49 टक्के भारतीयांची कर्ज मिळवण्यासाठी आजही डिजिटल माध्यमांपेक्षा पारंपरिक पद्धतींना पसंती

Date:

पुणे-सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी, त्यांचे व्यवस्थापन पाहाण्यासाठी आणि त्यांचा ऑनलाइन व्यवसाय लाँच करण्यासाठी कार्यरत असलेल्या इन्स्टामोजो या ऑनलाइन व्यासपीठाने भारतीय एमएसएमई परिणाम अहवाल 2019 ची दुसरी आवृत्ती आज लाँच केली. सहा महिने एमएसएमई क्षेत्राचे विस्तृत विश्लेषण करून तयार करण्यात आलेल्या या अहवालात एमएसएमई क्षेत्राशी संबंधित समस्या अधोरेखित करण्यात आल्या असून त्यात एमएसएमई- प्रेन्युअर, या क्षेत्रासमोरील आव्हाने, फिनटेकचे मूल्य आकलन आणि व्यवसायाचे रूप बदलणे यांचा समावेश आहे.

देशाच्या जीडीपीमधील एमएसएमई क्षेत्राचा वाटा सध्या 29 टक्के असून देशभरातील एमएसएमईची संख्या 63.4 दशलक्ष आहे. सरकारने एमएसएमईची व्याख्या त्यांच्या वार्षिक उलाढालीवरून तयार केलेली असली, तरी या अहवालात एमएसएमईची व्याथ्या वस्तू वि. सेवांचे वर्गीकरण, व्यवसाय विभागांचे मेटा वर्गीकरण, गुंतवणूक केलेल्या पायाभूत सुविधांचे प्रकार, औद्योगिक साखळीतील उपक्रमांचे स्वरुप अशा मूलभूत निकषांवरून तयार केलेली आहे.

हा अहवाल एमएसएमई क्षेत्राचा तंत्रज्ञानावर असलेला विश्वासही अधोरेखित करणारा आहे. कामकाजाशी संबंधित महत्त्वाची आव्हाने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होत असल्याचे 75 टक्के एमएसएमईजचे म्हणणे असून इतर 25 टक्के एमएसएमईज यात कुशल मनुष्यबळचा अभाव तसेच तंत्रज्ञानाच्या आकलनाचा अभाव यांचाही समावेश असल्याचे सांगतात. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर अंदाजे 9.2 दशलक्ष एमएसएमईजची जीएसटीअंतर्गत नोंदणी करण्यात आली असून आधीच्या कररचनेच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्क्यांनी जास्त आहे. एमएसएमईद्वारे व्यवसाय विश्लेषण साधनांचा अवलंब केला जाण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांच्यापैकी 47 टक्के जणांनी त्यांची व्यवसाय प्रक्रिया, पेमेंट्स आणि भारतातील ऑनलाइन विक्री यांसाठी डिजिटल साधनांचा अवलंब केलेला आहे. एमएसएमई क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा मोठा असून ते 117 दशलक्ष लोकांना रोजगार पुरवत आहेत. भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, या क्षेत्रापुढे अजूनही मोठे अडथळे आहेत, ज्यात तांत्रिक ज्ञानाचा अभाव किंवा कुशल मनुष्यबळाचा अभाव यांचा समावेश आहे. इन्स्टामोजोमध्ये आम्ही कायमच भारतीय एमएसएमईजना डिजिटल माध्यमांद्वारे सक्षम करून त्यांच्या विकासातील दरी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अहवालाद्वारे आम्ही एमएसएमईजचा आवाज बनून पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामुळे त्यांच्या विकासासाठी आणखी मार्ग खुले होतील, असे इन्स्टामोजोचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संपाद स्वेन म्हणाले.

नोटाबंदीमुळे भारतात डिजिटायझेशनला अतिशय गरजेची असलेली चालना मिळाली असली, तरी रोख पैशांच्या मागणीतली वाढ अजूनही टिकून असून आर्थिक वर्ष 2017- 18 मधील 23.6 ट्रिलियन रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2018- 19 मध्ये 40.27 टक्क्यांनी जास्त म्हणजेच 33 ट्रिलियन रुपये काढले गेले. हा अहवाल असेही स्पष्ट करतो, की बहुतेक एमएसएमईज पेमेंट गेटवे लिंक्सना सर्वाधिक विश्वासार्ह मानतात, तर 44 टक्के जण आजही कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठांपेक्षा पारंपरिक स्त्रोतांना या पसंती देतात.

