होंडा टुव्हीलर्स इंडिया आणि शेल ल्युब्रिकंट्सतर्फे इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच

Date:

 दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. आणि शेल ल्युब्रिकंट्स, फिनिश्ड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील आघाडीची कंपनीने इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच करण्यासाठी धोरणात्मक भागिदारी केली आहे. होंडा टुव्हीलर्स आणि शेल ल्युब्रिकंट्स यांची ही भागिदारी भारतीय बाजारपेठेतील दुचाकी तेल विभागातील पहिली भागिदारी आहे.

वाहन चालकांना दररोज रस्त्यांवर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या प्रवासाची सुरुवात या भागिदारीद्वारे करण्यात आली आहे. नवी श्रेणी शेलचे तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि होंडाचे आधुनिक वाहन ब्लूप्रिंट यांच्या मिश्रणातून खास तयार करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये सुधारित पिक अप आणि अक्सलरेशन, अधिक चांगली इंधन कार्यक्षमता, उच्च तापमानाला इंजिन संरक्षण, सफाईदारपणे गियर बदलणे, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सहजपणे गाडी चालवण्याची क्षमता असे नवे फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत.

या भागिदारीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ग्राहक सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रदीप कुमार पांडे म्हणाले, होंडामध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा पुरवल्या आहेत. ग्राहकांना अशाच प्रकारे मूल्यवर्धित उत्पादने देण्यासाठी होंडाने शेल ल्युब्रिकंट्स इंडियाशी भागिदारी केली असून त्याद्वारे वाहन चालवण्याचा जास्त चांगला अनुभव ग्राहकांना दिला जाणार आहे. भारतीय दुचाकी उद्योगात नवे मापदंड तयार करण्यासाठी भविष्यात ही भागिदारी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शेल ल्युब्रिकंट्सचे देश प्रमुख मानसी त्रिपाठी म्हणाले, आमच्या ओईएम भागिदारांबरोबर दीर्घकालीन भागिदारीसाठी गुंतवणूक करणे आणि त्यातून नवनिर्मिती करणे ही कायमच शेलची प्रमुख बांधिलकी राहिली आहे. होंडाबरोबर भागिदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि भारतीय बाजारपेठेत वाहनविषयक नाविन्य व नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ही भागिदारी ग्राहकाला नव्या सुविधा देऊन देशातील वाहतूक व्यवसायाच्या भविष्याला चालना देण्याचे आमचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

 

होंडा दुचाकींसाठी ल्युब्रिकंट्सची नवी श्रेणी 0.8 लीटर, 0.9 लीटर आणि 1 लीटर पॅकमध्ये उपलब्ध केली जाईल.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) – होंडा मोटर कंपनीची 100 टक्के उपकंपनीने, जपान (जगातील पहिल्या क्रमांकाची दुचाकी कंपनी) मे 2001 मध्ये भारतीय दुचाकी कामकाजाची सुरुवात केली. आज 19 व्या वर्षात असलेल्या होंडा टुव्हीलर्स इंडियाने आतापर्यंत भारतातील 43 दशलक्ष ग्राहकांना आनंदित केले असून कंपनीची चार कारखान्यांची एकत्रित उत्पादनक्षमता वार्षिक पातळीवर 6.4 दशलक्ष आहे. होंडा दुचाकीच्या विस्तृत श्रेणीमध्ये सहा स्कुटर्स (अक्टिव्हा 5जी, अक्टिव्हा 125, अक्टिव्हा आय, एव्हिएटर, डिओ आणि ग्राझिया), 9 मोटरसायकल्स (सीडी 110 ड्रीम, ड्रीम युगा, लिवो, सीबी शाइन, सीबी शाइन एसपी, सीबी युनिकॉर्न, सीबी हॉर्नेट 160आर, एक्स- ब्लेड आणि सीबीआर 250आर) आणि देशांतर्गत श्रेणीमध्ये 6 फन बाइक्स (सीबी300आर, सीबीआर650आर, आफ्रिका ट्विन, सीबी1000आर, सीबीआर1000आरआर आणि गोल्ड विंग) यांचा समावेश आहे.

 शेलबद्दल
शेल ही 8500 कर्मचारी असलेली भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय उर्जा कंपनी अपस्ट्रीम, डाउनस्ट्रीम, इंटिग्रेडेट गॅस, अक्षय उर्जा आणि आर अँड डी, डिजिटायझेशन व व्यावसायिक कामकाजामध्ये सखोल क्षमता बाळगून आहे. कंपनी कर्नाटक, तमिळ नाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या सहा राज्यांत रिटेल पातळीवर कार्यरत असून सद्या ती देशभरातील फ्युएल स्टेशन्सचे आपले नेटवर्क विस्तारण्याचे काम करत आहे.

कंपनीची भारतात ल्युब्रिकंट्सची संपूर्ण मूल्य साखळी असून त्यात संकल्पनेपासून विकासापर्यंत आणि उत्पादनापासून वितरणापर्यंतच्या सर्व टप्प्यांचा समावेश आहे. त्याशिवाय यात 115 दशलक्षपेक्षा जास्त लीटर्सची क्षमता असलेल्या जागतिक दर्जाच्या ल्युब्रिकंट ऑइल ब्लेंडिंग कारखान्याचा आणि 185 पेक्षा जास्त मोठे वितरण नेटवर्क व 60 हजार रिटेलर्सचा समावेश आहे. कंपनी हाजिरा येथे स्वतःचे एलएनजी रि- गॅसिफिकेशन टर्मिनल चालवते. बीजी एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन इंडिया लिमिटेड या उपकंपनीद्वारे शेल पन्ना- मुक्ता तेल आणि वायू क्षेत्रातील 30 टक्के हिश्श्यासह संयुक्त चालक आहे. डिजिटायझेशन आणि भविष्यासाठी तयार, शाश्वत उपाययोजनांच्या मदतीने कंपनी भारतातील इकोसिस्टीमचा विकास करत असून त्याच्या जोडीला स्टार्ट अप्ससाठी शेल ई4, शेल इको मॅरेथॉन आणि हस्क पॉवर व क्लीनटेक सोलर अशा नव्या, उर्जा कंपन्यांसह उर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देत आहे. त्याशिवाय शेल समाजासाठी सकारात्मक योगदान देत असून त्यादृष्टीने एनएक्सप्लोरर्स, अक्सेस टु एनर्जी आणि रस्ते सुरक्षा इत्यादी उपक्रम भारतात राबवत आहे.

फॉलो @shell_India @makethefuture @shell_ecomar आणि जाणून घ्या कशाप्रकारे कंपनी उर्जा क्षेत्रातील समीकरणे बदलत आहे.

रॉयल डच शेल पीएलसी

रॉयल डच शेल पीएलसी ही इंग्लंड आणि वेल्समध्ये स्थापन झालेली कंपनी असून द हॉग येथे तिचे मुख्यालय आहे. कंपनीची लंडन, अमस्टरडॅम आणि न्यू यॉर्क एक्सचेंजवर नोंदणी झालेली आहे. शेल कंपन्यांचे 70 पेक्षा जास्त देशांत आणि प्रदेशांत कामकाज सुरू असून कंपनी तेल आणि वायू उत्खनन व निर्मिती, द्रवीकरण केलेला नैसर्गिक वायू आणि वायू ते द्रव निर्मिती व विपणन, तेल उत्पादने, रसायने, अक्षय उर्जा उत्पादनांचे विपणन आणि शिपिंग या व्यवसायांत कार्यरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...