टीपीजी ग्रोथद्वारे एस के फिनकॉर्पमधील 33 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे नेतृत्व

Date:

मुंबई – अल्टरनेट असेट कंपनी टीपीजीची मध्यम बाजारपेठ आणि विकास इक्विटी प्लॅटफॉर्म कंपनी टीपीजी ग्रोथ, बहुस्तरीय विकास गुंतवणूक फंड नॉर्वेस्ट व्हेंचर पार्टनर्स आणि भारतावर लक्ष केंद्रित केलेला आघाडीचा खासगी इक्विटी प्लॅटफॉर्म इव्हॉल्व्हन्स इंडिया यांनी एकत्रितपणे एस के फिनकॉर्प या बिगर- बँक वित्त कंपनीमध्ये 33 दशलक्ष डॉलर्सची (235 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. एस के फिनकॉर्प ही प्रयोगशील एनबीएफसी प्रामुख्याने उत्तर व पश्चिम भारतातील ग्रामीण तसेच निमशहरी प्रदेशातील छोटे व्यवसाय तसेच व्यावसायिक वाहन क्षेत्रातील संपत्ती निर्मिती कामांसाठी वित्तपुरवठा करते. सध्याची फेरी आजमितीच्या गुंतवणुकदारांनी पूर्णपणे सबस्क्राइब केली होती.

एस के फिनकॉर्पची स्थापना पहिल्या पिढीतील उद्योजक राजेंद्र सेटिया यांनी 1994 मध्ये केली होती. चालू वर्ष कंपनीचा 25 वा वर्धापनदिन असून गेल्या तीन वर्षांत तयार केलेल्या दमदार विकास मार्गातील सातत्य कंपनीने राखले आहे. एस के फिनकॉर्प आज राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा अशा 300 ठिकाणी कार्यरत असून तेथील प्रामुख्याने कमी- उत्पन्न गटातील आणि स्वयंरोजगार मिळवणाऱ्यांना सेवा देत आहे. एस के फिनकॉर्पचे एकूण 130,000 ग्राहक असून 3000 कर्मचारी व 2500 कोटी रुपयांची कर्ज पुस्तिका आहे.

‘कंपनीशी सध्या निगडीत असलेल्या गुंतवणुकदारांनी परत एकदा एस के फिनकॉर्पमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत. यापूर्वीच्या शेवटच्या इक्विटी फेरीनंतर, बाजारपेठेतील परिस्थिती तंग असतानाही आम्ही आमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिलो आणि आमची खासियत तसेच आमच्या व्यासायिक पद्धतीलची लवचिकता दर्शवत गेल्या 25 वर्षांत तयार केलेल्या व्यासपीठाचे भांडवल उपयोगास आणले. ही गुंतवणूक आणि योग्य धोरणाच्या मदतीने आम्हाला विकासाला चालना देता येईल. शिवाय त्याच्या मदतीने आमचे अस्तित्व, सेवा तंत्रज्ञान तसेच स्पर्धेसाठी फायदा होईल,’ असे एस के फिनकॉर्पचे व्यवस्थापतीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सेटिया म्हणाले.

‘ऑक्टोबर 2018 मध्ये प्राथमिक गुंतवणुकीनंतर एस के फिनकॉर्पने केलेली लक्षणीय प्रगती पाहाताना आम्हाला अतिशय समाधान वाटत आहे. एस के फिनकॉर्पच्या नेतृत्व फळीवर आमचा गाढ विश्वास असून कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्यास पाठिंबा देण्यासाठी या फेरीत परत लक्षणीय गुंतवणूक करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे टीपीजीमधील भागीदार गौरव त्रेहान म्हणाले.

‘एस के विकास आणि नफ्याबाबतच्या आमच्या अपेक्षा सातत्याने ओलांडून पुढे जात असून गेल्या आठ तिमाहींमध्ये कंपनीची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता तीन पटींनी आणि करोत्तर नफा दहा पटींनी वाढला आहे. त्याचबरोबर मालमत्तेचा दर्जा राखण्यातही आम्ही यश मिळवले आहे. एस के आणि श्री. सेटिया यांच्याबरोबर भागिदारी करताना आम्हाला आनंद होत असून ही आमची कंपनीसाठी केलेली तिसरी इक्विटी फंडिंग फेरी आहे,’ असे नॉर्वेस्ट व्हेंचर पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक निरेन शहा म्हणाले.

‘ज्या क्षेत्रात कंपनी काम करते ते क्षेत्र, त्यांचा व्यवस्थापन संघ, प्रक्रिया आणि कंपनीची कामगिरी लक्षात घेता सध्या विस्कळीत झालेल्या एनबीएफसी क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी एस के फिनकॉर्प अतिशय योग्य टप्प्यावर आहे आणि अशाचप्रकारे ती चांगली कामगिरी करत राहील,’ असे एव्हॉलव्हन्स इंडियाचे अजित कुमार म्हणाले.

सध्याच्या फेरीपूर्वी एस के फिनकॉर्पने नामांकित गुंतवणुकदारांकडून इक्विटी फंडिंगच्या तीन फेऱ्या उभारल्या होत्या. त्यातील पहिली फेरी 2012 मध्ये झाली होती, तर 2017 मध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीत 200 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीत 300 कोटी रुपयांची उभारणी झाली होती.

एस के फिनकॉर्पबद्दल

1994 मध्ये स्थापन झालेली व जयपूरमध्ये स्थित असलेली एस के फिनकॉर्प ही भारतीय मध्यम बाजारपेठेतील सर्वात मोठी आणि पद्धतशीरपणे महत्त्वाची नॉन- डिपॉझिट अक्सेप्टिंग असेट फायनान्स रिटेल फ्रँचाईझी कंपनी आहे. एस के फिनकॉर्पद्वारे पाच वेगवेगळ्या उत्पादन विभागांसाठी वित्तपुरवठा केला जातो व त्यात व्यावसायिक वाहने, शेती आणि बांधकाम उपकरणे, प्रवासी वाहने, दुचाकी आणि छोट्या उद्योगांसाठी कर्ज यांचा समावेश आहे.

ठराविक प्रदेशांतील बाजारपेठेत कंपनी अग्रस्थानी असून 300 पेक्षा जास्त शाखांच्या विस्तारित वितरण नेटवर्कच्या मदतीने सहा राज्यांतील सखोल व्याप्ती आणि टिकाऊ पाया यांच्या मदतीने हे स्थान कंपनीने मिळवले आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी इस के फिनकॉर्पच्या कर्जदार वर्गामध्ये अंदाजे 1,34,000 जणांचा समावेश होता, तर व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता 23,500 दशलक्ष रुपये आहे.

टीपीजी ग्रोथबद्दल

टीपीजी ग्रोथ ही टीपीजी या ग्लोबल अल्टरनेटिव्ह असेट कंपनीची मध्यम बाजारपेठ आणि विकास इक्विटी गुंतवणूक प्लॅटफॉर्म कंपनी आहे. कंपनीची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता 14.5 अब्ज डॉलर्स असून टीपीजी ग्रोथ विस्तृत औद्योगिक क्षेत्रे आणि भौगोलिक प्रदेशांत गुंतवणुकीवर भर देते. टीपीजी ग्रोथकडे मूल्य निर्मितीसाठी आणि कंपन्यांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण लाभ करून देणारे या क्षेत्राचे सखोल ज्ञान, कार्यकालीन स्त्रोत आणि जागतिक अनुभव आहे. कंपनीला टीपीजीच्या स्त्रोतांचे पाठबळ मिळाले असून त्यामध्ये तब्बल 111 अब्ज डॉलर्स व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेचा समावेश आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...