पुण्यात देशातील तनाएराचे सातवे स्टोअर

Date:

पुणे : टायटनचा सर्वात नवीन ब्रँड तनाएराचा भारतीय उपखंडात व्यवसाय विस्तार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली गेली आहे.  आज तनाएराच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचा शुभारंभ करण्यात आला.  पुण्यात औंध येथे पुष्पक पार्क येथे सुरु करण्यात आलेल्या नवीन तनाएरा स्टोअरचे उदघाटन तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती राजेश्वरी श्रीनिवासन व प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  सौंदर्यवती अभिनेत्री श्रुती मराठे यांनी यावेळी परिधान केलेली तनाएरा ब्रॅण्डची जरीचे नाजुक नक्षीकाम असलेली शानदार सिल्क साडी अतिशय खुलून दिसत होती. यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

 

३६०० चौरस फुटांचे हे स्टोअर पुण्यात औंध येथील आयटीआय रोडवर वॉर्ड नंबर ८पुष्पक पार्क येथे आहे.  भारतातील हे तनाएराचे सातवे स्टोअर आहे.  भरपूर सूर्यप्रकाशखेळती हवा असलेल्या तनाएराच्या औंध स्टोअरमधे भिंतींवरील आरशांमधून परावर्तित होणाऱ्या नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे स्टोअरचे रूप अतिशय खुलून दिसते.  अगदी मोक्याच्या जागी असलेल्या या स्टोअरमधे देशभरातील हातमागासाठी प्रसिद्धी असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून उत्तमोत्तमशानदार हाताने विणण्यात आलेल्या साड्या उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.  हातमागावरील साड्या विणण्याची कला आणि अप्रतिम कारिगरीची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे.  या परंपरेला आधुनिक साजामध्ये पुनर्जीवित करणारी आकर्षक कलेक्शन याठिकाणी उपलब्ध आहेत.  बनारसी सिल्कअनोखे नक्षीकाम असणाऱ्या कांजीवरममध्य प्रदेशची खासियत असलेल्या चंदेरी व महेश्वरीबंगालची ओळख म्हणून नावाजली जाणारी जामदानीगुजरातमधून इकत यांच्या बरोबरीने आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यातील अनोख्या कलांचे सौंदर्य ल्यालेल्या शानदार साड्या याठिकाणी आहेत.  भारताचे रेशीम म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या टसर साड्यांचे विशाल कलेक्शन या स्टोअरमधे उपलब्ध आहे.

 तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती राजेश्वरी श्रीनिवासन यांनी सांगितलेदिल्लीबंगलोर व हैदराबाद या शहरांमधील आमच्या स्टोअर्सना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसाद पाहता पुण्यातही आमचा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे.  पुणेकरांनी आमच्या ट्रंक शोला खूप छान प्रतिसाद दिला होता.  म्हणूनच आज महाराष्ट्रातील आमचे पहिले स्टोअर आम्ही पुण्यात सुरु करत आहोत.  भारतातील प्राचीन हातमाग कला आणि कारिगरीहाताने बनविलेलेनैसर्गिक कपडे यांचा सन्मान तनाएरा ब्रँडमध्ये केला जातो.  पुण्यातील आमच्या नवीन स्टोअरमधे भारतातील प्रसिद्ध ठिकाणांहून खास डिझाईन करण्यात आलेल्या उत्तमोत्तम साड्या उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.  आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी विश्वास आणि आदर असलेल्यापरंपरांविषयी प्रेम असलेल्या आणि तरीही प्रगतिशील विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे कलेक्शन नक्की आवडेल.  पुण्यातील आधुनिकचोखंदळ,

 प्रगतिशील स्त्रियांना तनाएरा आपलेसे वाटेल याची आम्हाला खात्री आहे.  सक्ती म्हणून नव्हे तर स्वतःची आवड म्हणून साडी परिधान करणाऱ्यापरंपरा साजऱ्या करणाऱ्या परंतु त्यामध्ये गुरफटून न राहणाऱ्या स्त्रियांसाठी तनाएरा बनले आहे.” 

 भारतातील विविध ठिकाणच्या कारीगरांनी हाताने बनविलेल्या शुद्धनैसर्गिक कापडांपासून डिझाईन करण्यात आलेल्या साड्यांचे तनाएरा स्टोअर हे एक अनोखे ठिकाण आहे.  साड्यालग्नात नवरीसाठीसणसमारंभांना घालण्याचे लेहंगेतयार ब्लाऊज असे विविध प्रकार याठिकाणी आहेत.  साड्यांची शानदारविशाल श्रेणी हे तनाएराचे वैशिष्टय आहेचशिवाय त्यांचे स्टोअर देखील अतिशय अनोखे आहे.  ड्युस्टुडिओचे ऑरोविल स्थित डिझायनर धर्मेश जडेजा यांनी स्टोअर डिझाईन केले आहे.  उच्च अभिरुचीची जाण आणि आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे स्टोअर पाहताक्षणी आवडेल.  भारतातील हातमाग परंपरासंस्कृतीसंकल्पना यांची जादू या संपूर्ण स्टोअरमधे जाणवते.

 फक्त आमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उदघाटन समारंभात मान्यवर उपस्थितांच्या शुभेच्छाकलासौंदर्यसंगीतचविष्ट पदार्थ यामुळे शानदार वातावरण निर्माण झाले होते.

 तनाएरा

फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरु करण्यात आलेला तनाएरा हा टायटन कंपनी लिमिटेडचा सर्वात नवीन ब्रँड आहे.  हाताने विणल्या गेलेल्या साड्यांचा ब्रँड तनाएरामध्ये भारतातील ७० पेक्षा जास्त ठिकाणांहून खास निवडल्या गेलेल्या जवळपास ३००० साड्या आहेत.  त्याठिकाणची प्रत्येक साडी भारतातील अनोख्या कारिगरीचे प्रतीक आहे.  एखादा सण असो किंवा लग्नरोजच्यासाठी बनविण्यात आलेल्या साड्या किंवा खास समारंभासाठीच्या साड्या असोततनाएरामध्ये प्रत्येक प्रकारच्या उत्तमोत्तम साड्यांचे विशाल कलेक्शन आहे.

 टाटा समूहाचा भाग असलेल्या तनाएरा ब्रँडमध्ये अस्सल उत्पादनांची हमीआपल्या पसंतीच्या साड्या निवडण्यासाठी आरामदायी जागाखरेदीचे समाधान आणि आनंद देणारा अनुभव असा परिपूर्ण स्टाईल स्टुडिओ उपलब्ध करवून देण्यात आला आहे.  तनाएरा हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे – तन म्हणजे शरीर आणि इरा हे देवी सरस्वतीचे नाव आहे.  देवी सरस्वती ही कलासंगीतहस्तकला व ज्ञानाची देवी आहे.  ग्रीक भाषेत इरा शब्दाचा अर्थ धरती असा आहे.  अनोखी डिझाइन्सवैविध्यपूर्ण कारिगरीहातमागाचा अस्सलपणाशुद्ध व नैसर्गिक कापड – भारतातील सर्वोत्तम पारंपरिक संपदा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देणारा तनाएरा ब्रँड आहे.  परंपरेविषयी प्रेम असणाऱ्या आणि तरीही प्रगतिशील आचार व विचार असलेल्या आधुनिक भारतीय स्त्रियांना नक्की आवडेल असा हा ब्रँड आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...