्रेम यासाठी लागू असेल.

 

या सर्वंकष उत्पादनाबरोबर, ब्लेझो एक्स टिपरमध्ये महिंद्रा iMAXX हे आधुनिक, अद्ययावत फ्लीट टेलिमॅटिक्स सोल्यूशन समाविष्ट केलेले आहे. यामुळे फ्लीट ऑपरेटरसाठी अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये उपलब्ध होतात व त्यामुळे त्यांना मार्गस्थ वाहनांबाबत वेळोवेळी माहिती दिली जाते. यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक नफ्यात व टेन्शन-मुक्त होतो. या सिस्टीमची काही वैशिष्ट्ये पुढील आहेत – प्रेडिक्टिव्ह व्हेइकल हेल्थ मॉनिटरिंग, फ्युएल थेफ्ट प्रिव्हेन्शन व अॅड ब्लु कन्झमशन मॉनिटरिंग, ड्रायव्हर बिहेविअर मॉनिटरिंग, ऑपरेशन रिपोर्ट्स ऑटोमेशन आणि लोकेशन ट्रॅकिंग.

 

ब्लेझो एक्स टिपर ग्राहकांसाठी एमटीबी सर्वंकष, चोवीस तास सर्व्हिस सेवा देते. त्यामध्ये 10 हून अधिक वाहनांना ऑनसाइट मशीन व स्पेअर्स यांचा समावेश आहे. याबरोबरच, महत्त्वाच्या, फास्ट-मूव्हिंग स्पेअर पार्टसह मोबाइल वर्कशॉप उपलब्ध केला जातो.

 

एमटीबीसर्व नवे उपक्रम

 

बहुतेकशा नव्या इंजिनांमध्ये क्लिष्टता असली तरी एमटीबीडी मात्र ग्राहकांना सुलभ BSVI अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना ब्लेझो एक्स कमीत कमी बदल करून उपलब्ध होईल व त्यांना सुरळीतपणे नव्या BSVI नियमांचा अवलंब करता येईल. कंपनी नुकत्याच दाखल केलेल्या फ्युरिओ मॉडेल रेंजच्या आयसीव्ही श्रेणीमध्ये BSVI मध्ये 5 टन ते 18 टन असे नवे 18 प्रकार दाखल करण्यासाठी सज्ज आहे.

 

कंपनीने अलीकडेच 1,700 किमी लांब टप्प्यावरचा व भारतातील 20% ट्रक वाहतुकीला सेवा देणारा चेन्नई – कोलकाता हा तिसरा सर्व्हिस कॉरिडॉर कार्यान्वित केला. 1,400 किमी लांब दिल्ली – मुंबई व काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा 3,800 किमी लांब उत्तर-दक्षिण सर्व्हिस कॉरिडॉर यानंतरचा हा तिसरा असा सर्व्हिस कॉरिडॉर आहे.

 

दिल्ली – मुंबई, काश्मीर – कन्याकुमारी व चेन्नई – कोलकाता या तीन सर्व्हिस कॉरिडॉरमुळे, 2 तासात (दिल्ली – मुंबई) व 4 तासांत (काश्मीर – कन्याकुमारी व चेन्नई – कोलकाता) सर्व्हिस मिळण्याची खात्री किंवा ग्राहकांना प्रत्येक तासाच्या विलंबासाठी ताशी 500 रुपये भरपाई यामुळे अनुक्रमे 27, 41 व 28 टचपॉइंटचा समावेश असणारे आफ्टर-सेल्स जाळे आणखी सक्षम होणार आहे.

 

एमटीबी मॉडेल रेंजला सतत वाढत्या आणि विस्तृत सर्व्हिस व स्पेअर्स जाळ्याचे पाठबळ असून त्यामध्ये 100 हून अधिक 3S डीलरशिप, 210 ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटर, रिटेल आउटलेटचे विस्तृत जाळे व मोक्याच्या ठिकाणी असलेले 39 पार्ट्स प्लाझा यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...