पिरामल फौंडेशन आणि गेट्स फौंडेशन यांनी भारतासाठी ट्रायबल हेल्थ कोलॅबरेटिव्ह निर्माण करण्यासाठी केली भागीदारी

Date:

पिरामल फौंडेशनने भारतासाठी ट्रायबल हेल्थ कोलॅबरेटिव्ह निर्माण करण्याची घोषणा आज केली आहे – या कोलॅबरेटिव्हच्या सुरुवातीच्या भागीदारांमध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनचा समावेश असणार आहे. विविध घटकांचा समावेश असणाऱ्या या कोलॅबरेटिव्हचा भर अॅस्पिरेशनल जिल्ह्यांसह हाय-बर्डन व आदिवासी जिल्ह्यांमध्ये आरोग्य व पोषण यामध्ये सुधारणा करण्यावर असणार आहे. तसेच, 2030 पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (एसडीजी) 3 हे भारत सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने योगदान देणे, हेही कोलॅबरेटिव्हचे उद्दिष्ट आहे. एसडीजी 3 सर्वांसाठी निरोगी जीवन साध्य करण्यावर व सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणार आहे.    

ट्रायबल हेल्थ कोलॅबरेटिव्ह युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज साकारण्यासाठी पाठबळ व प्रयत्न यांची जोड देऊन भारत सरकारबरोबर काम करणार आहे. समाजातील वंचित, विशेषतः आदिवासी समुदायातील वर्गांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च कामगिरी करणारी, शाश्वत आरोग्य व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये मध्य, पूर्व व ईशान्य भारतातील अॅस्पिरेशनल जिल्ह्यांसह असंख्य जिल्ह्यांतील 150 दशलक्षहून अधिक लोकसंख्येचा समावेश केला जाणार आहे.

पिरामल फौंडेशनचे संस्थापक अजय पिरामल यांनी सांगितले, “2030 पर्यंत एसडीजी 3 उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. समाजातील वंचित वर्गांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यावर भर दिल्यास त्याचा दूरगामी व व्यापक परिणाम होऊ शकतो. पिरामल फौंडेशन 25 अॅस्पिरेशनल जिल्ह्यांसहभारतातील अनेक राज्यांतील आदिवासी समुदायांबरोबर काम करत आहे. या समस्येची क्लिष्टता व व्याप्ती विचारात घेता, सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी काम करणाऱ्या बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनसारख्या समविचारी, विशिष्ट मूल्यांवर आधारित संस्थांबरोबर भागीदारी केल्यास या प्रयत्नांना मोठी चालना मिळू शकते. भारतात आरोग्यसेवांचे लोकशाहीकरण करून, सरकार, संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आमच्या प्रस्तावित कोलॅबरेटिव्हद्वारे केला जाणार आहे.”

 

बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी सांगितले,भारताने आरोग्य व पोषण यावर, प्रामुख्याने सर्वात कमकुवत असणाऱ्या वर्गाव भर देण्याचा घेतलेला निर्णय देशासाठी आणि एसडीजी3 साध्य करण्याच्या दृष्टीने जगासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात गरीब व्यक्तींचे आरोग्य व कल्याण यामध्ये वाढ होण्यासाठी सरकारबरोबर यशस्वी भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

सर्वसाधारण लोकसंख्येशी तुलना करता भारतातील आदिवासी लोकसंख्येच्या आरोग्याची स्थिती दयनीय आहे. भारतात माता मृत्यूचा सरासरी दर प्रत्येक 100,000 जन्मांमध्ये 130 मृत्यू असा आहे, तर आदिवासी समुदायामध्ये हा दर प्रत्येक 100,000 जन्मांमध्ये 230 मृत्यू असा आहे. याचप्रमाणे, अर्भक मृत्यू दर, बालकांच्या कुपोषणाचा दर आणि मलेरिया व ट्युबरक्युलॉसिस होण्याचे प्रमाण हे सर्वसाधारण लोकसंख्येच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.

कोलॅबरेटिव्ह दोन मुख्य स्तंभांवर आधारित आहे: सरकारबरोबर काम करणे आणि आदिवासी समुदायासाठी सह-डिझाइन व सह-अंमलबजावणी.

या सुविधेच्या चार प्रमुख कार्यांमध्ये पुढील कार्ये समाविष्ट आहेत:

1.   सरकारी यंत्रणांच्या भागीदारीने सर्व स्तरांवर प्रमुख सार्वजनिक आरोग्य उपक्रम राबवण्यासाठी चालना देणे.

2.   जिल्हा प्रशासनाबरोबर काम करत असताना, सर्व जिल्ह्यांमध्ये ज्ञानाची देवाण-घेवाण वाढीस लावणे.

3.   सुधारित आरोग्यसेवांसाठी जिल्हास्तरीय निधीचा चांगल्या प्रकारे वापर करणे.

4.   उत्तम प्रशासन व जबाबदारी यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, तसेच सर्वांना किफायतशीर व सहज उपलब्ध असणाऱ्या आरोग्यासेवा देण्यासाठी एकात्मिक, लाभार्थी-प्रणित आरोग्यविषयक तंत्रज्ञान सुविधेची निर्मिती करणे.

कोलॅबरेटिव्ह 2020 च्या सुरुवातीला दाखल होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशन, पिरामल फौंडेशन यांचा समावेश असेल, तसेच अन्य भागीदारांचीही घोषणा केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...