५ पट जलद चार्जिंग -सिस्‍कातर्फे P1017B पॉवर गेन १०० पॉवर बँक सादर

Date:

मुंबईसिस्‍का अॅक्‍सेसरीज या भारतातील मोबाइल अॅक्‍सेसरीज विभागामध्‍ये नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने देणा-या अग्रणी कंपनीने आज सिस्‍का P1017B पॉवर गेन १०० पॉवर बँकच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ही पॉवर बँक सडपातळ असून ५ पट जलद चार्जिंग सुविधा देते. सिस्‍का मोबाइल अॅक्‍सेसरीज अव्‍वल दर्जाच्‍या उत्‍पादनांची व्‍यापक रेंज देते. यामध्‍ये वायरलेस स्‍पीकर्स, वायरलेस हेडसेट्स, ब्‍ल्‍यूटूथ इअरफोन्‍स, कार चार्जर्स अशा सर्वोत्‍तम उत्‍पादनांचा समावेश आहे.

रिसर्च अॅण्‍ड मार्केट्सच्‍या अहवालानुसार जागतिक पॉवर बँक बाजारपेठ मूल्‍य २०१९-२०२४ दरम्‍यान २० टक्‍क्‍यांहून अधिक सीएजीआर दराने वाढ होत वर्ष २०२४ पर्यंत अंदाजे २९.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्‍पा गाठण्‍याचा अंदाज आहे. सिस्‍का पॉवर गेन १०० पॉवर बँकमध्‍ये उच्‍च घनतेचे पॉलिमर सेल, डिस्‍चार्ज व ओव्‍हरचार्ज संरक्षण, १०,००० एमएएच क्षमता आणि ड्युअल इनपुट व आऊटपुट पोर्टस् अशी सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये आहेत. ज्‍यामुळे युजर्सना एकाच वेळी विविध डिवाईसेस चार्ज करता येतात. ही पॉवर बँक विविध रंगांमध्‍ये उपलब्‍ध असून तिची किंमत १,५९९/- रूपये आहे. ही पॉवर बँक देशातील सर्व प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स व लॅपटॉप्‍स अशा इलेक्‍ट्रॉनिक डिवाईसेससाठी वाढती मागणी पाहता जागतिक पॉवर बँक बाजारपेठेमध्‍ये सध्‍या सातत्‍याने वाढ होताना दिसत आहे. तसेच ४जीचे उत्‍साही आणि मोबाइल इंटरनेटच्‍या वाढत्‍या वापरामुळे या स्‍मार्ट डिवाईसेसच्‍या बॅटरी कार्यकालावर परिणाम होत आहेत. म्‍हणूनच जगभरात पॉवर बँक्‍ससाठी मागणीला चालना मिळाली आहे.

या सादरीकरणाबाबत बोलताना सिस्‍का ग्रुपच्‍या कार्यकारी संचालक श्रीमती ज्‍योत्‍स्‍ना उत्‍तमचंदानी म्‍हणाल्‍या, ”दर्जात्‍मक उत्‍पादने सादर करण्‍याची कटिबद्धता म्‍हणून आम्‍ही स्‍टायलिश असण्‍यासोबत आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करणारी तंत्रज्ञानकेंद्रित नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने सादर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. सखोल संशोधन आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक वापराचे विश्‍लेषण करत सिस्‍काची उत्‍पादने निर्माण करण्‍यात येतात. पॉवर बँक ग्राहकांसाठी आवश्‍यक मोबाइल अॅक्‍सेसरी बनले असताना सिस्‍का P1017B पॉवर गेन १०० पॉवर बँक चालता-फिरता सुसंगत व कार्यक्षम आणि परवडणा-या किंमतीमधील उत्‍पादनांचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी निर्माण करण्‍यात आली आहे.”

