होंडाने ‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट हंट’च्या दुसऱ्या हंगामाला केली सुरुवात

Date:

नव्या पिढीतील रेसिंग गुणवत्ता शोधण्यासाठी पुण्यामध्ये शोध सुरू

 

  • पुण्यातील शोधामध्ये 2 महिला रायडरसह 10 ते 18 वर्षे वयोगटातील 22 तरुण रायडरचा सहभाग
  • निवड केलेल्या उमेदवारांना होंडा टेन10 रेसिंग अकॅडमीमध्ये प्रोफेशनल रेसिंग प्रशिक्षण देणार
  • अंतिम निवड झालेल्या रायडरना इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट कप 2020 – CBR 150R क्लासमध्ये थेट प्रवेश मिळेल
  • होंडाचे विशेष व्यासपीठ तरुण रायडर्सच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय रेसिंग करिअरला चालना देण्यासाठी तरुणांची निवड करणार व त्यांना उत्तेजन देणार

 

पुणेचेन्नई व बेंगळुरू येथील तरुण रायडरच्या रेसिंग करिअरला इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट कप 2019च्या दिशेने चालना दिल्यानंतर, पश्चिम भागातील रेसिंग केंद्रातून रेसिंगमधील नव्या पिढीतील गुणवत्ता शोधण्यासाठी इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट हंट 2019’ची तिसरी फेरी आता पुणे येथे झाली.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट हंट हा 10 वर्षे इतक्या लहान वयातच तरुण रेसर शोधणारा होंडाचा विशेष उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे, होंडा 2व्हीलर्स इंडिया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅम्पिअनशिपमध्ये रेसिंग करिअर करण्यासाठी भारतातील तरुण रायडर्सना घडवणार आहे.

पुण्यातील तिसऱ्या फेरीमध्ये पुणे, मुंबई, वडोदरा, डेहराडून, चेन्नई, कोल्हापूर, नागपूर, पिंपरी, सातारा व जळगाव येथील 22 तरुण सहभागी झाले होते. त्यांनी 3 स्तरीय चाचण्या पार केल्या. पहिली चाचणी म्हणजे त्यांचा फिजिकल फिटनेस, दुसरी चाचणी म्हणजे रेस ओरिएंटेशन व प्रामुख्याने रेस ट्रॅकसाठी रायडिंग कौशल्ये. त्यानंतर, भारतातील पुढील आयकॉनिक रायडर बनण्यासाठी त्यांचे मोटरस्पोर्टबद्दलचे प्रेम व कुटुंबीयांचा पाठिंबा समजून घेण्यासाठी उमेदवार आणि पालक/गार्डिअन यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.

पहिल्या टप्प्यात निवड केल्यानंतर, पुण्यातील टॅलेण्ट हंटमधील आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि चेन्नईतील रेस ट्रॅकवर त्यांची कौशल्ये वाढवण्याची संधी दिली जाईल. होंडा याच उमेदवारांतून सर्वोत्तम रायडर निवडणार आहे आणि पहिल्या टप्प्यात त्यांना 2020 हंगामामध्ये होंडा टॅलेण्ट कप CBR 150R श्रेणीमध्ये रायडिंग करण्यासाठी थेट प्रवेश देणार आहे.

रेसिंगमधील गुणवत्तेचा शोध कायम ठेवत, होंडाने इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट हंटच्या दुसऱ्या पर्वातील चेन्नईतील फेरीतून 3 रायडर्सची निवड केली आहे. पुण्यातील फेरीनंतर, आगामी महिन्यांमध्ये होंडाचा टॅलेण्ट हंट भारतातील आणखी 2 शहरांत प्रवास करणार आहे.

नव्या रायडर्ससाठी विकास पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सर्वोत्तम देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय रेसिंग सुविधा निर्माण करणे, या होंडाच्या दुहेरी दृष्टिकोनामुळे भारतातील मोटरस्पोर्टला उत्तेजन मिळाले आहे.

‘आयकॉनिक इंडियन रायडर्स’ घडवण्याच्या होंडाच्या उद्दिष्टाचा आढावा घेत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे ब्रँड व कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले, होंडासाठी 2019 हा रेसिंग हंगाम अत्यंत यशस्वी ठरला. आम्ही निवडलेल्या इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट कप 2019 च्या 19 रायडरनी राष्ट्रीय रेसिंगमध्ये संधी  मिळवली. CBR 150R टॅलेण्ट कपच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर, आम्ही 8 रायडरना NSF250R या होंडाच्या जागतिक दर्जाच्या मोटो3 मशीनवर संधी देऊन त्यांच्या करिअरला गती दिली. होंडाने आमच्या टॅलेण्ट हंटपैकी 2 रायडरना थायलंड टॅलेण्ट कपमध्ये सर्वोत्तम आशियायी रायडरबरोबर राइड करण्याची संधी दिली. दीर्घ काळामध्ये, सीईव्ही, एशियन टॅलेण्ट कप यापासून प्रीमिअर क्लास मोटोजीपी अशा विविध जागतिक दर्जाच्या व्यासपीठांवर तरुण भारतीय रायडरना नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या वीकेण्डला, प्रोफेशनल रेसिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी पुण्यातील तरुण व तरुणींमध्ये रेसिंगची प्रचंड आवड दिसून आली. ही केवळ सुरुवात आहे. होंडाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे उदयोन्मुख रायडर केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही मोटरस्पोर्टचे चित्र बदलून टाकतील.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेण्ट हंटमधील यापूर्वीच्या यशोगाथा: 2019 हंगामामध्ये आम्हाला सापडलेल्या 15 वर्षीय मो. मिकेलने एमएमआरटीमध्ये 250cc वर जलद लॅप टाइमचा विक्रम मोडत, NSF250R चषक जिंकला आणि त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कौशल्ये वाढवण्याची संधीही मिळवली. त्याच्यासोबत कर्नाटकातील तरुण रायडर क्रितिक हबिब होता. तसेच, ऐझवालमधील रायडर लाल नुनसांगाने CBR150R चषक जिंकला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...