मर्सिडीझ-बेंझची नवीन जीएलसी विथ एमबीयूएक्स बाजारात दाखल

Date:

 

  • देशात बनविल्या जाणाऱ्या एसयूव्ही श्रेणीतील सर्वाधिक टेक सॅव्ही एसयूव्ही. ऍक्टिव्ह ब्रेकिंग असिस्ट सुविधा असलेली पहिलीदेशात बनविली गेलेली एसयूव्ही.
  • लक्झरी कार विभागात सर्वात मोठा एसयूव्ही पोर्टफोलिओ मर्सिडीझ-बेन्झचा आहे.  (एकूण ८ एसयूव्ही)
  • नवीन जीएलसी २००साठी स्टार इज सर्व्हिस पॅकेज दोन वर्षे / असीमित किलोमीटर्ससाठी ६६,१०० रुपयांपासून सुरु होत आहे.  तर जीएलसी २२० डी साठी हे पॅकेज सर्व्हिस पॅकेज दोन वर्षे / असीमित किलोमीटर्ससाठी ७५.९०० रुपयांपासून सुरु होत आहे.
  • नवीन जीएलसी २०० ची किंमत ५२.७५ लाख रुपये तर जीएलसी २२० डी ४मॅटिक ची किंमत ५७.७५ लाख रुपये आहे. (सर्व किमती एक्स-शोरूम, भारत)      
  • संचालनाची नवी संकल्पनाअत्याधुनिक ड्रायव्हिंग असिस्टंस सिस्टिमबीएस ६ इंजिनांची नवी श्रेणी यांनी परिपूर्ण जीएलसीमध्ये मर्सिडीझ-बेंझ एसयूव्ही श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि सुविधा आहेत.
  • एनटीजी ६ टेलिमॅटिक्स असलेली जीएलसी ही भारतातील पहिली मर्सिडीझ-बेंझ आहे.
  • अत्याधुनिक मर्सिडीझ-बेंझ युजर एक्स्पीरियंस मल्टिमीडिया सिस्टिम अंतर्ज्ञानावर आधारित तंत्रज्ञान आणि टच कंट्रोल व ऑप्टिमाइज्ड एआयवर आधारित व्हॉइस कंट्रोल सिस्टिम यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यायांमुळे आपला अनोखा प्रभाव निर्माण करते.
  • मर्सिडीझ-बेंझच्या एमबीयूएक्स नेव्हिगेशन सिस्टिममध्ये व्हॉट३वर्ड्स लोकेशन तंत्रज्ञान आहे.  आपल्या ग्राहकांना प्रीमियम आणि अंतर्ज्ञान तंत्रज्ञानावर आधारित अनुभव मिळवून देण्यासाठी मर्सिडीझ-बेंझ वचनबद्ध आहे.  ड्रायव्हर्सना दरवेळी त्यांच्या इच्छित ठिकाणी अचूकपणे पोहोचता यावे हे व्हॉट३वर्ड्स सुनिश्चित करते.
  • शहरीटेक सॅव्ही असलेल्यात्याचबरोबरीने साहसाचीआधुनिकतेची आवड असलेल्यांसाठी नवीन जीएलसी तयार करण्यात आली आहे.

 नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेन्झने आज त्यांची नवीन जीएलसी बाजारपेठेत दाखल केली. भरपूर मोकळी जागाव्यवहार्यता आणि आरामदायीपणा यांसह उत्कृष्ट ऑन आणि ऑफ़-रोड ड्रायव्हिंग वैशिष्ट्यांचा मिलाप असलेली ही अत्याधुनिक गाडी आहे.  उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करून सर्वोत्कृष्ट कारीगरीसंपूर्णतः नवीनअस्सलक्लासी डिझाईन असलेली ही जीएलसी पाहताक्षणी लक्ष वेधून घेते. मर्सिडीझ-बेन्झचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी आज नवी दिल्लीत नवीन जीएलसीचे उदघाटन केले.

 मर्सिडीझ-बेन्झचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी यावेळी सांगितलेग्राहकांना केंद्रस्थानी मानून त्यांना हवी तशी उत्पादने विकसित करण्यासाठी मर्सिडीझ-बेंझ प्रयत्नशील आहे.  अंतर्ज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाचा आणि ड्रायव्हिंगचा सर्वोत्तम अनुभव मिळावा हा त्यांचा उद्देश आहे.  नवीन जीएलसी ही भारतात बनविली गेलेली सर्वाधिक टेक-सॅव्ही एसयूव्ही आहे.  याच्या लोकप्रियतेमुळे आम्ही यामध्ये मर्सिडीझ-बेन्झची संपूर्णपणे नवीन एमबीयूएक्स ही अंतर्ज्ञानावर आधारित इंफोटेंमेंट सिस्टिम आणली आहे.  नवीन जीएलसीमध्ये एसयूव्हीची मजबुती आणि एमबीयूएक्सचा इंटेलिजन्समर्सिडीझ-बेन्झची ओळख असलेली लक्झरी या सर्व गोष्टी आहेत.  आम्हाला पक्की खात्री आहे की ही आमची नवीन गाडी चोखंदळ आणि आधुनिक ग्राहकांची मने जिंकेल.” 