या अहवालात असेही सुचवण्यात आले आहे, की 35 टक्के एमएसएमईज व्यवहारातील सोपेपणामुळे डिजिटल पेमेंट्सकडे वळाले आहेत, तर 9 टक्के जण डेटा सिंक्रोनायझेशन आणि खासगीपणामुळे त्याकडे वळाले आहेत. ग्राहकांच्या पसंतीमुळे 11 टक्के एमएसएमईज डिजिटल पेमेंट्सकडे वळाले आ हेत.

एक दशलक्ष ग्राहक वर्गासह इन्स्टामोजो सद्य आणि नजदीकच्या भविष्यातील उत्पादन वैशिष्ट्यांमध्ये गुंतवणूक करत आहे. इन्स्टामोजोद्वारे डिजिटल पेमेंट्सपासून लॉजिस्टिक्स आणि कर्जपुरवठ्यापर्यंत विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. या सर्वेक्षणामध्ये इन्स्टामोजोच्या उत्पादनांच्या कामगिरीबद्दल ग्राहकांची मते देण्यात आली असून त्यात पेमेंट लिंक्स हे सर्वाधिक वापरले जाणारे वैशिष्ट्य असून त्यापाठोपाठ पेमेंट गेचवे आणि ऑनलाइन दालनाचा क्रमांक लागतो. आगामी योजनांचा एक भाग म्हणून कंपनीने काही प्रसार सेवा सुरू करण्याचे ठरवले असून त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला स्पर्धात्मक व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर राहाण्यास मदत होईल.

इन्स्टामोजोबद्दल

इन्स्टामोजोबद्दल

इन्स्टामोजो ही सूक्ष्म, मध्यम आणि लहान उद्योगांसाठीची (एमएसएमई) विकाससेवा पुरवणारी प्लॅटफॉर्म कंपनी असून त्याद्वारे त्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन पातळीवर उभारण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सक्षम केले जाते. यामध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वैविध्यपूर्ण गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा व डिझाइनसंदर्भातल्या सर्व सेवा एकाच छताखाली पुरवल्या जातात. 2012 मध्ये संपाद स्वेन, आकाश गेहानी आणि आदित्य सेनगुप्ता यांनी स्थापन केलेल्या इन्स्टामोजोला जपानस्थित एनीपे या कंपनीद्वारे प्री- सीरीज बी फंडिंगही मिळाले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये कंपनीने सीरीज ए फंडिंगमध्ये कलारी कॅपिटल ब्लूम व्हेंचर्स, 500 स्टार्ट अप्स आणि इतरांकडून 2.6 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली होती. त्यापूर्वी कंपनीने 500 स्टार्ट अप्स, ब्लूम व्हेंचर्स आणि एंजल गुंतवणूकदार राजन आनंदन, सुनील कालरा, शैलेश राव, रॉब दे ह्यूज व इतरांकडून ५ लाख डॉलर्स उभारले होते. 2012 मध्ये 500 स्टार्ट अप्स सिलिकॉन व्हॅली अक्सलरेटर प्रोग्रॅममध्ये सहभागी झालेल्या पहिल्या काही स्टार्ट अप्समध्ये इन्स्टामोजोचा समावेश होता. 2015 मध्ये कंपनीचा इकॉनॉमिक टाइम्सद्वारे हॉटेस्ट स्टार्ट अप्समध्ये समावेश झाला होता. इन्स्टामोजो सातत्याने डिजिटल कॉमर्स क्षेत्रात जे जागतिक पातळीवर उपलब्ध आहे त्यामध्ये लक्षणीय संशोधनाची निर्मिती करण्यासाठी आणि एमएसएमईसाठी नव्या संधी व शाश्वत अर्थाजन तयार करण्यासाठी काम करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...