भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पसंतीच्या कल्याण ज्वेलर्सने चार स्तरीय हमी उपक्रम सुरू केला असून त्याद्वारे आपल्या निष्ठावान ग्राहकांना ब्रँडप्रती दाखवलेल्या बांधिलकीसाठी सर्वोत्तम भेट देण्याचा उद्देश आहे. ब्रँडशी जोडला गेलेला विश्वासाचा वारसा कायम राखत कल्याण ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना चार स्तरीय हमी प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे दागिने विविध प्रकारच्या शुद्धता चाचण्यांमधून गेलेले असतात आणि त्यावर बीआयएस हॉलमार्कही दिलेला असला, तरी चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना बदली किंवा पुनर्विक्रीदरम्यान शुद्धतेच्या मुल्यावरून पैसे देण्याची खात्री त्यावर नमूद केलेली असते. कल्याण ज्वेलर्सला ग्राहकांच्या भावनांची जाणीव आहे आणि म्हणूनच कंपनीच्या देशभरातील कोणत्याही दालनात खरेदी केलेल्या दागिन्यांवर आयुष्यभरासाठी मोफत देखभाल करून दिली जाणार आहे.
हा ब्रँड न्याय्य आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतींसाठी ओळखला जाणारा असून चार स्तरीय हमी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या उत्पादनाच्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की ग्राहकांना सोन्याचे मूल्य त्याच्या एकूण वापरानुसार लावण्यात आले असून उत्पादनाच्या एकूण वजनातून लाख, मौल्यवान खडे, काच, लाकूड, अनॅमल इत्यादी घटकांचे वजन वजा करण्यात आले आहे. त्याशिवाय कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या बदली आणि पुनर्विक्रीवरही चांगले मूल्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
या उपक्रमाविषयी श्री. टी. एस. कल्याणारामन, अध्यक्ष आणि व्यवस्थाकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले, ‘एका दालनापासून जागतिक पातळीच्या ब्रँडपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा झालेला अभूतपूर्व प्रवास हा आमच्या मूलभत विश्वास आणि पारदर्शकतेचा पाया आहे. 26 वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासूनच कल्याण ज्वेलर्सने असामान्य डिझाइन्स, खात्रीशीर दर्जा, योग्य किंमत आणि सर्व ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देणारा ब्रँड अशी आपली अभिनव ओळख तयार केली आहे. फार कमी जणांना माहीत आहे, की या ब्रँडने बीआयएस हॉलमार्किंग, दरांच्या टॅग्जची सुरुवात, हिरे व इतर जेमस्टोन दागिन्यांसाठी आयजीए प्रमाणपत्र अशा कित्येक गोष्टींची सुरुवात केली असून आज हे सर्व या क्षेत्रातील प्रचलित नियम बनले आहेत. सोन्याच्या दागिन्यांवरील हे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांप्रती आम्हाला वाटणारी बांधिलकी अधोरेखित करणारे आहे.’
हे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील सर्व दालनांमध्ये 1 ऑगस्ट 2019 पासून लागू होणार आहे. सध्याचे ग्राहकही कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही दालनात जाऊन आपल्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन करून घेत चार स्तरीय हमीचा शिक्का मिळवू शकतात. यापूर्वी कल्याण ज्वेलर्समध्ये हिरे आणि जेमस्टोन्सच्या दागिन्यांसाठी अशाप्रकारचे प्रमाणपत्र राबवण्यात आले आहे. या चार स्तरीय हमी प्रमाणपत्राविषयी कल्याण ज्वेलर्स मीडिया अभियानही राबवत आहे.
ग्राहक समाधानाला कल्याण ज्वेलर्सचे प्रथम प्राधान्य असून ग्राहकांना सोने, हिरे व जेमस्टोन्समधील पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी प्रत्येक ग्राहकाच्या विविध गरजा पूर्ण करणारी आहे.