 श्वेन्क यांनी पुढे सांगितले, “भारतीय ग्राहकांना हवे तसेभारतीय बाजारपेठेला साजेसे उत्पादन सादर करण्याची आमची वचनबद्धता नवीन जीएलसीमधून अधोरेखित होते.  नवीन जीएलसी ही मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या सर्वाधिक विक्री असलेल्या एसयूव्हीजपैकी एक आहेआजवर त्यांच्या ७००० पेक्षा जास्त गाड्या विकल्या गेल्या आहेत.  अत्याधुनिक एमबीयूएक्सची सुरुवात हे या नवीन जीएलसीचे वैशिष्ट्य आहे.  कारमधील सर्व सिस्टिम्स वापरण्यात ड्रायव्हरला अधिक जास्त सुविधा मिळावी हा याचा उद्देश आहे.  शहरीटेक सॅव्ही असलेल्यात्याचबरोबरीने साहसाचीआधुनिकतेची आवड असलेल्यांसाठी नवीन जीएलसी तयार करण्यात आली आहे. मध्यम आकाराच्या लक्झरी एसयूव्ही विभागात एमबीयूएक्ससोबत जीएलसीने स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे आणि आम्हाला पक्की खात्री आहे की ग्राहकांची सर्वाधिक पसंती या कारला सातत्याने मिळत राहील.”

 जीएलसीमधील सर्वाधिक महत्त्वाच्या सुविधा

एमबीयूएक्स – नाविन्यपूर्ण टेलिमॅटिक्स: टचस्क्रीन मल्टिमीडिया डिस्प्लेनेव्हिगेशन त्यासोबत ऑगमेंटेड रिऍलिटीटॉक बटन किंवा “हे मर्सिडीझ” प्रॉम्प्ट मार्फत इंटेलिजंट व्हॉइस कंट्रोलकनेक्टिव्हिटी आणि युजर इंटरफेस यामुळे जीएलसी अत्याधुनिकसर्वात नवीन तंत्रज्ञान मापदंडांना अनुरूप बनली आहे.

 व्हॉट३वर्ड्स: मर्सिडीझ-बेन्झने आपल्या एमबीयूएक्स नेव्हिगेशन सिस्टीममध्ये व्हॉट३वर्ड्स लोकेशन तंत्रज्ञान बसविले आहे.  आपल्या ग्राहकांना प्रीमियम आणि अंतर्ज्ञान तंत्रज्ञानावर आधारित अनुभव मिळवून देण्यासाठी मर्सिडीझ-बेंझ वचनबद्ध आहे.  ड्रायव्हर्सना दरवेळी त्यांच्या इच्छित ठिकाणी अचूकपणे पोहोचता यावे हे व्हॉट३वर्ड्स सुनिश्चित करते.  वाहनांमध्ये व्हॉट३वर्ड्स तंत्रज्ञान बसविल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाची माहिती नेमकी आणि अतिशय सोप्या पद्धतीने मिळू शकेल.  व्हॉट३वर्ड्स ही एकमेव अड्रेसिंग सिस्टिम आहे ज्यामुळे आवाजाच्या माध्यमातून ठिकाणांची अचूक माहिती मिळते.  मर्सिडीझ-बेन्झने या प्रणालीची क्षमता ओळखून तिचा समावेश आपल्या इंफोटेंमेंट सिस्टिममध्ये केलायामुळे इन-कार नेव्हिगेशनमधील आव्हाने दूर करून ड्रायव्हिंगचा अधिक सुविधाजनक अनुभव मिळतो.

 व्हॉट३वर्ड्सचे सीईओ व सह-संस्थापक ख्रिस शेल्ड्रिक यांनी सांगितलेपारंपरिक पत्ते हे व्हॉइस इन्पुटसाठी बनविले गेलेले नाहीत.  यामध्ये देखील हजारो अशा शब्दांचा वापर केला जातो ज्यांचा उच्चार करणे आणि तो ओळखणे जवळपास अशक्य असते.  नावीन्य ही मर्सिडीझ-बेन्झची ओळख आहे.  त्यामुळे आपल्या वाहनांमध्ये ही अत्याधुनिक प्रणाली बसविणारी सर्वात पहिली कंपनी मर्सिडीझ-बेंझ आहे यात काहीच नवल नाही.” 

 अत्याधुनिक असिस्टंस सिस्टिम्स: ऍक्टिव्ह ब्रेकिंग असिस्ट

  • अँबियन्स लायटिंग: इच्छित लायटिंग मूडसाठी ६४ कलर लेव्हल्स
  • टच कंट्रोल बटन्स असलेले नवीन स्टीअरिंग व्हील
  • नवीन वॉलनट ओपन पोअर वूड ट्रिम
  • वायरलेस चार्जिंग फ्रंट
  • मिडलाईन साउंड सिस्टिम

बाह्य रचना: अनोखे रूप

जीएलसीची रचना सुखदायकआकर्षक शुद्धतेच्या रचना सिद्धांतावर आधारित असून सुरुचीकलात्मकतास्फूर्ती व बुद्धिमत्ता यांचा वापर केला गेला आहे.  तिचे एकंदरीत रूप स्पोर्टीयर असून पुढून पाठीपर्यंत जाणारे क्रोम एलिमेंट्स स्टॅंडर्ड म्हणून रचना पूर्ण करतात.

