गोदरेज लॉक्सने आणली प्रगत डिजिटल कुलूपांची श्रेणी-अॅडव्हांटिस

Date:

मुंबई,: गोदरेज लॉक्स या नवोन्मेषकारी लॉकिंग उपकरणांच्या १२२ वर्षे जुन्या अग्रगण्य उत्पादक कंपनीने ‘अॅडव्हांटिस’ ही क्रांतीकारी लॉकिंग सोल्युशन्स बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. अॅडव्हांटिस ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत डिजिटल लॉक्सच्या श्रेणीमुळे केवळ बोटाच्या टोकांचा वापर करून घर सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. या श्रेणीत चार प्रकारचे लॉक्स आहेत- अॅडव्हांटिस रिव्होल्युशन, अॅडव्हांटिस टेक्नोशुअर, अॅडव्हांटिस रिमट्रोनिक आणि अॅडव्हांटिस क्रिस्टल.

अॅडव्हांटिस लॉक्सची श्रेणी अत्यंत स्टायलिश आहे आणि आधुनिक युगातील सुविधांनी युक्त असलेली ही लॉकिंग सोल्युशन्स वापरण्यास अत्यंत सोपी आहेत. अॅडव्हांटिसच्या लॉक्समध्ये ३६० अंशांतील फिंगरप्रिंट सेन्सर व टच स्क्रीन असल्याने केवळ एका स्पर्शाने दार उघडले जाऊ शकते. ही प्रणाली सर्वोच्च पातळीवरील सुरक्षितता पुरवते, कारण, प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे असतात. अॅडव्हांटिस श्रेणीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासाठी ४-१२ अंकांचे ४ वेगवेगळे पासवर्डस् सेट करता येतात. आपत्कालीन परिस्थितीत हे लॉक यांत्रिक किल्लीने उघडले जाऊ शकते. अॅडव्हांटिस हे उच्च तंत्रज्ञानावर आधारित लॉक असून, ते सर्वांसाठी उपयुक्त आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे याचा वापर सुलभतेने करू शकतात.

गोदरेज लॉक्सचे ईव्हीपी आणि व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी नवीन डिजिटल लॉक्सच्या श्रेणीबद्दल म्हणाले, अॅडव्हांटिस बाजारात आणण्यामागील आमचे व्यापक उद्दिष्ट भारतीयांना श्रेष्ठ दर्जाच्या डिजिटल लॉकिंग सोल्युशन्सनी सुसज्ज करणे हे आहे. सौंदर्यदृष्ट्या आकर्षक व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत अशा ब्रॅण्डेड स्मार्ट लॉक्सची वाढती मागणी पूर्ण करणारी डिजिटल लॉक्स तयार करण्यावर आमचा भर आहे. डिजिटल लॉक्सची मागणी प्रामुख्याने महानगरांतून होते. पण या प्रकारच्या कुलूपांचा वापर आता श्रेणी ३-४ शहरांमधूनही होऊ लागला आहे. ही मागणी पूर्ण करण्यात व घरांसाठी सर्वोच्च पातळीवर सुरक्षितता देऊ करण्यात अॅडव्हांटिस आघाडीवर राहील.”

अॅडव्हांटिसमधील अतिरिक्त सुरक्षितता सुविधा म्हणजे अॅडजस्टेबल स्पायकोड. यात अपरिचितांच्या उपस्थितीत लॉक उघडण्यासाठी पासवर्डच्या पुढे किंवा मागे रॅण्डम आकडे जोडता येतात, जेणेकरून पासवर्डची गुप्तता राखली जावी. बहुवापरकर्त्यांना अॅक्सेस देण्यासाठी कमाल १०० आरएफआयडी स्मार्ट कार्डची नोंदणी अॅडव्हांटिसकडे केली जाऊ शकते. सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फायर सेन्सर. यामुळे घरात आग लागल्यास आपोआप दार उघडते; अशा परिस्थितीत अनेकदा बाहेरून दार उघडून मदत करण्याची गरज भासत असल्यामुळे आपोआप दार उघडले गेल्यास काही मौल्यवान मिनिटे वाचू शकतात.

अॅडव्हांटिस रिव्होल्युशन या लॉकमध्ये स्मार्ट लॉकची काही अतिप्रगत वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, बायोमेट्रिक तंत्रज्ञान- कमाल सुरक्षिततेसाठी ३६० अंश फिंगरप्रिंट नोंदणी; आरएफआयडी अॅक्सेस; यांत्रिक किल्ली वगळता अन्य कोणत्याही साधनाने दरवाजा बाहेरून उघडला जाणार नाही असे प्रायव्हसी फंक्शन; बॅटरी संपत आल्याची सूचना; लॉकची मोडतोड झाल्यास त्याबद्दल सूचना; अॅडजस्टेबल स्पाय कोड आणि यांसारख्या अनेक अतिप्रगत सुविधा. या प्रगत लॉकिंग प्रणालीची किंमत ४३,००० रुपये आहे.

  • अॅडव्हांटिस टेक्नोशुअरमध्ये कमाल सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या अनेक सुविधा आहेत. उदाहरणार्थ, मॅन्युअल पासवर्ड प्रोटेक्शन (पासवर्ड अधिक बळकट करण्यासाठी ४ ते १२ अंक वापरण्याची सोय व बहुवापरकर्त्यांना अॅक्सेस देण्याचा पर्याय); आरएफआयडी अॅक्सेस (१०० कार्डांपर्यंत नोंदणी केली जाऊ शकते); अॅडजस्टेबल स्पाय कोड, ऑटोलॉकिंग सुविधा; बॅटरी संपत आल्याची सूचना; धूर व आगीसाठी डिटेक्टर; मल्टिटच फंक्शन: या पर्यायामध्ये वापरकर्त्याने टाइप केल्यानंतर ३ रॅण्डम अंक येतात, जेणेकरून, स्क्रीनवरील बोटांचे ठसे ओळखू येऊ नयेत. अॅडव्हांटिस टेक्नोशुअरची किंमत ३८,००० रुपये आहे.

अॅडव्हांटिस रिमट्रोनिक निवासी किंवा व्यावसायिक संकुलांमधी लाकडी तसेच धातूच्या दारांसाठी (मुख्य दरवाजे/इंटरकनेक्टिंग दरवाजे) अनुकूल आहेत. रिमट्रॉनिकमध्ये ३६० अंश फिंगरप्रिंट अॅक्सेस आहे आणि कमाल १०० बोटांचे ठसे यात नोंदवून ठेवता येतात. हे डिजिटल लॉक ६ वेगवेगळे पासवर्ड नोंदवू शकते (१ मालक, ४ वापरकर्ते आणि १ ओटीपी). अन्य सुविधांमध्ये आरएफआयडी कार्डस्, ऑटो लॉकिंग मोड, बॅटरी संपत आल्याची सूचना, मोडतोड झाल्यास इशारा देणारी प्रणाली आणि फायर सेन्सर यांचा समावेश होतो. वापर सुलभ व्हावा म्हणून रिमोट्रोनिक रिमोट तसेच व्हिडिओ डोअर फोनशी अनुकूल ठेवण्यात आले आहे. अॅडव्हांटिस रिमोट्रोनिक २५,००० रुपये किंमतीला उपलब्ध आहे.

अॅडव्हांटिस क्रिस्टल काचेचे दरवाजे लॉक करण्याची सुविधा वापरकर्त्याला देऊन भविष्यकाळासाठी सुसज्ज अशा लॉकिंग सोल्युशन्सकडे जाणारे आहे. प्रगत सुरक्षितता सोयींसह अॅडव्हांटिस क्रिस्टल ग्लास डोअरचा यूएसपी म्हणजे हे लॉक बसवण्यासाठी काच कापावी किंवा ड्रिल करावी लागत नाही. त्यामुळे हे लॉक बसवण्यास अत्यंत सोपे आहे व काचेच्या दरवाजाचे सौंदर्य यामुळे कायम राखले जाते. यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: ासवर्ड बळकट करण्यासाठी त्यात ४१२ आकडे वापरण्याची सोय देणारा अॅक्सेस मोड, वापरण्यातील सुलभतेसाठी रिमोट तसेच व्हिडिओ डोअर फोनशी अनुकूल, फायर सेन्सर, मोडतोड झाल्याचा इशारा देणारी यंत्रणा. अॅडव्हांटिस क्रिस्ट्लची किंमत २५,००० रुपये आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...