फास्ट्रॅकची नवी पेशकश “फास्ट्रॅक परफ्यूम्स”

Date:

युवा जोश जागविणाऱ्या अनोख्या सुगंधाची श्रेणी ~

आजच्या युवा पिढीची सर्वात लाडकी अभिनेत्री अनन्या पांडे बनली ब्रँड अम्बॅसॅडर  ~

पुणे-: फास्ट्रॅकभारतातील युवा पिढीच्या अतिशय आवडीच्या घड्याळेबॅग्सवॉलेट्स आणि आयवेअर्सचा फॅशन ब्रँडने आता परफ्यूम्स उद्योगामध्ये देखील पदार्पण केले आहे.  “फास्ट्रॅक परफ्यूम्स” ही श्रेणी बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा आज करण्यात आली.  भारतातील उत्साहीजोशपूर्ण आणि स्टायलिश युवापिढीसाठी बनविण्यात आलेल्या “फास्ट्रॅक परफ्यूम्स”च्या लॉंचच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात जेन झेड स्टार अनन्या पांडे आणि टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स व ऍक्सेसरीज डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. मनीष गुप्ता उपस्थित होते.  फास्ट्रॅकची ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून अनन्या पांडेची निवड करण्यात आल्याची घोषणा देखील यावेळी केली गेली.

फास्ट्रॅक या ब्रॅण्डने युथ फॅशन अर्थात युवापिढीची फॅशन अशी स्वतःची खास ओळख बनविली आहे.  सुरुवातीपासून आजतागायत या ब्रॅण्डने देशातील युवापिढीचा जोश आणि उत्साह जागवतील अशा कूल आणि फॅशनेबल ऍक्सेसरीज आणल्या आहेत.  आता फास्ट्रॅक परफ्यूम्स बनवताना देखील सुगंधांमधून उत्साह आणि आनंद चेतना जागविणे हा उद्देश असल्यामुळे तरुणपिढीतील प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये हे परफ्यूम्स स्थान मिळवतील अशी खात्री ब्रॅण्डने व्यक्त केली आहे.  या कलेक्शनमध्ये एकूण सात वेगवेगळे परफ्यूम्स आहेत – ट्रान्सबीट आणि पल्स हे परफ्यूम्स पुरुष व महिलांसाठी असून जेंडर फ्लुईडीटीच्या संकल्पनेनुसार सोलो हा सिग्नेचर युनिसेक्स परफ्यूम देखील यामध्ये आहे.

 जगभरातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पर्फ्युमर्सनी बनविलेल्या फास्ट्रॅक परफ्यूम्समध्ये प्रत्येक मूड आणि प्रसंगासाठी साजेसे ठरतील असे अनोखे सुगंध आहेत.  प्रत्येक परफ्यूमच्या अनोखेपणानुसार प्रॉडक्ट डिझाईन देखील अतिशय हटके ठेवण्यात आले आहे.  ब्ल्यूटूथ स्पीकरपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले प्रॉडक्ट डिझाईन अतिशय आकर्षक आहे.  फास्ट्रॅक परफ्यूम्समध्ये मोहकतामौजमजाउत्साह आणि प्रभावी स्टाईल यांचा उत्तम मिलाप घडून आला आहे.

 फास्ट्रॅक परफ्यूम्सची घोषणा करताना टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस आणि वेअरेबल्स विभागाचे सीईओ श्री. एस. रवी कांत यांनी सांगितलेभारतातील युवा पिढीचा सर्वात आवडता फॅशन ब्रँड असल्यामुळे फास्ट्रॅकने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या वेगाने बदलत असलेल्या आवडीनिवडी आणि गरजांना साजेशी उत्पादने बनविण्याचा प्रयत्न केला आहे.  सध्या व्यक्तिगत जीवनशैलीशी निगडित उत्पादनांच्या बाजारपेठेत दर्जेदार उत्पादनांची कमतरता असल्यामुळे आम्ही या उद्योगात विस्तार करण्याचा निर्णय घेतला. व्यक्तिमत्व विकास आणि त्यामध्ये सुगंधाचा स्मार्ट वापर यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे ग्राहकांची परफ्यूम्सची मागणी वाढत असल्यामुळे आम्ही हे कलेक्शन तयार केले आहे.  आमच्या इच्छित ग्राहकांसोबत अधिक घनिष्ठ संबंध जोडले जावेत यासाठी देशातील युवापिढीची लाडकी अभिनेत्री अनन्या पांडेची निवड ही आमच्या युवाकेंद्री धोरणाला अतिशय साजेशी आहे.  अनन्या खऱ्या अर्थाने युथ आयकॉन आहेट्रेंडीआधुनिकजोशपूर्ण आणि प्रभावी ही फास्ट्रॅकची सर्व वैशिष्ट्ये अनन्याच्या व्यक्तिमत्वातही दिसून येतात.  यावेळी प्रतिक्रिया देताना टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. मनीष गुप्ता यांनी सांगितलेआजची युवापिढी फॅशनच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आणि आधुनिक आहे.  त्यांच्या व्यक्तिमत्व सादरीकरणात सुगंध अतिशय महत्त्वाची मानली जातात आणि म्हणूनच युथ फॅशन ब्रँड असलेल्या फास्ट्रॅकने आपला पुढील विस्तार परफ्यूम्समध्ये करण्याचे ठरविले.  उत्पादन गुणवत्तेच्या बाबतीत  उत्तमोत्तम कामगिरी बजावण्यावर टायटन कंपनीने नेहमीच भर दिला आहे.  फास्ट्रॅक परफ्यूम्स देखील याला अपवाद नाहीत.  मला खात्री आहे की फास्ट्रॅक परफ्यूम्स हे लवकरच आपल्या देशातील फॅशन फॉरवर्ड आणि ट्रेंडी युवापिढीचा परफ्यूम ब्रँड म्हणून ओळखले जातील.

