सिस्‍कातर्फे घातक जीवाणूंचा नाश करणारा बॅक्‍टीग्‍लो अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल एलईडी बल्‍ब सादर

Date:

मुंबई,सिस्‍का ग्रुप या एफएमईजी विभागातील आघाडीच्‍या आणि एलईडी लायटिंग तंत्रज्ञानाच्‍या अग्रणी कंपनीने सिस्‍का बॅक्‍टीग्‍लो एसएसके-बीएबी-८ वॅट बल्‍ब सादर केला आहे. या बल्‍बमध्‍ये मायक्रोबायल डिसइन्‍फेक्‍शन वैशिष्‍ट्ये आहेत, जी खोलीमध्‍ये असलेल्‍या जीवाणूंचा नाश करतात.असा दावा सिस्‍का ग्रुप  ने केला आहे . बल्‍ब ४०० एनएम ते ४२० एनएमपर्यंतच्‍या तरंगलांबीमध्‍ये प्रकाश उत्‍सर्जित करतो, जे मानवासाठी अत्‍यंत सुरक्षित आहे. सिस्‍का सातत्‍याने आपल्‍या एलईडी लायटिंग विभागांतर्गत नाविन्‍यपूर्ण लायटिंग उत्‍पादनांची व्‍यापक रेंज सादर करत आहे.

सिस्‍का ग्रुप ने दावा करताना असेही म्हटले आहे कि,  सिस्‍का बॅक्‍टीग्‍लो एलईडी बल्‍ब हा घातक जीवाणूंमधून प्रसार होणा-या आजारांपासून संरक्षण करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेला तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत बल्‍ब आहे. हा बल्‍ब वापर होत असलेल्‍या खोलीमध्‍ये कमीत-कमी जीवाणू असण्‍याची खात्री देतो. हा बल्‍ब इनडोअर वापरासाठी तयार करण्‍यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे, घर या ठिकाणी हा बल्‍ब सहजपणे लावता येतो. या बल्‍बमधून घातक अल्‍ट्राव्‍हायलेट किंवा अतिनील किरणे उत्‍सर्जित होत नाहीत.

बॅक्टीग्‍लो बल्‍बच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना सिस्‍का ग्रुपचे संचालक श्री. राजेश उत्‍तमचंदानी म्‍हणाले, ”आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना लाभ देणारी आणि त्‍यांच्‍या जीवनांमध्‍ये मूल्‍याची भर करणारी नाविन्‍यपूर्ण एलईडी लायटिंग सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक रेंज सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिलो आहोत. एलईडी लायटिंगमध्‍ये अग्रस्‍थानी असलेल्‍या आमचा आमच्‍या ग्राहकांना सोईस्‍कर, परवडणारी आणि त्‍यांच्‍या सर्वसमावेशक गरजा व संदर्भांची पूर्तता करणारी उत्‍पादने सादर करण्‍याचा मनसुबा आहे. सिस्‍का बॅक्टीग्‍लो एलईडी बल्‍ब हे या तत्‍त्‍वाचे उत्‍तम उदाहरण आहे. हा बल्‍ब ग्राहकांना नियमित एलईडी बल्‍बच्‍या लाभांच्‍या तुलनेत नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये देतो.”

सिस्‍का बॅक्‍टीग्‍लो २-इन-१ मोड्समध्‍ये येतो, जेथे लायटिंगसह अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल मोड किंवा फक्‍त अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल मोडमधून निवड करता येऊ शकते. या अद्वितीय अॅण्‍टी–बॅक्‍टेरिअल बल्‍बची किंमत २५०/- रूपये आहे आणि देशभरातील प्रमुख रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. या बल्‍बवर १ वर्षाची उत्‍पादन वॉरण्‍टी देखील आहे.

सिस्‍का बॅक्‍टीग्‍लो एलईडी बल्‍बची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

प्रभावीपणे जीवाणूंचा नाश

सिस्‍काचा बॅक्‍टीग्‍लो बल्‍ब ४०० एनएम ते ४२० एनएमपर्यंतच्‍या तरंगलांबीमध्‍ये प्रकाश उत्‍सर्जित करतो, जे मानवासाठी अत्‍यंत सुरक्षित आहे. या बल्‍बमध्‍ये मायक्रोबायल डिसइन्‍फेक्‍शन वैशिष्‍ट्ये आहेत, जी खोलीमध्‍ये असलेल्‍या जीवाणूंचा नाश करतात.

