Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड समभाग विक्रीला सुरुवात

Date:

पुणे: आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडने (the “कंपनी” or the “इश्यूअर”) प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 77,249,508  पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची गुरुवार, मार्च 22, 2018 रोजीपासून शेअर प्रीमिअमसह रोख पद्धतीने प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले (“ऑफर”) असून त्यामध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेडतर्फे 77,249,508 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) समावेश आहे आणि त्यापैकी 3,862,475 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांना शेअर प्रीमिअमसह रोख रकमेला खरेदी करण्यासाठी राखीव असतील (“आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी रिझर्व्हेशन पोर्शन”). ऑफरमध्ये विक्रीनंतरच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलाचा समावेश 23.98% असेल व नेट ऑफरचा समावेश (“आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी रिझर्व्हेशन पोर्शन” वगळता ऑफर) 22.78% असेल.

ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 519 रुपये ते 520 रुपये निश्चित केला आहे. किमान बोलीचे प्रमाण 28 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 28 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.

ऑफर कालावधी सोमवार, 26 मार्च 2018 रोजी बंद होणार आहे. लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2009 (म्हणजेच “सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) नुसार अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टरसाठी बिड/इश्यू कालावधी बिड/इश्यू सुरू होण्याच्या तारखेपूर्वी एक कामाचा दिवस अगोदर, म्हणजे 21 मार्च 2018 रोजी असेल.

इक्विटी शेअर्सची विक्री 13 मार्च 2018 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (“आरएचपी”) केली जाणार आहे व इक्विटी शेअर्स बीएसई व एनएसई येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत.

डीएसपी मेरिल लिंच लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एडलविस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड व एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयसीआसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम” किंवा “लीड मॅनेजर्स”) आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड बीआरएलएम – मार्केटिंग म्हणून जबाबदारी पार पाडेल.

*प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स बीआरएलएमच्या सल्ल्याने क्यूआयबीपैकी 60% पर्यंत भाग कदाचित अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसनुसार अँकर इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवतील (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). त्यापैकी एक-तृतियांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार राखले जातील. नेट क्यूआयबीच्या (अँकर इन्व्हेस्टर वगळता) 5% चे प्रतिनिधित्व करणारे इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील, व उर्वरित नेट क्यूआयबी भाग विशिष्ट प्रमाणात क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 10% शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व गुंतवणूकदारांना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता येणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...