 जेन झेड स्टार अनन्या पांडेने फास्ट्रॅक परफ्यूम्सच्या लॉंचच्या वेळी सांगितलेटायटन कंपनीच्या सर्वात स्टायलिश ब्रँड्सपैकी एक असलेल्या फास्ट्रॅकची ब्रँड अम्बॅसॅडर बनण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप खुश आहे.  फास्ट्रॅक ब्रँड म्हणजे मजाउत्साहफास्ट्रॅक ब्रँड म्हणजे कुछ हटके अशी ओळख माझ्या बोल्डट्रेंडी आणि तरीही क्लासी स्टाईलला साजेशी आहे.  फास्ट्रॅक परफ्यूम्स खास आहेतत्यांची मोहकता अतिशय वेगळी आहे.  मी असे मानते की प्रत्येकाच्या दैनंदिन ग्रूमिंगमध्ये परफ्यूम्स खूप महत्त्वाचे असताततुम्ही कोणता परफ्यूम वापरता यावरून तुमचे व्यक्तिमत्व ओळखले जाते.  फास्ट्रॅकने परफ्युम्सची विशाल श्रेणी तयार केली आहेहे परफ्यूम्स तुमच्या व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवतात आणि तुम्हाला स्वतःला अतिशय आत्मविश्वासाने सादर करण्याची संधी देतात.”      महिलांसाठीच्या फास्ट्रॅक परफ्यूम्समध्ये स्त्रीत्व आणि ग्लॅमर यांचा प्रभावी मिलाप दिसून येतो.  तर पुरुषांसाठीच्या फास्ट्रॅक परफ्यूम्समध्ये ताजेपणाउत्साहजोश जाणवतो.  या अनोखेपणामुळे फास्ट्रॅक परफ्यूम्सची ही श्रेणी लवकरच युवापिढीच्या स्टायलिंग आणि ग्रुमिंगचा अविभाज्य भाग बनेल.

 ट्रान्सबीट आणि पल्स या फास्ट्रॅक परफ्यूम्सच्या १०० मिली पॅकची किंमत ८४५ रुपये आहे तर सोलो फास्ट्रॅक परफ्यूम्सची किंमत ९९५ रुपये आहे.  फास्ट्रॅक स्टोर्सFastrack.in आणि देशभरातील मोठी डिपार्टमेंटल स्टोर्सब्युटी व कॉस्मेटिक्स स्टोर्समध्ये हे परफ्यूम्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.    फास्ट्रॅक

फास्ट्रॅक हा ब्रँड १९९८ साली सुरु करण्यात आला व २००५ पासून हा एक स्वतंत्र अर्बन युथ ब्रँड म्हणून कार्यरत आहे.  तेव्हापासून या ब्रॅंडने अतिशय नवीनअनोखे व सहज आवडतील असे वॉचेस व सनग्लासेस सादर करून आपली स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.  २००९ साली फास्ट्रॅकने बॅग्सबेल्ट्स आणि वॉलेट्सची आकर्षक श्रेणी सादर करून ऍक्सेसरीज बाजारपेठेत दमदार पदार्पण केले.  देशभरातील ७९ पेक्षा जास्त शहरांमधे १७३ एक्सक्लूसिव फास्ट्रॅक स्टोर्स आणि अधिकृत मल्टी-ब्रँड आउटलेट्स तसेच www.fastrack.in या वेबसाईटमार्फत ऑनलाईन विक्री असे विशाल रिटेल विक्री नेटवर्क या ब्रॅण्डने निर्माण केले आहे.  आज फास्ट्रॅक हा देशातील सर्वाधिक आवडीचा युथ फॅशन ब्रँड म्हणून नावाजला जातो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...