महिंद्रा हॅपिनेस्टचा अफोर्डेबल हौसिंगवर नव्याने भर

Date:

अफोर्डेबल हौसिंगमध्ये या क्षेत्रातील पहिलेवहिले नावीन्य असणाऱ्या हॅपिनेस्ट कल्याणने पहिल्याच आठवड्यात प्राप्त केले 500+ अर्ज

मुंबई: महिंद्रा हॅपिनेस्ट डेव्हलपर्स लिमिटेड (महिंद्रा हॅपिनेस्ट) या महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि. (‘एमएलडीएल’) आणि एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड-1 (‘एचडीएफसी कॅपिटल’) यांच्या संयुक्त भागीदारीने ‘लिव्ह, स्माइल अँड प्रॉस्पर’ या नव्या आश्वासनाद्वारे अफोर्डेबल हौसिंगवर नव्याने लक्ष केंद्रित केले आहे. उत्तम व भव्य आयुष्याची आकांक्षा असणाऱ्या विकसित होणाऱ्या, तरुण भारतीयांना सेवा देण्यासाठी, महिंद्रा हॅपिनेस्ट घर घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची स्वप्ने, आकांक्षा व महत्त्वाकांक्षा यामध्ये त्यांची आर्थिक स्थिती अडथळा ठरणार नाही, याची दक्षता घेणार आहे.

हॅपिनेस्ट कल्याण या नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या अफोर्डेबल हौसिंग प्रकल्पाने आठवडाभरातच 500+ अर्ज प्राप्त केले असल्याचेही ब्रँडने जाहीर केले आहे. हा प्रकल्प जमीन संपादित केल्यापासून विक्रमी 8 दिवसांत दाखल करण्यात आला.

भिवंडी-कल्याण कॉरिडॉर (नवीन बीकेसी) या मोक्याच्या ठिकाणी नऊ एकर क्षेत्रात वसलेल्या हॅपिनेस्ट कल्याणमध्ये 7, 14 व 22 मजली टॉवर असून त्यामध्ये 1 BHK व 2 BHK अशी 1,241 घरे आहेत. या प्रकल्पातील घरांची किंमत 29.95 लाख रुपये ते 55.70 लाख रुपये या दरम्यान आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीकडे (“महारेरा”)[1] नोंदवलेला आहे.

महिंद्रा हॅपिनेस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले, घर घेणाऱ्या ग्राहकांना किफायतशीर दरामध्ये आकर्षक घरे हवी आहेत. आतापर्यंत त्यांना या दोन्हीपैकी एकच पर्याय निवडावा लागायचा. हॅपिनेस्टमध्ये आम्ही हे विभाजन थांबवणार आहोत. ग्राहकांवर सखोल संशोधन केल्यावर तयार केलेल्या आमच्या उत्पादनांमध्ये अनेक वैशिष्ट्ये असून ती ग्राहकांच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करून त्यांना आनंद देणार आहेत. पहिल्यांदाच, आम्ही उपलब्ध करणार आहोत त्या विशेष सुविधांमधून काही सुविधांची निवड करण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करणार आहोत.   लोकप्रिय पर्याय व आर्थिक व्यवहार्यता यांची सांगड घालून अंतिम पर्याय निवडला जाणार आहे. घर घेण्याच्या किमतीइतकाच घराच्या देखभालीसाठी द्यावा लागणारा खर्चही महत्त्वाचा असतो, असे आम्हाला वाटते. आम्ही अशा प्रकारे विकास केला आहे की, त्यासाठी देखभालीचा खर्च लक्षणीय कमी झाला आहे. ग्राहकांनी अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आहे. प्रकल्प दाखल केल्यापासून पहिल्याच आठवड्यात 500 हून अधिक कुटुंबांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे.”

हॅपिनेस्ट कल्याणमध्ये राहणाऱ्यांना चांगल्या शाळा, महाविद्यालये, बिझनेस केंद्रे, रुग्णालये व बाजारपेठा यांच्याशी रस्ते-रेल्वे-मेट्रो याद्वारे उत्तम कनेक्टिविटी मिळणार आहे. हा प्रकल्प रेल्वे स्थानके व प्रस्तावित राजनौली मेट्रो स्टेशन (मेट्रो लाइन – 5) यांच्यापासून सोयीच्या अंतरावर आहे. प्रकल्पाच्या परिसरात आगामी काळात होणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये 126 किमी लांबीचा 12-पदरी विरार-अलिबाग मल्टि-मोडल कॉरिडॉर, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर, डोंबिवली मानखोली रोड यांचा समावेश असेल आणि यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि रोजगारामध्ये वाढ होण्यासाठी कनेक्टिविटी वाढणार आहे व नवे पर्याय मिळणार आहेत.