कोणतेच घातक यूव्‍ही/आयआर किरणे नाहीत

सिस्‍काचा बॅक्‍टीग्‍लो बल्‍ब कोणतेही यूव्‍ही/आयआर किरणे उत्‍सर्जित करत नाही, फक्‍त दृश्‍यमान प्रकाश देतो, जो मानवासाठी अत्‍यंत सुरक्षित आहे. हा बल्‍ब फोटो जैविकदृष्‍ट्या सुरक्षित आहे.

२-इन-१ लाइट बल्‍ब

सिस्‍काचा बॅक्‍टीग्‍लो बल्‍ब लोक उपस्थित असताना प्रकाश देण्‍याच्‍या वापरासाठी अत्‍यंत सुरक्षित आहे. हा बल्‍ब दोन मोड्समध्‍ये येतो, लाइटिंगसह अॅण्‍टी–बॅक्‍टेरिअल मोड आणि फक्‍त अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल मोड.

विविध प्रकारच्‍या जीवाणूंचा नाश

सिस्‍काच्‍या बॅक्‍टीग्‍लो बल्‍बने अॅस्परगिलस नायजर, बॅसिलस सेरियस, एशेरिचिया कोळी, स्टेफिलोकोकस ऑरियस, यीस्ट, मोल्ड्स आणि व्‍यापक हानिकारक जंतू व जीवाणूंचा नाश करण्‍याची क्षमता सिद्ध केली आहे.

शक्तिशाली लाइट

सिस्‍काच्‍या ९ वॅट अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल लाइट बल्‍बमध्‍ये ८१०* ल्‍यूमेन्‍स आहेत. ज्‍यामुळे या बल्‍बमधून मोठ्या क्षेत्रापर्यंत उत्‍तम प्रकाश मिळू शकतो.

४ केव्‍हीपर्यंत व्‍होल्‍टेजमधील फ्लक्‍चुएशन्‍सपासून संरक्षण

सिस्‍काचा बॅक्‍टीग्‍लो बल्‍ब आपोआपपणे व्‍होल्‍टेजमधील फ्लक्‍चुएशन्‍सना ओळखतो आणि जोडण्‍यात आलेला विद्युत प्रवाह बंद करतो.

बी-२२ होल्‍डरमध्‍ये रेट्रो फिट

तुम्‍हाला नवीन फिक्‍स्‍चर्स खरेदी करण्‍याची गरज नाही. सिस्‍काचा बॅक्‍टीग्‍लो बल्‍ब नियमित लाइट बल्‍बसाठी वापरत असलेल्‍या सॉकेटमध्‍ये सहजपणे फिट बसू शकतो.

सिस्‍का बाबत –

गुरू नानक मार्केटिंगसह सुरूवात केलेली कंपनी महाराष्‍ट्रासाठी टी-सिरीज ऑडिओ कॅसेट्स, सीडी आणि ऑडिओ व्हिडिओ सिस्टिम्‍सच्‍या वितरण व्‍यवसायामध्‍ये सामील होती. सिस्‍का ग्रुपने फक्‍त एकाच गोष्‍टीकडे लक्ष केंद्रित केले, ते म्‍हणजे विकास. सिस्‍का ग्रुपने विकास करण्‍याचे आणि स्‍थानिक अग्रणी कंपनी बनण्‍याचे काम सुरूच ठेवले आहे. आता त्‍यांचे लक्ष जगभरातील देशांमध्‍ये उपस्थिती वाढवण्‍यावर आहे. प्रबळ दृष्टिकोन व चालनेमधून सक्षम झालेला सिस्‍का ग्रुप एलईडी, पसर्नल केअर अप्‍लायन्‍सेसस, मोबाइल अॅक्‍सेसरीज, होम अप्‍लायन्‍सेस अशा अधिक विभागांमध्‍ये विकसित झाला. सिस्‍का ग्रुप विकसित होण्‍यासह या बाजारपेठांवर प्रभुत्‍व गाजवत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...