मुंबई, ११ ऑगस्ट, २०१९: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांच्या पंक्तीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बँक ऑफ बडोदाने नवीन गृह कर्ज योजना सादर केली आहे. बँक ऑफ बडोदाची ही नवीन गृह कर्ज योजना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटला लिंक्ड आहे. नवीन गृह कर्ज योजनेमध्ये व्याज दर हे बाह्य मापदंडाला लिंक्ड असतील, याठिकाणी बाह्य मापदंड रेपो रेट आहे. अशाप्रकारची थेट लिंक असल्यामुळे आर्थिक धोरणानुसार दरांमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांचे थेट लाभ निष्पक्ष व पारदर्शी पद्धतीने ग्राहकांना मिळू शकतील.या नवीन प्रकारच्या योजनेमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना बँकेच्या फंड्सच्या किमतीनुसार इंडेक्स करण्यात येणाऱ्या एमसीएलआर लिंक्ड दर आणि बाह्य मापदंडाला लिंक्ड असलेला रेपो रेट यापैकी आपल्याला हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.सध्या गृह कर्जाचा एमसीएलआर लिंक्ड दर हा ८.४५% पासून सुरु होत असून, एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आल्यानंतर ७ ऑगस्टपासून तो लागू करण्यात आला आहे.नवीन गृह कर्ज योजना प्रकारामध्ये रेपो रेट लिंक्ड व्याज दर देखील उपलब्ध असेल जो ८.३५% पासून सुरु होतो. अशाप्रकारे सध्या यामध्ये एमसीएलआर दरानुसार असलेल्या किमतीच्या तुलनेत १० बेसिस पॉइंट्सचे लाभ मिळू शकतात.भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो अर्थात व्याज दरांमध्ये ३५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरबीआयचा सध्याचा रेपो रेट गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी म्हणजे ५.४०% आहे.
बँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना
Date:

