बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल -कल्याण ज्वेलर्स

Date:

आम्ही या अर्थसंकल्पाकडे सकारात्मकपणे पाहात आहेत, कारण त्यात जाहीर करण्यात आलेली विविध प्रकारची धोरणे सरकार ग्राहकांना वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या सवलतींच्या मदतीने या क्षेत्राच्या विकासासाठी पाया रचण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्प 2019 मध्ये भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दमदार मार्ग तयार व्हावा यासाठी पाया रचण्यात आला आहे.

आधार आणि पॅन कार्ड या दोन्हींच्या समान वैधतेमुळे ग्राहकांना दागिन्यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना लक्षणीय मदत होणार आहे.

मूलभूत सुविधांसाठी प्रस्तावित 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लक्षात घेता आम्ही पायाभूत सुविधा क्षेत्राचे भविष्य उज्जवल असल्याचे व त्याचा आम्हाला फायदा होणार असल्याचे गृहीत धरत आहोत, कारण त्यामुळे पर्यायाने ग्राहकांकडे खर्चासाठी जास्त रक्कम राहील आणि अशावेळेस मौल्यवान रत्ने व दागिने उद्योग क्षेत्रातील नफ्यासह परताव्यांचा आकर्षक गुंतवणूक पर्याय त्यांच्यापुढे असेल.

त्याशिवाय बजेटमध्ये एनआरआय आणि एफपीआय (परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) यांचे एकत्रीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे भारतातील एनआरआय फंडिंग वाढून अर्थव्यवस्थेत भांडवलाचा नवा ओध सुरू होईल. ही चांगले दिवस येणार असल्याची नांदी आहे.

मात्र, आयात केल्या जाणाऱ्या सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर गेल्यामुळे सोने खरेदीच्या लघुकालीन भावनेवर परिणाम होईल आणि त्यामुळे बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल.

एकंदरीतच अर्थसंकल्पातील धोरणे प्रामुख्याने सरकारच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया आणि भारतात व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करणे यांसारख्या योजनांकडे झुकणारी आहेत.

–          श्री. टी एस कल्याणारामन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात एका दिवसात 254 मृत्यूइराणने म्हटले- युद्धविराम आणि युद्ध एकत्र नाही चालू शकत

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात २५४ जण ठार...

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबईभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी...

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...