रहिवाशांच्या दैनंदिन गरजा विचारात घेऊन, या प्रकल्पात निरनिराळ्या प्रकारच्या आधुनिक सुविधांचा समावेश केला आहे, जसे क्रेश, मेडिकल, प्रीस्कूल, विशेष जॉगिंग व सायक्लिंग ट्रॅक. हॅपिनेस्ट कल्याणमध्ये या उद्योगातील काही पहिलीवहिली वैशिष्ट्ये व सुविधा समाविष्ट आहेत, जसे रहिवाशांनी व्यक्त केलेल्या गरजा आणि त्यांची व्यवसाय व्यवहार्यता या अनुषंगाने ‘मायसीरिज’, को-क्रिएटेड व पे-पर-युज सुविधा – स्टडी रूम, मिनी थिएटर, परफॉर्मिंग आर्ट्स स्पेस, स्टोअरेज सुविधा; प्रत्येक घरातील अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर प्रत्येक घरातील पाण्याच्या वापराची पाहणी करण्यासाठी आणि पाण्याचा गौरवापर टाळण्यासाठी मदत करतील. एसटीपीच्या रिअल-टाइम पाहणीमुळे उत्तम कामगिरी साधली जाईल आणि ब्रेकडाउनचा धोका कमी करता येईल.

युजरचे आरोग्य व कल्याण यांना चालना देण्यासाठी आणि भारतात शाश्वत शहरीकरणाला उत्तेजन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरांवर भर देत, जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश व वारा यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हॅपिनेस्ट कल्याणची रचना केली आहे. लेआउट कार्यक्षम असल्याने खोलीत वापरायला जागा अधिक मिळाली आहे व जागेचा गैरवापर टाळण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये अंदाजे 1200+ झाडे आहेत आणि ती बांधकामाच्या टप्प्यात 150 किमी परिघातील बांधकाम साहित्यापासून तयार झालेले कार्बन 44% पर्यंत शोषून घेते.

या प्रकल्पाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीसी) ‘गोल्ड’ प्री-सर्टिफाइड केले आहे आणि देखभालीचा अत्यंत कमी खर्च, हा महत्त्वाचा लाभ देणार आहे. हा प्रकल्प दिव्यांगांसाठीही सोयीचा ठरेल, अशा प्रकारे आखला आहे आणि त्यामध्ये संसाधनांनी समृद्ध घटक समाविष्ट आहेत, जसे कॉमन एरियामध्ये सोलार पॉवर लायटिंगस फॉसेट व शॉवर्समध्ये एरिएटर्स; फ्लशिंग, झेरिस्केपिंग यासाठी रीसायकल्ड पाणी, ट्रीटेड ऑरगॅनिक वेस्ट.

या क्षेत्रातील पहिल्या लाँच स्कीममध्ये, प्रकल्प मल्टिप्लायर रिबेट प्लान (एमआरपी) देणार असून त्यामध्ये लाँचसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व ग्राहकांना फायदा मिळणार आहे. घरांसाठी एकूण मागणी वाढत असून, लवकर नोंदणी करणाऱ्यांना अधिक फायदे मिळतील. हॅपिनेस्टमधील सर्व घरांमध्ये प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गतच्या सर्व निकषांचे पालन केले जाते. त्यानुसार, पात्र ग्राहकांना 2.67 लाख रुपयांपर्यंत कर्जाच्या व्याजाचे अनुदान मिळू शकते.

 

महिंद्रा हॅपिनेस्ट डेव्हलपर्स लि.विषयी

महिंद्रा हॅपिनेस्टची निर्मिती उदयोन्मुख मध्यम वर्गाला उल्लेखनीय, कमी दरातील, उच्च गुणवत्तेची घरे उपलब्ध करण्यासाठी करण्यात आली. आम्ही प्रकल्पांची उच्च गुणवत्ता कायम राखून, प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा कालावधी व खर्च यामध्ये कपात करून, घर खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक किफायतशीर केली आहे. उत्कृष्ट डिझाइन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व आधुनिक बांधकाम पद्धती यांचा वापर यामुळे हे शक्य झाले आहे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त जागा मिळावी, या हेतूने महिंद्रा हॅपिनेस्टने घरांमध्ये प्रत्येक चौरस फुटाचा विचारपूर्वक वापर केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...