महिंद्रा बाहा एसएईइंडिया 2020च्या 13व्या पर्वाची सुरुवात

Date:

282 इंजिनीअरिंग कॉलेजांतील 253 प्रवेशिका अंतिम फेरीसाठी ठरल्या पात्र

पुणे,: एसएईइंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सने महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या सहयोगाने, बाहा एसएईइंडिया सीरिजचे 13वे पर्व सुरू झाल्याचे आज जाहीर केले आहे. ही अंतिम फेरी 23 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत इंदोर जवळील पिठमपूर येथे एनएटीआरआयपी (NATRIP) येथे होणार असून, त्यानंतर 6 ते 8 मार्च 2020 या कालावधीत चंडीगडनजिक चित्कारा विद्यापीठ येथे होणार आहे.

बाहा एसएईइंडिया 2020 साठी देशभरातील 486 एसएईइंडिया कॉलिजिएट क्लबमधील 282 प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या, त्यातील 200 टीम पारंपरिक एम-बाहासाठी आणि 53 टीम व्हर्च्युअल फेरीतील ई-बाहासाठी निवडण्यात आल्या.

बाहा एसएईइंडिया चार दिवसांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांच्या मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सिंगल-सीटर चार-चाकी ऑल-टिरेन व्हेइकलचे (एटीव्ही) डिझाइन, बिल्ड, टेस्ट व वैधता साकार करण्याची कामगिरी दिली होती. या कार्यक्रमामध्ये टेक्निकल सस्पेन्शन, तसेच डिझाइन, कॉस्ट व सेल्स प्रेझेंटेशन असे स्टॅटिक इव्हॅल्युएशन आणि अक्सिलरेशन, स्लेज पुल, मॅनोव्हरेबिलिटी असे डायनॅमिक घटक समाविष्ट असणार आहेत. सस्पेन्शन व ट्रॅक्शननंतर 4 तासांचा कार्यक्रम घेण्यात आला.

बाहा एसएईइंडियाचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक वर्षी नवीन मध्यवर्ती संकल्पना. या वर्षी बाहा 2020 साठी ‘ब्रेकिंग कन्व्हेन्शन्स‘ ही संकल्पना असून, हे ईबाहा असो किंवा सर्व मुलींची टीम असो, पारंपरिक विचारांना आव्हान देणाऱ्या बाहाचे प्रतिक आहे.

आज भारतीय मोबिलिटी उद्योगापुढे काही आव्हाने आहेत. बाहा एसएईइंडियाला देशातील उदयोन्मुख इंजिनीअरसाठी या आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करायचे आहे आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने सज्ज करायचे आहे. त्यांना डिझाइन व अंमलबजावणी यातील पारंपरिक विचारसरणीला व कल्पनांना छेद देता येईल आणि भारतीय वाहतुकीच्या भविष्याला आकार देणारे नावीन्यकार म्हणून स्थान मिळवता येईल.

बाहा एसएईइंडियाने भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी सुरू झाल्याचा लाभ घेण्यासाठी 2015 मध्ये ईबाहा सीरिज सुरू केली. पारंपरिक बाहा वाहने 10 एचपी ब्रिग्स अँड स्ट्रॅटन गॅसोलिन इंजिनावर चालतात. सर्व बाहा टीमसाठी हे सामायिक आहे. तर, ईबाहा वाहने 6 kW पीक इलेक्ट्रिक पॉवर असलेल्या व रिचार्जेबल लिथिअम-आयन बॅटरी पॅकचे पाठबळ असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरवर चालतील. येथे, विद्यार्थ्यांना मोटर, कंट्रोलर व बॅटरी संपादित करण्याची आणि स्वतःची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम डिझाइन करण्याची मुभा आहे. या वर्षी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी मनुष्यबळाची गरज विचारात घेता, या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले आहे.

बाहा एसएईइंडिया 2020 साठी, अंतिम फेरीमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 66 प्रवेशिकांमध्ये पुण्यातील 25 कॉलेजांचा समावेश आहे. बाहा एसएईइंडिया सीरिजच्या गेल्या काही आवृत्तींमध्ये, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवेशिकांमध्ये जास्तीत जास्त प्रवेशिका पुणे शहरातील होत्या. गेल्या काही वर्षांत, अंतिम फेरीमध्ये पुण्यातील कॉलेजांनी जास्तीत जास्त पुरस्कार जिंकले आहेत.

बाहा अंतिम फेरीसाठी देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांतून आलेल्या प्रवेशिकांची तपासणी जुलै 2019 मध्ये पंजाबमधील चित्कारा विद्यापीठ येथे करण्यात आली. त्यामध्ये, प्रवेशिकांनी अंतिम फेरीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या बाहा बग्गी वाहनासाठी त्यांची डिझाइन सादर केली.

पात्र ठरलेल्या टीमची निवड त्यांच्या कॅड डिझाइनचे विश्लेषणाने, सीएई विश्लेषणाने आणि रोल केज, सस्पेन्शन, स्टीअरिंग व ब्रेक यांच्या डिझाइनच्या अनुषंगाने करण्यात आली. तसेच, त्यांचे रूल बुक व्हायव्हा सेशन घेण्यात आले व त्यांना दिलेल्या विषयाच्या बाबतीत मूल्यमापन करण्यात आले. व्हर्च्युअल बाहामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका सहभागींच्या अचूक तपशिलाने तयार केल्या जाऊ शकतील. अंतिम फेरीतील टीमनी बग्गी रेस कार निर्माण केली असेल आणि ते ऑटोमोबाइलबद्दल असणारी त्यांची कौशल्ये, आकलन व पॅशन दर्शवतील.

यानिमित्त बोलताना, बाहा एसएईइंडिया 2020 चे समन्वयक एस. बलराज यांनी सांगितले, “बाहा एसएईइंडियासारखे उपक्रम भविष्यातील डिझाइनर व नेतृत्व घडवण्यासाठी आवश्यक असणारा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यासाठी गरजेचे असलेले व्यासपीठ देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या टीम त्यांच्या सर्वोत्तम क्षमता दर्शवतील, अशी अपेक्षा आहे.”

भारतात, बाहा एसएईइंडियाने (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स) 2007 मध्ये वाटचाल सुरू केली आणि डॉ. पवन गोएंका (एसएईइंडिया अध्यक्ष यांच्या कार्यकालादरम्यान) यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. के. सी. व्होरा यांच्या समन्वयाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. एसएईइंडियाने इतक्या भव्य स्वरूपाच्या उपक्रमाचे आयोजन करायचे ठरवले. एनएटीआरआयपीने इंदूरमधील पिठमपूर येथे असणाऱ्या नॅट्रॅक्स या आगामी मैदानात विशेष झोन उपलब्ध करून मदतीचा हात दिला. याचप्रमाणे, आयआयटी रोपरने रूपनगर येथे बाहा एसएईइंडिया 2018च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्याची तयारी दाखवली.

एसएईइंडियाचा इंजिनीअरिंग एज्युकेशन बोर्ड व बाहा कोअर टीम लवकरच बाहा 3 ची घोषणा करणार आहेत. त्याचे आयोजन दक्षिण भारतातील एखाद्या इंजिनीअरिंग सिटीमध्ये केले जाणार आहे, यामुळे बाहाची वाटचाल भारताच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांच्या निकट जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...