पश्चिम भारतातील ४४% मातांसाठी रविवार आठवड्यातील इतर दिवसांपेक्षा जास्त तणावपूर्ण

Date:

व्होल्टास बेको सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतीय मातांचा द संडे पॅराडॉक्ससमजून घेण्यासाठी व्होल्टास बेको आणि मॉम्सप्रेसोचे सर्वेक्षण

 मुंबईभारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड व्होल्टास आणि युरोपातील आघाडीची फ्री स्टँडिंग कन्ज्युमर ड्युरेबल्स कंपनी अर्केलिक यांची भागीदारी असलेली व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडने (व्होल्टबेक) आज ‘द संडे पॅराडॉक्स सर्वे’ चे पश्चिम भारतातील निष्कर्ष जाहीर केले.  भारतीय मातांच्या प्राथमिकता आणि वागणुकीबद्दल सखोल माहिती मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये घराघरातील मातांच्या रविवारबद्दलच्या अपेक्षा आणि वास्तव यातील फरक या सर्व्हेमध्ये ठळकपणे दिसून येतो.

व्होल्टास बेकोने मॉम्सप्रेसोच्या सहयोगाने ऑनलाईन केलेल्या ‘द संडे पॅराडॉक्स सर्वे’ मध्ये २५ ते ५५ वर्षे वयोगटातील ए व बी वर्गातील मातांच्या स्वभावाचे विश्लेषण करण्यात आले.  अहमदाबाद, जयपूर आणि मुंबई या शहरांमधील नोकरी करणाऱ्या तसेच गृहिणी असलेल्या मातांना यामध्ये सहभागी करवून घेण्यात आले.

या सर्वेक्षणामध्ये संपूर्ण पश्चिम भारतातील ४४% मातांनी सांगितले आहे की घरातील कामे आणि पुढील आठवड्यासाठीची तयारी यामुळे रविवार त्यांना सर्वात जास्त थकविणारे असतात.  साहजिकच यादिवशी त्यांना स्वतःसाठी खूपच कमी वेळ काढता येतो.  ३१% आई सांगतात की रविवारी त्या सकाळी ५ ते ८ च्या दरम्यान उठतात आणि २७% जणींचा रविवार रात्री ११ ते १२ च्या दरम्यान संपतो.

या वर्षी व्होल्टास बेकोने रेफ्रिजरेटर्सचे ३१ एसकेयूज, फ्रंट लोड वॉशिंग मशिन्सचे ५ एसकेयूज, टॉप लोड वॉशिंग मशिन्सचे १२ एसकेयूज, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्सचे ९ एसकेयूज तसेच डिशवॉशर्सचे ३ व कन्वेक्शन मायक्रोवेव्हचे ९ एसकेयूज बाजारात आणले.  रेफ्रिजरेटर्समधून पोषण आणि खाद्यपदार्थांचे संरक्षण तर वॉशिंग मशीन्समधून सफाईची क्षमता प्रदान करत या ब्रॅण्डने ‘दररोजच्या आनंदातील साथीदार’ ही आपली ब्रँड ओळख बनविली आहे.  व्होल्टास ब्रँड आणि त्यांचे मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्क त्यासोबत अर्केलिकची उत्पादन विकासातील जागतिक पातळीवरील नैपुण्य आघाडी यांना एकत्र आणून आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक नाविन्यपूर्ण उत्पादने देणे हे या ब्रँडचे उद्धिष्ट आहे.

व्होल्टास

व्होल्टास लिमिटेड ही एअर कंडिशनिंग आणि अभियांत्रिकी सुविधा पुरविणारी तसेच प्रोजेक्ट्स स्पेशालिस्ट म्हणून नावाजली जाणारी आघाडीची कंपनी आहे.  भारतात १९५४ साली टाटा समूहामध्ये व्होल्टास लिमिटेडची स्थापना करण्यात आली.  एअर कंडिशनिंग, एअर कूलर्स, वॉटर डिस्पेन्सर्स, वॉटर कूलर्स आणि कमर्शियल रेफ्रिजरेशन उत्पादनांव्यतिरिक्त व्होल्टास लिमिटेड विविध उद्योगक्षेत्रांना अभियांत्रिकी सुविधा पुरविते.  यामध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रोजेक्ट्स, इलेक्ट्रिफिकेशन, टेक्स्टाईल मशिनरी, खाणकाम व बांधकामाची उपकरणे, जल व्यवस्थापन व प्रक्रिया, कोल्ड चेन सुविधा, बांधकाम व्यवस्थापन यंत्रणा व इनडोअर एअर क्वालिटी अशा उद्योगांचा समावेश आहे.  टाटा समूहातील पहिल्या दहा कंपन्यांमध्ये व्होल्टासला गणले जाते.  आज भारतातील एअर कंडिशनिंग बाजारपेठेतील जवळपास २४% हिस्सा व्होल्टासकडे असून या बाजारपेठेची आघाडी व्होल्टासकडे आहे हे निर्विवादपणे खरे आहे. त्यांनी नुकतीच व्होल्टास बेको होम अप्लायन्सेसची श्रेणी बाजारपेठेत दाखल केली आहे.  यामध्ये व्होल्टास आणि टर्कीची अर्केलिक यांची भागीदारी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...