 अनोख्या लाईन्समॅस्क्युलरली स्क्लप्टेड पृष्ठभाग आणि खास बारकावे यामुळे या गाडीला प्रभावी ऑफ-रोड कॅरॅक्टर मिळाले आहे.  स्टॅंडर्ड-फिट एलईडी हाय-परफॉर्मन्स हेडलॅम्प्स छोटे आणि अधिक रेकेड आहेतत्यांच्या कँटॉर्समध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 संपूर्णतः सुधारित बम्पर आणि एगझोस्ट टिप्समध्ये देखील गाडीचा ऍथलेटिक प्रभाव कायम राखला गेला आहे.  पुनर्रचना करण्यात आलेले फुल एलईडी टेल लॅम्प्स बॅकलिट एज-लाईट स्पेसिफिकेशनमध्ये मर्सिडीझ-बेंझ एसयूव्हीजचे हॉलमार्क ब्लॉक्स या गाडीचा बिनचूक लाईट प्रभाव सुनिश्चित करतात.

 एमबीयूएक्स: इंट्यूटिव्ह ऑपरेशन

हावभावस्पर्श किंवा व्हॉइस कंट्रोल सिस्टिममार्फत वाहन व त्यातील फॅक्शन्ससोबत संवाद साधण्यावर भर दिला गेला आहे.  मर्सिडीझ-बेंझ युजर एक्स्पीरियंसच्या सर्वात नवीन टेलिमॅटिक्स जनरेशनमुळे हे शक्य झाले आहे.  इंट्यूटिव्ह अर्थात अंतर्ज्ञानावर आधारित तर्क आणि विविध संचालन पर्यायांमुळे हे शक्य झाले आहे.  जीएलसीच्या इंफोटेंमेंट सिस्टिमसोबत संवाद साधण्याचे पाच वेगवेगळे पर्याय आहेत:

  • सेंटरमध्ये मल्टिमीडिया डिस्प्लेवर टच कंट्रोल
  • मल्टिमीडिया स्टीअरिंग व्हीलवरील टच कंट्रोल बटन्स वापरून
  • सेंटर कन्सोलवरील मल्टिफंक्शन टचपॅड
  • स्टीअरिंग व्हीलवरील टॉक बटन किंवा “हे मर्सिडीझ” प्रॉम्प्ट वापरून व्हॉइस कंट्रोलमार्फत

 सुधारित व्हॉइस कंट्रोल सिस्टिममुळे संचालन अधिक जास्त सोपे आणि नैसर्गिक पद्धतीने करता येते.  व्हॉइस कमांडमुळे सिस्टिम टेक्स्ट मेसेजेस वाचू शकतेड्रायव्हर केवळ आवाजाने ऑडिओ सिस्टिम चालवू शकतोक्लायमेट कंट्रोलसारखी फंक्शन्स केवळ आवाजाने वापरू शकतो  या सिस्टिमला मेमराईज्ड कमांड्सची गरज नसते.  यामध्ये युजरला स्वातंत्र्य असतेतो इच्छित स्थळाचा पत्ता किंवा हवामानाची माहिती विचारू शकतो.  “हे मर्सिडीझ” प्रॉम्प्टच्या साहाय्याने व्हॉइस कंट्रोल ऍक्टिव्हेट करता येतो.  यासाठी स्टीअरिंग व्हीलवर अतिरिक्त टॉक बटन देखील दिलेले असते.

 इंजिन्सची नवीन श्रेणी: शक्ती व क्षमता यांचा संगम      

तपशील जीएलसी २०० जीएलसी २०० डी ४मॅटीक
सिलिंडर्स / अरेंजमेंट ४/इन-लाईन ४/इन-लाईन
आउटपुट (केडब्ल्यू / एचपी) कम्बस्चन इंजिन १४५/१९७ १४३/१९४
सर्वाधिक टॉर्क कम्बस्चन इंजिन (एनएम) ३२० ४००
०-१०० स्प्रिंट ७.८ ७.९
इंधन वापर, एकत्रित (आय/१०० किमी) ७.४ – ७.१ ५.५ – ५.२
कार्बन उत्सर्जन, एकत्रित (जी/किमी) १६९-१६१ १४५-१३७

जीएलसीमध्ये अत्याधुनिक ४ सिलिंडर पेट्रोल व डिझेल इंजिन्स असतील.  मर्सिडीझ-बेन्झच्या एम २६४ दोन लिटर चार सिलिंडर इंजिनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लक्षणीय प्रमाणात कमी इंधन वापरून हे अधिक जास्त कामगिरी बजावते.  जीएलसी २०० मध्ये एम २६४  चार सिलिंडर इंजिनऐवजी एम २७४ प्रिडेसेसर इंजिन आहे, ओएम ६५४ चार सिलिंडर डिझेल इंजिन ऐवजी ओएम ६५१ प्रिडेसेसर इंजिन आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...