महिंद्राने BSIV स्मॉल कमर्शिअल व्हेइकलवर 80,000 रुपयांपर्यंत सवलत

Date:

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने पिक-अप वाहनांसह स्मॉल कमर्शिअल व्हेइकल्ससाठी (एससीव्ही) आज बचत के अंतिम *60 दिन ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये BS IV कम्प्लायंट SCV मॉडेलवर 20,000 रुपये ते 80,000 रुपये सवलती दिल्या जाणार आहेत आणि ही ऑफर डिसेंबर 31, 2019 पर्यंत सुरू आहे.

कॅम्पेनमध्ये महिंद्राच्या बोलेरो पिक अप, बोलेरो मॅक्सी ट्रक, बोलेरो कॅम्पर, जीतो व अल्फा या BS IV SCV कार्गो व पिक-अप वाहनांचा समावेश आहे. ग्राहकांना आज त्यांचे BS II/ III वाहने बदलून BS IV घेता येऊ शकते. महिंद्रा एससीव्ही रेंजमध्ये इंधनाचे व उपयोगाचे विविध प्रकार समाविष्ट आहेत.

एससीव्ही व पिक-अप वाहने उत्तम सुरक्षा, वैविध्यपूर्ण कामगिरी, आरामदायीपणा व किफायतशीरता ही वैशिष्ट्ये ग्राहकांना देतात. या नव्या कॅम्पेनच्या निमित्ताने, विशिष्ट कालावधीसाठी ही वाहने सर्वात कमी दराने मिळणार आहेत.

मॉडेल्सविषयी:

महिंद्रा बोलेरो पिक-अप

महिंद्रा पिक-अप रेंजचे हे प्रमुख मॉडेल आहे आणि त्याने भार वाहण्याची क्षमता, ताकद, टॉर्क व देखभालीचा खर्च या निकषांच्या बाबतीत ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. या उद्योगातील सर्वाधिक पेलोड या वाहनाचा आहे व वाहनाची क्षमता 1,700 किलो आहे, 2,765mm (9 ft) इतका सर्वात लांब कार्गो डेक आहे आणि 52.2kW (70 BHP) पॉवर आउटपुट आहे आणि यामुळे हे वाहन अतिशय सक्षम झाले आहे. दणकट बाह्यभाग व स्टायलिश अंतर्भाग असणारे हे पिक-अप वाहन उत्पन्न मिळवण्यासाठी आदर्श वाहन आहे. 2WD, 4WD, CBC, व CNG प्रकार अशा निरनिराळ्या प्रकारांमुळे या वाहनाने ग्राहकांना पिक-अप ब्रँडमधून असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत.

महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक प्लस

बोलेरो मॅक्सिट्रक प्लस हे एन्ट्री-लेव्हल पिक-अप वाहन असून, सर्वदूर कनेक्टिविटी उपलब्ध करण्यासाठी ते भारतातील लोड स्टँड ऑपरेटर्स व ट्रेडर्स यांच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे. त्यामध्ये 63 BHP (46.3 kW) पॉवर आउटपुट व 195 Nm हा श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क असणारे चाचणी करण्यात आलेले, शक्तिशाली m2DiCR इंजिन आहे. बोलेरोची स्टाइल पिक-अपच्या उपयुक्ततेशी साजेशी आहे आणि त्यामुळे बोलेरो मॅक्सिट्रक प्लस हे एक आदर्श सिटी पिक-अप वाहन ठरते.

 महिंद्रा बोलेरो कॅम्पर

बोलेरो कॅम्पर हे डबल केबिन पिक-अप वाहन असून त्यास महिंद्रा DI इंजिनाचे बळ आहे आणि हे वाहन 2WD, 4WD, व गोल्ड आवृत्तींमध्ये उपलब्ध आहे. माल वाहतूक व लोकांची वाहतूक अशा दोन्ही कारणांनी वाहनाचावापर करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी हे डबल केबिन पिक-अप मॉडेल आदर्श आहे. बोलेरो कॅम्पर कॅश व्हॅन म्हणून पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये आणि कंत्राटदार व बिल्डर यांच्यामध्ये लोकप्रिय आहे.

महिंद्रा जीतो लोड

जून 2015 मध्ये दाखल झालेले, जीतो लोड हे सब 1 – टोन लोड सेग्मेंट श्रेणीतील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आठ मिनी-ट्रकची मोड्युलर रेंज असलेले, या श्रेणीतील पहिलेवहिले उत्पादन आहे. जीतोचा डिझेलवरता प्रकार S, L व X सीरिजमध्ये उपलब्ध आहे आणि 3-व्हीलर, मायक्रो-ट्रक व मिनी-ट्रक ग्राहकांना सेवा देत आहे. जीतो सीएनजीवरही उपलब्ध आहे.

महिंद्रा अल्फा

महिंद्रा अल्फा ही मजबूत व स्टायलिश बॉडी, आरामदायी राइड व ऐसपैस केबिन, तसेच बिल्ट-इन सुरक्षा व स्थिरता यासाठीची वैशिष्ट्ये यामुळे श्रेणीतील सर्वोत्तम 3-व्हीलर आहे. उत्तम मायलेजव्यतिरिक्त, अल्फाचा देखभाल खर्च या श्रेणीतील सर्वात कमी आहे. हे फायदे आणि महिंद्राने दिलेली वॉरंटी यामुळे 3-व्हीलर ऑपरेटरसाठी मनःशांती व उच्च उत्पन्न मिळण्यास मदत होते. अल्फा प्रवासी वाहने 3 प्रकारांत उपलब्ध आहेत – अल्फा Dx, अल्फा चॅम्प व अल्फा कॉम्फी. हे प्रकार श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी व उच्च उत्पन्न देणारे आहेत.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनुप सोनी क्राइम पेट्रोलमध्ये परतला: 26 हत्यांचे प्रकरण खिळवून ठेवणार

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय क्राइम शो पैकी...

100 हून अधिक CCTV तपासून दोन चोरट्यांनी चोरलेल्या 53 मोटारसायकली जप्त

पुणे-पिंपरी पाेलीस ठाण्याचे हद्दीत मेट्राे स्टेशन व इतर ठिकाणी...

औरंगजेबाची कबर नष्ट करा:एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संसदेत मागणी

नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार...