भारतात दरवर्षी सरासरी 2.7 कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे निदान-डॉ. मनीष बँकर

Date:

भारतात दरवर्षी सरासरी 2.7 कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे निदान होते. ग्रामीण तसेच शहरी लोकसंख्येमद्ये या प्रचलित झालेल्या आरोग्य समस्येमागे बदलती जीवनशैली आणि वाढता तणाव ही प्रमुख कारणे आहेत. अशा जोडप्यांपैकी 10 – 15 टक्के वंध्य जोडपी सक्रियपणे उपचार घेत असून त्यापैकी केवळ एक टक्के जोडपी आयव्हीएफ उपचार घेत आहेत. मात्र, कित्येक जोडप्यांना वंध्यत्वामागची कारणे माहीत नाही तसेच बहुतांश जण यामागे स्त्रीकेंद्रित घटक कारणीभूत असल्याचे मानतात.

25 जुलै 1978 या दिवशी जगातील पहिले आयव्हीएफ बाळ – लुईस ब्राउनचा जन्म झाल्यामुळे हा दिवस जागतिक आयव्हीएफ दिन म्हणून साजरा केला जातो. लुईस ब्राउनच्या जन्मापासून आजपर्यंत गेल्या 41 वर्षांत आयव्हीएफचे मूलभूत तत्व बदललेले नाही, मात्र वेगाने बदलते विज्ञान आणि नवे वास्तव, नवी तंत्रे व पद्धतींच्या मदतीने असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी- एआरटी क्षेत्राचे रूप आमूलाग्र बदलले आहे. यातील प्रत्येक घटकामुळे ही प्रक्रिया सुधारत 100 टक्के यशस्वी दर गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

देशातील आयव्हीएफ क्षेत्राच्या वाढत्या स्वरुपाविषयी नोवा आयव्हीआय फर्टिलिटीचे वैद्यकीय संचालक डॉ. मनीष बँकर म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आजकालच्या जोडप्यांकडे वंध्यत्वाचा सामना करण्यासाठी काही आधुनिक तंत्रांचा आधार आहे. मात्र, मात करण्यास त्याहीपेक्षा अवघड असलेली समस्या म्हणजे, वंध्यत्वासाठी स्त्री जोडीदार जबाबदार असल्याचे मानणे. आयव्हीएफचा आधार घेणाऱ्या बहुसंख्य जोडप्यांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नसल्यास त्यामागे पुरुष व स्त्री असे दोन्ही घटक कारणीभूत असल्याचे माहीत नसणे धक्कादायक आहे. वंध्यत्व ही लिंगविशेष समस्या असल्याचे आजही मानले जाते. किंबहुना कित्येक उदाहरणांमध्ये पुरुष जोडीदार याबाबत बोलण्यास किंवा वंध्यत्वाची चाचणी करण्यास तयार नसतात. पुरुष जोडीदार वंध्यत्वास कारणीभूत असू शकतो असे मानले जात नाही याचे हे स्पष्ट निदर्शक आहे.

जोडप्यांमध्ये असलेल्या वंध्यत्वात स्त्री व पुरुष घटकांचा अनुक्रमे 40- 50 टक्के वाटा असतो. त्यामुळे वंध्यत्वाशी झगडत असलेल्या जोडप्यांनी दोन्ही जोडीदारांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला हवा. डॉ. बँकर म्हणाले, आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या जोडप्यांमद्ये जागरूकता निर्माण करताना रूग्णाचे समुपदेशन अतिशय महत्त्वाचे ठरते. उपचार पर्यायांची माहिती असो किंवा छुप्या परिस्थितीमागची कारणे असो, रूग्णाला संपूर्ण माहिती देणे ही प्रत्येक आयव्हीएफ सल्लागाराची जबाबदारी आहे. समुपदेशनामुळे सकारात्मक भावनिक दृष्टीकोन राखणे शक्य होते, जो परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता उपचाराच्या एकंदर प्रक्रियेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो.

