पुण्यामध्ये पहिल्या पॉप-अप ‘कनेक्शन्स’ चे आयोजन

Date:

आघाडीचे आर्किटेक्ट्स कल्पक शाह, निशिता कामदार, रिचा बहल, सारा शाम व माधव रमण यांनी घराच्या सजावटीपासून तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर माहितीपूर्ण विचार मांडले

 पुणे:  नाविन्यपूर्ण पद्धतीने सजवण्यात येणाऱ्या जागा व त्यामागील कल्पक व सर्जनशील व्यक्ती यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्कोया विशेष एकदिवसीय कार्यक्रमात आघाडीचे आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स व घरगुती सजावटीत तज्ञ असे अनेक नामवंत आवर्जून उपस्थित होते.  पुण्यातील केशवनगर येथील गोदरेज रेजुवे येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 डिझाईन डेक्को हा कोणत्याही ब्रँडला पुरस्कृत न करणारा गोदरेज समूहाने स्थापन केलेला मंच आहे.  इंटिरियर डिझाईन व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपले नेटवर्क वाढवावे, मित्रमंडळी, ब्रँड्स व ग्राहक यांच्यासोबत संबंध प्रस्थापित व विकसित करावेत हा यामागचा उद्देश आहे.  फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर यासारख्या डिजिटल व सोशल मीडियावर डिझाईन डेक्को सक्रिय आहे.  कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को या विशेष कार्यक्रमातून या मंचाचे प्रत्यक्ष अस्तित्व दिसून येते.  सध्याचे व संभाव्य घरमालक, सजावटीची आवड असणाऱ्या व्यक्तींपासून ते आर्किटेक्चर व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंतांपर्यंत विविध व्यक्तींचा समावेश असलेले कनेक्शन्स बाय डेक्को संवाद व विचारांच्या देवाणघेवाणीतून सर्व संबंधितांसाठी आगळावेगळा अनुभव निर्माण करते.

 तंत्रज्ञानामुळे भविष्यातील घरांवर कशाप्रकारे प्रभाव पडत आहे याच्याशी निगडित एक्सपीरियन्स झोन्स, मास्टरक्लासेस व परिसंवादांचा कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को मध्ये समावेश होता.  सहभागी झालेल्या विविध ब्रॅंड्ससोबत संलग्न उपक्रम व सहयोग संधींमार्फत आर्किटेक्ट्स व इंटिरियर डिझायनर्सना यामध्ये सामावून घेण्यात आले होते.  गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स व गोदरेज लॉक्स यांच्या सिक्युरिटी झोनमध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती.  गोदरेज प्रॉपर्टीजने इझी बिगिनिंग्स हा आपला उपक्रम याठिकाणी सादर केला, यामध्ये संभाव्य घरमालक व ऍक्सिस बँक व होम कॅपिटल यांच्यासारखे आर्थिक सहयोगी यांना एकत्र आणून स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करण्याचे स्वप्न अधिक सोपे, सहज करण्याचा हा उपक्रम आहे.  युअँडअस झोनमध्ये घरमालकांना इंटिरियर डिझायनर्सकडून मोफत सल्ला मिळवण्याची संधी मिळाली.

 स्टुडिओ कोर्सचे आर्किटेक्ट श्री. कल्पक शाह यांनी घरामध्ये स्टाईल व सौंदर्य यांचा अनोखा मिलाप कसा साधता येईल याच्या साध्यासोप्या टिप्स यावेळी सांगितल्या. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले घर स्मार्ट आणि सुरक्षित कसे बनवता येईल याबद्दलची उपयुक्त माहिती यानिमित्ताने घरमालकांना मिळाली.

 या विशेष कार्यक्रमात अनेक नामवंतांनी आपले विचार मांडले.  सारा शाम (एस्साजीस ऍटेलिर), रिचा बहल (रिचा बहल डिझाईन स्टुडिओ) व निशिता कामदार (स्टुडिओ निशिता कामदार) यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीवरील रंगांचा प्रवास उलगडून सांगितला.  ख्यातनाम आर्किटेक्ट व अर्बानिस्ट माधव रमण (अनाग्राम आर्किटेक्टस) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा डिझाईन क्षेत्रावरील प्रभाव या विषयावर विचारप्रवृत्त करणारे व्याख्यान दिले.  चित्रकार व शिल्पकार केतकी पिंपळखरे आणि मायक्रो स्कल्प्टर यश सोनी (पेन्सिल कार्विंग्स) यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून कला हे त्यांच्यासाठी विचार व्यक्त करण्याचे माध्यम कशाप्रकारे आहे ते समजावून सांगितले.

 या उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट व हेड कॉर्पोरेट ब्रँड अँड कम्युनिकेशन्स                      श्री. सुजित पाटील यांनी सांगितले की, सहभाग व समन्वयाला प्रोत्साहन देणारे मंच निर्माण करण्यात गोदरेज समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे.  कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को या आमच्या पहिल्या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद नक्कीच आनंददायी व उत्साहवर्धक आहे.  या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही डिझाईन डेक्कोची सुरुवात केली.  आर्किटेक्टस, इंटिरियर डिझायनर्स व सहयोगी क्षेत्रांमधून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.  या पॉप-अप्सच्या सीरिजमधून आम्ही डिझाईनमध्ये विशेष आवड असणारे व या क्षेत्रातील व्यावसायिक यांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक मंच उपलब्ध करवून देत आहोत.  या वैचारिक संमेलनामुळे या उद्योगक्षेत्रात नवनवीन संकल्पना आणल्या जाव्यात असा आमचा उद्देश आहे.”     

 कनेक्शन्स बाय डेक्कोला जीपरॉक इंडिया, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, एचआर जॉन्सन, गोदरेज लॉक्स, युअँडअस, जोश टॉक्स व गोदरेज प्रॉपर्टीज यांचे सहकार्य मिळत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...