सिस्‍का P1017B पॉवर गेन १०० पॉवर बँकची प्रमुख वैशिष्‍ट्ये:                            `              

  • स्लिम डिझाइन – सिस्‍काच्‍या पॉवर गेन १०० पॉवर बँकमध्‍ये ग्रेड ए+ उच्‍च ऊर्जा घनता असलेली १०,००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. कार्यक्षम कामगिरीसाठी या बॅटरीची चाचणी करण्‍यात आली आहे.
  • दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी: सिस्‍काच्‍या पॉवर गेन १००चा ऊर्जा वापर चार्जिंग करताना पल्‍सच्‍या मॉड्युलेशनच्‍या माध्‍यमातून आपोआपपणे कमी होतो आणि बॅटरी दीर्घकाळापर्यंत टिकते.
  • इंटेलिजण्‍ट मल्‍टी-प्रोटेक्‍शन सर्किट – सिस्‍काची पॉवर गेन १०० पॉवर बँक इटेलिजण्‍ट सर्किटसह तयार करण्‍यात आली आहे. ज्‍यामधून विद्युतप्रवाह स्थिर राहण्‍यासह सुरक्षित चार्जिंगची खात्री मिळते.
  • जलद चार्जिंगसह प्रगत विद्युतप्रवाह बदल – सिस्‍काची पॉवर गेन १०० पॉवर बँक प्रतिचार्ज दुप्‍पट चार्ज देते आणि विद्युतप्रवाहामध्‍ये बदल करु शकते. ज्‍यामुळे पॉवर बँक एकाच वेळी स्‍वत: चार्ज होण्‍यासह इतर डिवाईसना देखील चार्ज करते.
  • मल्‍टी कॉम्‍पॅटिबल

पॉवर बँक डिजिटल कॅमेरा, गेमिंग कन्‍सोल, आयपॉड्स, एमपी३/एमपी४ प्‍लेअर्स, टॅब्‍लेट्स, पीडीए, ब्‍ल्‍यूटूथ स्‍पीकर्स, हेडफोन्‍स, अँड्रॉईड किंवा आयफोन्‍स अशा व्‍यापक डिवाईसेसशी कॉम्‍पॅटिबल आहे.

  • ओव्‍हरचार्ज व डिस्‍चार्ज प्रोटेक्‍शन –

तुम्‍ही डिवाईसेस पूर्णपणे चार्ज झाल्‍यानंतर वीजप्रवाह बंद करण्‍यास किंवा डिवाईसेस अनप्‍लग करण्‍यास विसरलात तर सिस्‍काची पॉवर गेन १०० पॉवर बँक आपोआपपणे पॉवर ट्रान्‍सफर बंद करते. तसेच इंटेलिजण्‍ट मल्‍टी–प्रोटेक्‍शन सर्किट्स हे सर्किटच्‍या सुरक्षिततेसाठी प्रमाणित विद्युतप्रवाहाच्‍या पलीकडे गेल्‍यास आऊटपुट त्‍वरित बंद करतात.

सिस्‍का अॅक्‍सेसरीज बाबत

आजचे युग हे कनेक्‍टेड आहे आणि प्रत्‍येकजण त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये डिवाईसेसशी जुडलेले आहेत. सिस्‍का अॅक्‍सेसरीज तुम्‍हाला संपन्‍न अनुभव देण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या प्रगत अॅक्‍सेसरीजची व्‍यापक रेंज देते. वायरलेस स्‍पीकर्स ते हेडसेट्सपर्यंत हा विभाग उच्‍च आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे आणि वापरण्‍यास सुलभ असे आधुनिक इनोव्‍हेशन्‍स देतो. सिस्‍का अॅक्‍सेसरीज उत्‍पादने उच्‍च दर्जाची आहेत आणि त्‍यांच्‍या किंमती देखील परवडणा-या आहेत. गतीमान ग्राहकवर्गाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सिस्‍का अॅक्‍सेसरीज सामान्‍य ट्रेड, आधुनिक ट्रेडमधील प्रमुख रिटेल आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...