2 लाख 20 हजाराची बाईक ..टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच..(व्हिडिओ)

Date:

पुणे – दुचाकी व तीन- चाकी वाहन उत्पादन क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लच तंत्रज्ञानासह टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच केल्याचे जाहीर केले. टीव्हीएस रेसिंगचा समृद्ध वारसा घेऊन अद्यावत करण्यात आलेली ही गाडी ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव उंचावणारी आहे. या गाडीचे गियर आता जास्त सफाईदारपणे बदलता येतात व त्यामुळे हातावर जास्त ताण येत नाही. शिवाय, गियर कमी करताना वेग जास्त असूनही विशेषतः तीव्र कोपऱ्यांवर गाडी स्थिर राहाते. नव्या गाडीचं स्टायलिंगही बदलण्यात आलं असून त्यात फँटम ब्लॅक हा नवा रंग आता ग्राहकांना खरेदी करता येईल. बाइकचा वळणदार आकार आणि अँग्युलर डिझाइन नव्या रंगाला सुसंगत ठरणारं आहे.
बारकाईने तयार करण्यात आलेले गाडीचे स्लिपर फंक्शन व्हील हॉप आणि चेन व्हिपदरम्यान झटपट गियर कमी करण्यास मदत करते. शिवाय त्याला असिस्ट फंक्शनची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे क्लच प्लेट घट्ट बंद होतात आणि क्लच लागण्याचा जोर वाढतो. या सगळ्यामुळे क्लचवरील ताण कमी होतो. नवी टीव्हीएस अपाचे RR ३१० RT स्लिपर क्लच हे खूप ताकदवान आणि उपयुक्त वैशिष्ट्य आहे. या क्लचमुळे शहरी रस्ते, द्रुतगती मार्ग आणि ट्रॅक रायडिंग सोपं होतं. सध्याच्या टीव्हीएस अपाचे RR ३१० ग्राहकांनाही नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल, कारण रेस ट्युन्ड स्लिपर क्लच टीव्हीएस रेसिंग अक्सेसरी म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे, जे त्यांच्या मोटारसायकलला रेट्रोफिट करता येईल. ही सुविधा देशभरातील निवडक टीव्हीएस अपाचे RR ३१० वितरकांकडे वाजवी किंमतीत मिळेल.
लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन म्हणाले, ‘टीव्हीएस अपाचे RR ३१० मध्ये रेस ट्युन्ड स्लिपर क्लच उपलब्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. मला खात्री आहे, की आमचे सध्याचे आणि नवे ग्राहक गाडीच्या या अद्यावत वैशिष्ट्यांची प्रशंसा करतील. ट्रॅकसाठी उत्तम मानली जाणारी ही सुपर- प्रीमियम मोटारसायकल आमच्या रेसिंग उत्पादनांचा वारसा घेऊन आलेली असून त्यातील बरीच वैशिष्ट्ये या इंडस्ट्रीत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. हाच अनुभव आमच्या सध्याच्या टीव्हीएस अपाचे RR ३१० ग्राहकांना देण्याची इच्छा असून ते ही रेसिंगच्या या नव्या पैलूचे कौतुक करतील. नव्या स्टायलिंगमुळे मोटारसायकलीचा रेसिंग स्टान्स आणखी उंचावला असून तो ही ग्राहकांना आकर्षित करणारा आहे.’
भारतीय क्रिकेट खेळाडू महेंद्र सिंग धोनी हे टीव्हीएस अपाचे RR ३१० – रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लचचे पहिले सन्माननीय मालक ठरले आहेत.

नव्या मोटारसायकलीबाबत उत्सुक असलेले महेंद्र सिंग धोनी म्हणाले, ‘मी गेल्या १२ वर्षांपासून टीव्हीएस मोटर कंपनीशी जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक वर्षागणिक कंपनीशी असलेले माझे नाते आणखी दृढ झाले आहे. एक बाइकप्रेमी या नात्याने मी टीव्हीएस अपाचे RR ३१० – रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लच मिळाल्याबद्दल खूष आहे, कारण या गाडीमध्ये आकर्षक डिझाइन व दर्जेदार कामगिरीचा मेळ घालण्यात आला आहे. त्याचबरोबर एका भारतीय उत्पादकाची सुपर- प्रीमियम बाइक आपल्याकडे असल्याचा मला जास्त अभिमान वाटतो. ही नवी मोटरसायकल रस्त्यावर उतरवण्यासाठी मी उत्सुक आहे. कंपनीच्या टीमला भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.’

टीव्हीएस अपाचे RR ३१० ला रिव्हर्स इनक्लाइन्ड डीओएटसी (डबल ओव्हर हेड कॅम) लिक्विड कुल्ड इंजिन अतिरिक्त ऑइल कुलिंग तंत्रज्ञानासह बसवण्यात आले असून त्याला ६ स्पीड गियर बॉक्स, रेस इन्स्पायर्ड व्हर्टिकल स्पीडो- कम टेक्नोमीटर, बाय- एलईटी ट्विन प्रोजेक्टर हेड लॅम्प्स आणि मिशेलिन स्ट्रीट स्पोर्ट टायर्स यांची जोड देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही मोटारसायकल चालवण्याचा एकंदर अनुभव आणि विश्वासार्हता उंचावणारी अद्यावत वैशिष्ट्येही देण्यात आली आहे. गाडीची अद्यावत आवृत्ती रेसिंग रेड आणि फँटम ब्लॅक या दोन रंगांत उपलब्ध करण्यात येईल.
ही मोटरसायकल देशभरातील निवडक वितरकांकडे रू २,२०,००० या किंमतीत (एक्स शोरूम पुणे) उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...