प्रसूतीतज्ज्ञ स्त्रियांच्या प्रजननक्षम समस्या हाताळतात, तर सर्वसमावेशक इनफर्टिलीटी केयर युनिट्स ही पुरुषांच्या मदतीसाठी योग्य असतात. पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे पिढीजात किंवा संसर्गामुळे झालेली, टेस्टीक्युलर किंवा पेल्विक दुखापतीमुळे अथवा गंभीर वैद्यकीय परिस्थितीतून तयार झालेली असतात. यावर गोळ्यांपासून आययूआय (थेट गर्भाशयामध्ये स्पर्म्स इंजेक्ट करणे) आणि आयव्हीएफ- आयसीएसआय असे उपचार पर्याय उपलब्ध असून ते परिस्थितीचे गांभीर्य आणि कारणावर अवलंबून असतात. किंबहुना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आजच्या जोडप्यांना विविध प्रकारच्या आधुनिक एआरटी (असिस्टेड रिप्रॉक्टिव्ह टेक्नॉलॉजी) तंत्रांतून निवड करता येते, जी आयव्हीएफचा यशस्वी दर लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी ओळखले जातात.

त्याव्यतिरिक्त क्रायोप्रिझर्व्हेशनमधील सुधारणांमुळे आज स्त्रियांना जीवनशैलीविषयक आणि वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा लांबवता येते. यामध्ये कमी वयात अंडी काढून फ्रीज केली जातात, कारण ती त्याच स्त्रीच्या नंतरच्या वयातील अंड्यांपेक्षा जास्त निरोगी असतात. योग्य पद्धतीने क्रायोप्रिझर्व्ह केलेली अंडी सामान्य तापमानाला आणून त्यानंतरच्या चक्रात वापरता येऊ शकतात. फ्रीज केलेल्या/सामान्य तापमानाच्या अंड्यांचा आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर ताज्या अंड्यांइतकाच असतो.

जास्तीत जास्त जोडपी वंध्यत्वाचा सामना करण्यासाठी पुढे येऊन उपचार घेत असताना एआरटी आयव्हीएफ आणि आरोग्यसेवा क्षेत्राचे भारतातील चित्र आमूलाग्र बदलण्यासाठी सज्ज झाले आहे.

नोवा आयव्हीआय फर्टिलिटीबद्दल-

नोवा आयव्हीआय फर्टिलीटी (एनआयएफ) ही वंध्यत्व क्षेत्रातील सर्वात मोठी सेवा पुरवठादार कंपनी आहे. स्पेनच्या आयव्हीआयबरोबर भागिदारीमध्ये अत्याधुनिक असिस्टेड रिप्रॉक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) भारतात आणण्याचे एनआयएफचे ध्येय आहे. या भागिदारीमुळे नोवाच्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेयर, प्रशिक्षण आणि दर्जा व्यवस्थापनासह आयव्हीएफ सेवा आणि तंत्रज्ञानाला लक्षणीय जोड मिळाली आहे. आयव्हीआयचे कौशल्य आणि प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभवासह एनआयएफने भारतात त्याच असामान्य दर्जाच्या प्रक्रिया, शिष्टाचार व धोरणे आणली आहेत.

 आययूआय, आयव्हीएफ आणि अँड्रॉलॉजी सेवा पुरवण्याबरोबरच एनआयएफद्वारे एम्ब्रियोज आणि अंडी जतन करण्यासाठी व्हिट्रिफिकेशन, एम्ब्रियो स्वीकारण्यासाठी गर्भाशयाच्या क्षमतेची वेळ शोधून काढण्यासाठी ईआरए, जनुकीयदृष्ट्या सुस्थित असलेले एम्ब्रियोजचे स्थलांतर करण्यासाठी पीजीएस आणि पीजीडी आधुनिक तंत्रज्ञान पुरवले जाते. आयव्हीएफ- आयसीएसआयसह सर्व प्रक्रिया गर्भधारणेच्या शक्यतांमध्ये लक्षणीय सुधारणा करतात. यापूर्वी काहीवेळेस अपयशी झालेल्या जोडप्यांमध्येही चांगले परिणाम दिसून आले आहेत. एनआयएफ सध्या भारतात 20 फर्टिलीटी केंद्रे चालवत असून त्यात अहमदाबाद (2), बेंगळुरू (3), चेन्नई (3), कोईम्बतूर, हिसार, हैद्राबाद, इंदौर, जालंधर, कोलकाता, लखनौ, मुंबई (2), नवी दिल्ली (2), पुणे, सुरत आणि विजयवाडा यांचा समावेश आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...