पाचव्या पुणे एफएलओ हाफ मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद

Date:

पुणे-

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) एफएलओ पुणे चॅप्टरने रविवार ८ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केलेली पाचवी पुणे एफएलओ हाफ मॅरॅथॉन अतिशय उत्साहात पार पडली.  “रन फॉर विमेन एम्पॉवरमेंट” हे घोषवाक्य असलेल्या या स्पर्धेत तब्बल ९००० लोकांनी भाग घेतला होता.  २०१८ साली यामध्ये ७२०० स्पर्धक होते.  दरवर्षी धावपटूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे त्याचप्रमाणे मॅरॅथॉनचे आयोजन आणि नियोजनचा देखील अधिकाधिक विस्तार होत आहे.  निधी संकलनासाठी पुणे चॅप्टरतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रमुख कार्यक्रमातून जमा होणारा संपूर्ण निधी चॅप्टरचे सामाजिक प्रकल्प व महिला सक्षमीकरणासाठीच्या उपक्रमांसाठी वापरला जातो.

 यंदाच्या वर्षी पुणे एफएलओ हाफ मॅरॅथॉनला एआयएमएसकडून मंजुरी देऊन प्रमाणित करण्यात आले आहे.  एआयएमएस हे आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन असून यामुळे आता एफएलओ पुणे हाफ मॅरेथॉनचा जगभरातील क्वालिफायर मॅरेथॉन स्पर्धांमध्ये समावेश झाला आहे.  आयएएएफच्या कॅलेंडरमध्ये देखील या मॅरॅथॉनची नोंद करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे पीडीएएच्या नियमांनुसार देखील या मॅरॅथॉनला मान्यता देऊन प्रमाणित केले आहे.  त्यामुळे आता आमच्या मॅरॅथॉनमधील स्पर्धक इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील.    या लक्षणीय यशामुळे २०१९ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

 ५० कॉर्पोरेट्स आणि सरकारी शाळांसह अनेक इतर संस्थांचा सहभाग व समर्थन हे या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.  अंशतः अंध आणि अपंग मुलांसाठी “स्पेशल रन” विभाग ठेवला गेला होता.  अतिशय उत्साहाने आणि हिरीरीने भाग घेऊन या मुलांनी मॅरॅथॉनचे महत्त्व वाढविले.  मुलांचा उत्साहआनंद आणि त्यांनी मौजमजेत पूर्ण केलेली स्पर्धा हे सर्वकाही अतिशय वाखाणण्याजोगे होते.

 या स्पर्धेचे पाचवे वर्ष अनेक दृष्टींनी खास आहे – मॅरेथॉनच्या आधी कॉर्पोरेट स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनपर व फिटनेसला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमुळे लोकांचा उत्साह वाढला आणि स्पर्धेतील धावपटूप्रायोजकसहयोगी यांचा सहभाग देखील वाढला.  अनेक प्रयोजकांनी स्वतःहून येऊन एफएलओ पुणेला समर्थन दिले.  स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमांमुळे शहरातील इतर लोक व वाहतूक यांना जराही अडथळा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली.  सर्व स्पर्धकांना धावण्याचा मार्ग मोकळा व सुरक्षित मिळेल हे देखील सुनिश्चित केले गेले.

आमचे प्रिझेंटिन्ग स्पॉन्सर ब्रिजस्टोन यांनी सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेला भरघोस सहकार्य दिले.  एफएलओ पुणेच्या कामावरप्रयत्नांवर विश्वास ठेऊन त्यांनी प्रमुख प्रायोजक म्हणून या स्पर्धेला मदत केली.  त्याचबरोबरीने यंदाच्या इतर प्रमुख प्रयोजकांमध्ये बार्कलेजअशोक लेलँडक्रेडिट सुईसफिनोलेक्समगरपट्टा यांचा समावेश होता.  तसेच याच वर्षी पहिल्यांदा सुदर्शन व स्टॅंडर्ड चार्टर्ड यांनी आम्हाला पाठिंबा देण्यात पुढाकार घेतला.

 यंदाच्या वर्षीच्या मॅरॅथॉनमधून जमा झालेला निधी महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध उपक्रमांसाठी वापरला जाईल. उस्मानाबादमधील महिला शेतकऱ्यांना मधमाशा पालन सुरु करण्यासाठी मदत करण्यावर तसेच महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन देण्यासाठी खाद्य प्रक्रिया व उत्पादन संस्थांसोबत जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.  आयटीआय गर्ल्स कॉलेजमधील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.  जनरल असिस्टंट ड्युटी या विषयावर टाटा स्ट्राईव्हच्या सहयोगाने एक कोर्स आयोजित करण्याचे देखील ठरविले आहे.  या निधीतून रोटरी क्लब्सच्या सहकार्याने कॅन्सर लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल.

 निधी संकलनाच्या या उपक्रमाला मिळालेल्या यशामुळे एफएलओमध्ये आम्हाला विविध क्षेत्रातील महिलांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठीत्यांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे.

 श्रीमती गौरी खान या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्यात्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच पारितोषिक वितरण समारंभातही सहभागी झाल्या.  ब्रिजस्टोन इंडियाचे एमडी श्री. पराग सातपुतेमाजी विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवीमहानिरीक्षक – तुरुंग श्री. सुनील रमानंदउपायुक्त महाराष्ट्र पोलीस श्री. सुरेश मायांगाडेएफएलओ पुणेच्या अध्यक्षा श्रीमती रितू प्रकाश छाब्रियाश्रीमती उषा काकडेबार्कलेजचे एमडी श्री. माइक लिलबर्नमगरपट्टाचे एमडी श्री. सतीश मगरफिनोलेक्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. प्रकाश छाब्रियाश्री. पराग संचेतीश्री. अजय शर्माश्रीमती अनिता सणसएफएलओ टीम व कॉर्पोरेट्स यावेळी उपस्थित होते.

 पुरुषांच्या सर्वात पहिल्या विभागात – २१ किमी नवीन हुद्दा यांनी १.२१.५२ वेळ नोंदवत तर त्याच विभागात स्त्रियांमध्ये कविता रेड्डी यांनी १.३९.०४ वेळेत पुणे एफएलओ हाफ मॅरेथॉन जिंकली.  विविध विभागातील भाग्यशाली विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 पुणे एफएलओ हाफ मॅरेथॉनमुळे पुणेकरांसाठी हा रविवार आरोग्यदायीरोमांचक व संस्मरणीय ठरला!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...